Author: Editorial Desk

नशिराबाद प्रतिनिधी | नशिराबाद परिसरात सुरू असलेल्या अनैतिक मानवी व्यापाराविरोधात नशिराबाद पोलिसांनी धडक कारवाई करत वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच घटनास्थळावरून एकूण ९१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरात अनैतिक व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. २१ जुलै रोजी सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, नशिराबादहून सुनसगावकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका शेतात वेश्याव्यवसाय सुरू आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत प्रदीप जनार्दन…

Read More

रावेर प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील गारखेडा येथे जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याने काकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्यासाठी मृतदेह नाल्याच्या कडेला टाकल्याचे पोलिस तपासात समोर झाले आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अनिल जखा बारेला (वय 29, रा. गारखेडा, ता. रावेर) याला 22 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील पाल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गारखेडा येथे रामा थावरू बारेला (वय- 46) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याची माहिती गावातील पोलीस पाटलांनी दिली होती. घटनास्थळी पाहणी केली असता मृताच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत…

Read More

जळगाव प्रतिनिधी । अल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यात संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन जळगाव शहरातील पिण्याच्या पाण्याची नासाडी रोखण्यासाठी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे आज जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे आणि आयुक्त आदित्य जिवने यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शहरातील सार्वजनिक, खाजगी पिण्याच्या पाण्याच्या नळांना तातडीने तोट्या बसविणे, पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे, पाणी बचतीबाबत जनजागृती मोहीम राबविणे, तसेच विशेष तपासणी पथके नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती. निवेदनाची दखल घेत महापौर दीपमाला काळे आणि आयुक्त आदित्य जीवने यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देत विशेष पथक नेमून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच महापौर दीपमाला काळे…

Read More

जळगाव प्रतिनिधी : जळगाव ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील रेमंड चौफुली जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पुढे जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी 17 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर कडून जळगाव शहरात येणारा ट्रक (क्रमांक टीएन 47 एक्यू 8403) याने पुढे जात असलेल्या दुचाकीवरील दोघांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेत शेखर ईश्वर सपकाळे (वय 25, रा.धामणगाव तालुका जळगाव) आणि पीयुष प्रदीप बेंडाळे (वय-20, रा.अयोध्या नगर जळगाव) हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. एमआयडीसीतील एका कंपनीतून…

Read More

जळगाव प्रतिनिधी | अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उभ्या असलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये ट्रक चालकाचा जळालेला मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. पुरावे नष्ट करण्यासाठी ट्रकला आग लावून मृत्यूचे खरे कारण लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच आरोपी जळगाव जिल्ह्यातील रावेर रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती अमरावती ग्रामीण पोलिसांना मिळाली. आज गुरुवारी १७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी जळगावचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून आरोपी पंजाबकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली. त्यानुसार रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने…

Read More

चोपडा प्रतिनिधी | चोपडा शहरातील नगरपालिका कार्यालयाच्या मागील भागात राहणाऱ्या काही महिलांच्या घरांवर नगरपालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आल्याने संबंधित कुटुंबांची घरे जमीनदोस्त झाली असून अनेक महिला व त्यांच्या कुटुंबीयांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. या कारवाईनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारवाईचा निषेध करत

Read More

जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या निवासस्थानी अखेर ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या छायाचित्राचे बॅनर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वी 11 जून रोजी संजय पवार यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शरद पवार यांना त्यांच्या छायाचित्राचा वापर करण्यास परवानगी देण्याची विनंती करणारे पत्र सादर केले होते. त्यावर शरद पवार यांनी “मान्यता” असा स्पष्ट उल्लेख करून परवानगी दिल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या 22 जुलै रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त संजय पवार यांनी आपल्या निवासस्थानी विशेष बॅनर लावण्याचा निर्णय घेतला आहे. या बॅनरवर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री…

Read More

पाळधी प्रतिनिधी | मतदार यादी विशेष पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाला पाळधी परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक येथे आयोजित विशेष शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत आपली एसआयआर प्रक्रिया पूर्ण केली. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामाला गती मिळाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी खुर्द येथील शासकीय विश्रामगृह आणि पाळधी बुद्रुक येथील श्रीराम मंदिर परिसरातील शिबिरांना भेट देत कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रत्येक पात्र मतदाराने वेळेत एसआयआर प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले. लोकशाही बळकट करण्यासाठी…

Read More

यावल प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगाव शिवारात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सुरुवातीला अपघात म्हणून नोंद झालेल्या प्रकरणाला पोलिसांच्या सखोल तपासानंतर धक्कादायक वळण मिळाले असून, साडेतीन वर्षांच्या अंध मुलाची हत्या केल्याप्रकरणी त्याची आजी आणि वडिलांविरुद्ध खुनाचा तसेच आईला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास किनगाव येथील शेतातील विहिरीत ७० टक्के दृष्टिदोष असलेल्या सरस्वती स्वप्निल पाटील (वय २७) आणि त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा कृष्णा पडल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत सरस्वती या लाकडी आधाराला धरून बचावल्या, मात्र कृष्णाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते.…

Read More

जळगाव प्रतिनिधी | लग्नाच्या आनंदावर अवघ्या सहा दिवसांतच दु:खाची काळी छाया पसरल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी जळगाव शहरात घडली. विद्यापीठासमोर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत २१ वर्षीय नवविवाहिता वैशाली भाऊसाहेब पाटील (रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) हिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात तिचे काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैशाली पाटील यांचा विवाह ७ जुलै रोजी जळगावातील गुजरात पेट्रोल पंप परिसरातील देवराम नगर येथे वास्तव्यास असलेले पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर नवदांपत्य देवदर्शनासाठी गेले होते आणि काही दिवसांपूर्वीच ते घरी परतले होते. सोमवारी वैशाली…

Read More