Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

क्राईम

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 15, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

अमळनेर प्रतिनिधी | शहरातील मुंदडा नगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ७० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंदडा नगर भागात गणेश रामभाऊ पाटील पाटील यांचे राहते घर आहे. त्यांच्या आजीचे निधन झाल्यानंतर घराला कुलूप लावून ते मूळ गावी गेले होते. दरम्यान, १२ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपासून १३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद घराला लक्ष्य केले.

चोरट्याने घराचे कुलूप आणि कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट उघडून त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. घरफोडीची घटना लक्षात आल्यानंतर गणेश रामभाऊ पाटील यांनी याबाबत माहिती दिली. तसेच अनिल आत्माराम महाजन यांच्याशीही याबाबत विचारणा करण्यात आली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये २३ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ, २२ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ, ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, एक भार वजनाचे पाच चांदीचे देवाचे शिक्के आणि साडेतीन भार वजनाचे चांदीचे जोडवे यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ७० हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांत नमूद करण्यात आले आहे.

अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक श्री. शरद काककळींज तपास करीत आहेत. चोरट्याचा शोध सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026

सण संपल्यावर रस्ते-पथदिवे दुरुस्त करणार का? स्थायी समितीत नगरसेवकांचा संताप

September 12, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add