Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»विद्युत डीपीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या धाडसी कारवाईमुळे जीवितहानी टळली

क्राईम

विद्युत डीपीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या धाडसी कारवाईमुळे जीवितहानी टळली

Editorial DeskBy Editorial DeskJuly 13, 2026Updated:July 13, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव |प्रतिनिधी : शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील बॉम्बे बेकरीसमोरील विद्युत डीपीच्या फ्युज बॉक्सला रविवारी १२ जुलै रोजी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. पेट्रोल पंपाच्या अगदी जवळ ही घटना घडल्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्पर आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच इमरान खान यांनी तत्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधला. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी विद्युत डीपीमधील फ्युज बॉक्समधून मोठ्या प्रमाणात ठिणग्या आणि विद्युत फटाके उडत होते. त्यामुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनली होती.

सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाने प्रथम दोन फायर एक्स्टिंग्विशरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महावितरणकडून वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे विझविण्यात आली.

या बचावकार्यात वाहन चालक देविदास सुरवाडे तसेच फायरमन रोहिदास चौधरी, नवल शंकरपाळ आणि विकी सोनवणे यांनी धाडसाने व तत्परतेने काम करत आग आटोक्यात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या वेगवान प्रतिसादामुळे आग पेट्रोल पंपापर्यंत पोहोचण्यापूर्वीच नियंत्रणात आली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच मोठे आर्थिक नुकसानही टळले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाच्या तातडीच्या प्रतिसादाचे कौतुक करत त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add