Author: Editorial Desk

जळगाव/पंढरपूर प्रतिनिधी : जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेली वार्षिक पंढरपूर सायकल वारी यंदाही अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. महापौर दीपमाला मनोज काळे यांनी स्वतः सायकल चालवत सलग दुसऱ्या वर्षी या वारीमध्ये सहभाग घेतला. रविवारी पंढरपुरात राज्यभरातून आलेल्या ८ हजार सायकलिस्टनी सुरुवातीला पंढरपूर शहराला फेरी मारून नंतर घडवून आणलेल्या भव्य आणि शिस्तबद्ध सायकल रिंगणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. वारीच्या सांगता सोहळ्यात रविवारी, दिनांक १२ जुलै रोजी पंढरपूर येथे एक अभूतपूर्व सोहळा रंगला. संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या विविध सायकलिस्ट ग्रुपच्या सुमारे ८ हजार सायकलपटूंनी पंढरपूरमध्ये सायकलचे एक मोठे आणि भव्य रिंगण तयार केले. या आधी पंढरपूर शहराला देखील त्यांनी…

Read More

जळगाव |प्रतिनिधी : शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील बॉम्बे बेकरीसमोरील विद्युत डीपीच्या फ्युज बॉक्सला रविवारी १२ जुलै रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पेट्रोल पंपाच्या अगदी जवळ ही घटना घडल्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्पर आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच इमरान खान यांनी तत्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधला. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी विद्युत डीपीमधील फ्युज बॉक्समधून मोठ्या प्रमाणात ठिणग्या आणि विद्युत फटाके उडत होते. त्यामुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनली होती. सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन…

Read More

जळगावच्या कार्यक्षम महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख खान्देशचे हृदय असलेल्या जळगाव शहराला एक नवी दिशा देणाऱ्या, जळगाव शहर महानगरपालिकेच्या १७ व्या महापौर दीपमाला काळे यांचा १३ जुलै रोजी वाढदिवस आहे. ६ फेब्रुवारी रोजी जळगावच्या महापौरपदाची धुरा सांभाळल्यापासून त्यांनी आपल्या कामाचा एक वेगळा आणि आश्वासक ठसा जळगावकरांच्या मनावर उमटवला आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, त्यांनी घेतलेले धडाकेबाज निर्णय आणि जळगाव शहरासाठी आखलेल्या ‘विकास व्हिजन’चा घेतलेला हा विशेष आढावा. कर्तव्याची १५० हून अधिक पावले आणि ‘पंचसूत्री’वर भर पदभार स्वीकारल्यापासून अत्यंत कमी कालावधीत महापौरांनी केवळ खुर्चीवर न बसता, प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून काम करण्याला प्राधान्य दिले आहे. जळगाव शहराच्या शाश्वत प्रगतीसाठी त्यांनी ‘आरोग्य,…

Read More

जळगाव/पंढरपूर प्रतिनिधी | जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेली वार्षिक पंढरपूर सायकल वारी यंदाही अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. जळगाव शहराच्या प्रथम नागरिक आणि महापौर दीपमाला मनोज काळे यांनी स्वतः सायकल चालवत सलग दुसऱ्या वर्षी या वारीमध्ये सहभाग घेतला आणि जळगाव ते पंढरपूर दरम्यानचे तब्बल ४८५ किलोमीटरचे अंतर यशस्वीरीत्या पार केले. ७५ जणांची सायकलवारी विठ्ठल चरणी दाखल; जल्लोषात सांगता गुरुवार, दिनांक ९ जुलै  रोजी सकाळी साडेपाच वाजता जळगावच्या आकाशवाणी चौकातून या वारीने प्रस्थान केले होते. राष्ट्रगीत आणि महिला भगिनींनी केलेल्या औक्षणानंतर निघालेला हा ग्रुप शनिवार, दिनांक ११ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजून ३८ मिनिटांनी पंढरपूर येथे पोहोचला. पंढरपुरात…

Read More

जळगाव | प्रतिनिधी : प्रेमविवाह करून पोलिस ठाण्यात परतलेल्या तरुण-तरुणीमुळे जळगावातील एमआयडीसी पोलिस ठाणे परिसरात मोठा गोंधळ उडाला. दोन्ही कुटुंबीय आमनेसामने आल्याने वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या गोंधळात पोलिस ठाण्याच्या खिडकीची काचही फुटली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत सौम्य बळाचा वापर करून जमाव पांगविला. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील तरुण आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरातील तरुणी काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. दोघांनी परस्पर संमतीने विवाह केल्यानंतर १० जुलै रोजी रात्री ते एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर झाले. तरुण-तरुणी पोलिस ठाण्यात परतल्याची माहिती मिळताच दोन्ही कुटुंबीय मोठ्या संख्येने तेथे पोहोचले. सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू झाला. मात्र, काही वेळातच परिस्थिती…

Read More

रावेर प्रतिनिधी | अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका मजुराच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणात रावेर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना अटक केली असून हत्येचे गूढ उलगडले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आणि मुख्य आरोपी हे एकमेकांचे मित्र होते. मात्र, मुख्य आरोपी गणेश संजय घोरपडे (वय 27, रा. भोर, ता. रावेर) याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. एप्रिल 2026 मध्ये आरोपीला ऐनपूर येथे ग्रामस्थांनी रंगेहात पकडून मारहाण केली होती. त्यानंतर आरोपीने मयताला “माझ्या प्रेमात तू आडवा आलास तर तुला ठार मारीन,” अशी धमकी…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव शहर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून सुरू असलेले रॅकेट उघडकीस आणले आहे. शहरातील विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये गुटखा, सुगंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण ६ लाख ५७ हजार ७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईदरम्यान अजित रावलानी, कुबेर कदम, हितेश पवार, निखिल केसवानी आणि सौरभ शिंगणे या पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मालामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश असून हा माल विक्रीसाठी चाळीसगावात आणला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जिल्हा पोलिस दलाने नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल २ कोटी ९६ लाख ४८ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनोख्या मुद्देमाल हस्तांतरण सोहळ्याचे आयोजन ११ जुलै रोजी करण्यात आले असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलिस ठाण्यांनी चोरी, घरफोडी, जबरी चोरी, फसवणूक आणि इतर मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा प्रभावी तपास करून मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला. यात मोबाईल…

Read More

रावेर (प्रतिनिधी) | डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकांना शिवीगाळ व मारहाण झाल्याच्या कथित घटनेचे पडसाद रावेर परिसरात उमटले आहेत. या घटनेचा रावेर-यावल-सावदा-फैजपूर तापी व्हॅली आयएमए शाखेतर्फे तीव्र निषेध करण्यात आला. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांना स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे, त्यांच्यासोबत असलेल्या काही व्यक्ती तसेच रुग्णाच्या नातेवाईकांकडून कथितरित्या शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ आयएमएच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला. आयएमएच्या शिष्टमंडळाने रावेर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार दीपा जेधे यांची भेट घेतली आणि विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. डॉक्टर…

Read More

जळगाव प्रतिनिधी | तरुणांमध्ये वाढत असलेल्या दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट तसेच इतर अमली पदार्थांच्या व्यसनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, जळगाव यांच्या वतीने नूतन मराठा महाविद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. गुरुवार 9 जुलै रोजी सकाळी 10 वाजता महाविद्यालयाच्या बोस सभागृहात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हुमेद महाडिक यांनी एनसीसी कॅडेट्सना मार्गदर्शन केले. यावेळी 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल धीरज मिनोत्रा, एओ कर्नल अश्विन वैद्य, सुभेदार मेजर बाबू, विनय शर्मा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. हुमेद महाडिक यांनी…

Read More