Author: Editorial Desk

जळगाव प्रतिनिधी | ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम संचालित ‘न्याय विश्वास फाउंडेशन’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात जिल्हाभरातील असंख्य नागरिकांनी सहभाग घेत विविध कायदेशीर प्रश्नांवर तज्ज्ञ वकिलांकडून मोफत मार्गदर्शन मिळवले. निकम कुटुंबाला लाभलेल्या वकिली क्षेत्रातील समृद्ध परंपरेचा वारसा पुढे नेत अॅडव्होकेट अनिकेत निकम सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कायदेशीर मदत पोहोचविण्याचे कार्य करत आहेत. बॅरिस्टर निकम आणि पद्मश्री अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी उभारलेल्या न्यायसेवेच्या परंपरेला पुढे नेत न्यायव्यवस्थेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिबिरात…

Read More

भडगाव प्रतिनिधी | भडगाव तालुक्यातील भारवडे येथे शेतातील मक्याच्या पिकाची नासधूस केल्याप्रकरणी १३ जणांविरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात दंगल, बेकायदेशीर जमाव जमवणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि धमकावने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनिल दयाराम पाटील यांच्या शेतात संशयितांनी एकत्र येत मक्याची कणसे तोडून पिकाचे नुकसान केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना विरोध केल्यामुळे शिवीगाळ करून धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून भडगाव पोलिसांनी १३ संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील दंगल, बेकायदेशीर जमाव, मालमत्तेचे नुकसान आणि धमकीसह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Read More

जामनेर प्रतिनिधी | जामनेर शहरात आणि तालुक्यातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत पात्र नागरिकांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत सुलभ आणि जलदगतीने पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व मोठे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या शिबिरात जामनेर तालुक्यातील सुमारे 5 हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांशी संबंधित दाखल्यांचे वितरण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.…

Read More

यावल प्रतिनिधी | यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प विकास कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी झालेल्या कथित अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ आज बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे प्रकल्प कार्यालयासह त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांमधील प्रशासकीय कामकाजावर परिणाम झाला असून, शंभर टक्के कामबंद पाळण्यात आला आहे. या आंदोलनाला जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना आणि सामाजिक संघटनांनीही जाहीर पाठिंबा दिला आहे. आंदोलनस्थळी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी भेट देत संबंधित प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे. अधिकाऱ्यांचा सन्मान आणि सुरक्षितता अबाधित राहावी तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू…

Read More

चोपडा प्रतिनिधी | अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २६ जुलै रोजी रात्री सुमारे १२ वाजता लासूर ते हातेड मार्गावरील पाटचारीजवळ हातेड शिवारात संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कारमध्ये लपवून ठेवलेला ७ किलो ११६ ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघा आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील चिंचोली येथे उद्योगांना दर्जेदार आणि अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या ३३ केव्ही महावितरण सबस्टेशनचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण करण्यात आले आहे. यावेळी बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, परिसरात वाढणाऱ्या औद्योगिक गरजा लक्षात घेऊन हे सबस्टेशन उभारण्यात आले असून, त्यामुळे वीज तुटवड्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. नवीन उद्योगांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून, उद्योगवाढीलाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात उद्योगांची संख्या वाढल्यामुळे वीजेची मागणी वाढली आणि विद्यमान क्षमता अपुरी पडली,…

Read More

वरणगाव​ प्रतिनिधी | वरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळवेल गावच्या कमानीजवळ अवैध मुरूम उत्खनन करून त्याची बेकायदेशीर वाहतूक करणारा डंपर पोलिसांनी धाड टाकून पकडला आहे. कोणतीही शासकीय परवानगी न घेता शासनाच्या गौण खनिजाची चोरी करून वाहतूक केली जात असल्याचे या कारवाईत उघडकीस आले आहे. ​या कारवाईदरम्यान पोलिसांनी ६ हजार रुपये किमतीचा ३ ब्रास अवैध मुरूम (२ हजार रुपये प्रमाणे) आणि सुमारे २० लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंपनीचा बिना नंबरचा पिवळ्या व राखडी रंगाचा १० चाकी डंपर (क्र. MH 19 CX 6711) असा एकूण २० लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ​याप्रकरणी डंपरचालक सतीश गोपाळ कोळी (वय २२…

Read More

भडगाव प्रतिनिधी | भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याच्या कारणावरून पतीने तिच्यावर चाकूने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपी पतीला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. ललिता आत्माराम राठोड (वय 36) असे मृत महिलेचे नाव असून, आत्माराम पतीलाल राठोड (वय 40, रा. वसंतवाडी तांडा) असे आरोपीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने दारू पिण्यासाठी पत्नीकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात आत्माराम राठोड याने घरातील धारदार चाकूने ललिता यांच्या पोटावर वार केला. गंभीर दुखापत…

Read More

जळगाव प्रतिनिधी | आपण समाजात राहतो, त्यामुळे समाजाचे काहीतरी देणे लागतो. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुरेश सुरळकर यांनी मातोश्री बेबीबाई सुरेश सुरळकर यांच्या प्रेरणेतून रविवारी, २६ जुलै रोजी गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमात तब्बल १५०० मुला-मुलींना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम जैन इरिगेशन सिस्टीम, अण्णासाहेब सागरमल सांखला सोसायटी, रोहित कन्स्ट्रक्शन, नंदिनी ट्रेडिंग कंपनी आणि तरुण कुढापा मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने पार पडला. यंदाचे हे आठवे वर्ष आहे. या सोहळ्याला उपमहापौर मनोज चौधरी, शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक शरद तायडे, मनपाचे स्थायी समिती सदस्य विशाल…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील आर.एल. चौफुली परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात अयोध्या नगर येथील रहिवासी संदीप सुपडू अलकरी (वय ४८) यांचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संदीप अलकरी हे एमआयडीसी परिसरातील एका खासगी कंपनीत कार्यरत होते. रविवारी दुपारी काम आटोपून ते नेहमीप्रमाणे दुचाकीने आपल्या घरी परतत होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आर.एल. चौफुली येथे अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, संदीप अलकरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना…

Read More