Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»ब्रेकिंग न्यूज: अंध आईचा मृत्यूचा सापळ्यातून बचाव; चिमुकल्याचा बळी, दोघे आरोपी ताब्यात

क्राईम

ब्रेकिंग न्यूज: अंध आईचा मृत्यूचा सापळ्यातून बचाव; चिमुकल्याचा बळी, दोघे आरोपी ताब्यात

Editorial DeskBy Editorial DeskJuly 14, 2026Updated:July 14, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

यावल प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगाव शिवारात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सुरुवातीला अपघात म्हणून नोंद झालेल्या प्रकरणाला पोलिसांच्या सखोल तपासानंतर धक्कादायक वळण मिळाले असून, साडेतीन वर्षांच्या अंध मुलाची हत्या केल्याप्रकरणी त्याची आजी आणि वडिलांविरुद्ध खुनाचा तसेच आईला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१३ जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास किनगाव येथील शेतातील विहिरीत ७० टक्के दृष्टिदोष असलेल्या सरस्वती स्वप्निल पाटील (वय २७) आणि त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा कृष्णा पडल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत सरस्वती या लाकडी आधाराला धरून बचावल्या, मात्र कृष्णाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते.

मात्र मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत केलेल्या चौकशीत सरस्वती यांनी धक्कादायक माहिती दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, विहिरीच्या पूजेसाठी गेले असताना सासू आशाबाई पाटील यांनी त्यांना आणि मुलाला विहिरीत ढकलले. या कृत्यात पती स्वप्निल पाटील याचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती दोघेही दृष्टिहीन असून, जन्माला येणारे अपत्यही अंध असल्याचे डॉक्टरांनी गर्भावस्थेत सांगितले होते. त्यावेळी गर्भपात करण्याचा आग्रह करण्यात आला होता. मात्र फिर्यादीने मुलाला जन्म दिल्यानंतर कौटुंबिक वाद वाढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add