Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

क्राईम

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 14, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी : पारोळा तालुक्यातील करंजी येथून बेपत्ता झालेल्या ८५ वर्षीय वृद्धेच्या खुनाचे गूढ तब्बल ३५ दिवसांनी उकलले आहे. वैजयंती गणपत माळी या ३ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. पतीच्या निधनानंतर त्या एकट्याच राहत होत्या. त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत ९ ऑगस्ट रोजी पारोळा पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली होती. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान वैजयंती माळी यांचा भाचा प्रशांत उत्तम माळी हादेखील घटनेनंतर अचानक गायब झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर बळावला. वैजयंती यांना अपत्य नसल्याने त्या प्रशांतला मुलाप्रमाणे मानत होत्या. तसेच त्याला वेळोवेळी आर्थिक मदत करत असल्याचे तपासात समोर आले. मात्र, प्रशांतवर कर्ज असल्याने त्याची नजर वृद्धेच्या दागिन्यांवर असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले असता ३ ऑगस्ट रोजी सकाळी प्रशांत करंजी येथे आल्याचे दिसून आले. वैजयंती एका कारमध्ये बसताना दिसल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली. अखेर १२ सप्टेंबर रोजी पोलिसांनी प्रशांतला धुळे येथून ताब्यात घेतले.

चौकशीत दागिन्यांच्या कारणातून वैजयंती यांची हत्या केल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून बायपासजवळ लपवण्यात आल्याचे उघड झाले. १३ सप्टेंबर रोजी पोलिसांनी सांगाडा व मानवी अवशेष शोधून काढले. पुढील तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

सण संपल्यावर रस्ते-पथदिवे दुरुस्त करणार का? स्थायी समितीत नगरसेवकांचा संताप

September 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add