Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»धरणगाव येथील चोपडा रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या भंगार गोडाऊनला भीषण आग

ताज्या बातम्या

धरणगाव येथील चोपडा रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या भंगार गोडाऊनला भीषण आग

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 18, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

भंगार गोडाऊनला भीषण आग; परिसरात भीतीचे वातावरण

जळगाव । धरणगाव येथील चोपडा रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून काही वेळातच आगीने विक्राळ रूप धारण केले.आकाशात धुराचे प्रचंड लोट आणि आगीचे लोळ उसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. विशेष म्हणजे, गोडाऊनच्या शेजारीच महावितरणचे 132 केव्हीचे सब स्टेशन असल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र सुदैवाने आग त्या दिशेने पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच धरणगावसह अमळनेर आणि एरंडोल येथील अग्निशमन दलाचे बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य जळून नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात रंगणार भक्तीचा स्वरसोहळा

July 28, 2026

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add