Author: Editorial Desk

चाळीसगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, सुगंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, कारसह एकूण ६ लाख ५७ हजार ७०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सूचनेनुसार अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू असताना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमितकुमार मनेळ यांना गुटखा वाहतुकीची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. या प्रकरणी अजित चांदमल रावलानी, कुबेर शेख कसम, हितेश किशोर पवार, निखिल राजेंद्र कंसवाणी आणि सोहम संजय शिंगणे या पाच…

Read More

जळगाव प्रतिनिधी | खान्देश इनक्युबेशन, टेक्नॉलॉजी अँड आंत्रप्रेन्योरशिप अर्थात काईट फोरमचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्ह्यातील विविध स्टार्टअप फाऊंडर्स आणि को-फाऊंडर्सचा विशेष सत्कार करण्यात आला. काईट कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील होते. प्रमुख वक्ते म्हणून सुगोकी ग्रुपचे संचालक धनराज कासट उपस्थित होते. यावेळी डॉ. शांताराम बडगुजर, डॉ. युवराज परदेशी आणि सीईओ सागर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात सागर पाटील यांनी काईट फोरमच्या वर्षभरातील कामाचा आढावा घेतला. गेल्या वर्षभरात तीन स्टार्टअप लाँचपॅड आयोजित करण्यात आले. चार महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून, जिल्ह्यातील २४…

Read More

जळगाव प्रतिनिधी । हृदयविकाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी दिलासादायक बाब म्हणजे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार एम डी डीएनबी कॉर्डीओलॉजी यांची नियमित ओपीडी आता जळगाव येथे सुरू होत आहे. दर महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी महादेव हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, आकाश वाणी चौक विद्यानगर, जळगाव येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत रुग्णांची तपासणी, निदान व उपचार केले जाणार आहेत. या महिन्यातील ओपीडी शनिवार, ११ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. डॉ. परिहार हे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट तसेच जन्मजात हृदयरोग तज्ज्ञ असून हृदयविकाराच्या आधुनिक उपचारांमध्ये त्यांना विशेष प्राविण्य आहे. या विशेष ओपीडीमध्ये छातीत दुखणे, हृदयाची धडधड वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांसमोर…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील रुग्णांसाठी अत्याधुनिक मूत्ररोग उपचार सेवा आता महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे उपलब्ध झाली आहे. लेसर व एंडोस्कोपी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मूत्रपिंडातील खडे तसेच प्रोस्टेट ग्रंथीची वाढ यावर अत्यंत सुरक्षित, प्रभावी आणि कमी वेदनादायी उपचार केले जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. मूत्रमार्गातील खड्यांसाठी आर.आय.आर.एस. त्याचप्रमाणे, वयोमानानुसार होणार्‍या प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीवर टीयूआरपी या आधुनिक एंडोस्कोपिक पद्धतीने उपचार केले जातात. महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या या आधुनिक उपचारांचे प्रमुख फायदे म्हणजे शरीरावर कोणताही मोठा चीरा लागत नाही, कमी रक्तस्त्राव, कमी वेदना, कमी कालावधीत उपचार पूर्ण होणे, संसर्गाचा धोका कमी असणे आणि रुग्णाची जलद प्रकृती सुधारणा हे आहेत.विशेष म्हणजे,…

Read More

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा रेल्वे स्थानक परिसरातून बेपत्ता झालेल्या एका तीन वर्षीय बालकाचा अवघ्या दोन दिवसांत शोध लावण्यात पाचोरा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे या चिमुरड्याची त्याच्या आई-वडिलांशी सुखरूप भेट घडवून आणली असून, पाचोरा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. मूळचे मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील गोसालपूर येथील रहिवासी असलेले राजवीर फकीर आणि बालवीर फकीर हे दाम्पत्य सध्या पाचोरा रेल्वे स्थानक परिसरात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करते. दोन दिवसांपूर्वी त्यांचा तीन वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला होता. मुलाचा शोध न लागल्याने घाबरलेल्या पालकांनी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. रेल्वे पोलिसांनी तातडीने या घटनेची माहिती पाचोरा पोलिसांना…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली होती. पोलीस अधिक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी पाच अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात गुन्हेगारी टोळीचा मुख्य म्होरक्या गुरुजीत सिंग सुजानसिंग बावरी (वय २६, रा. तांबापुरा) याच्यासह दीपक बापू पाटील (वय २३), राजेश माणिक राठोड (वय २४), सुमित संजय कोळी (वय १९) आणि महेश उर्फ संतोष भोई (वय २४, सर्व रा. जळगाव) या पाच अट्टल आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी तब्बल १० गुन्ह्यांची कबुली दिली, ज्यामध्ये…

Read More

भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ शहरातील मोटरसायकल प्रकरणात भुसावळ शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत मोटरसायकल चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून, मोटरसायकल चोरीच्या सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. भुसावळ शहरातील झेडटीएस रोडवरील एमओएच पार्किंग शेड येथून फिर्यादी विजय जगन्नाथ खडके यांची सुमारे १५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी २७ जानेवारी रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक रूपाली दरेकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या पथकाने…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात पक्षकार, वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी नव्याने एटीएम मशीन बसविण्यात आले आहे. या एटीएम सुविधेचा उद्घाटन सोहळा ८ जुलै २०२६ रोजी भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. न्यायालय परिसरातच बँकिंग सुविधा उपलब्ध झाल्याने वकील, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. उद्घाटनप्रसंगी भूषण गवई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्यायव्यवस्थेत पक्षकारांच्या सुविधांना प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली. ‘न्यायालय हे पक्षकारांसाठी असते. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य आहे,’ असे त्यांनी सांगितले. तसेच न्यायालय आणि वकील यांच्यात सलोखा व समन्वय असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील विदगाव पुलावर एका चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. पुलावरून जळगाव शहराच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कार विदगाव पुलावरून जळगावच्या दिशेने जात असताना वाहनात अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर काही क्षणांतच कारमधून धूर निघू लागला आणि वाहनाने पेट घेतला. पुलाच्या मध्यभागी कारला आग लागल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घटनेनंतर पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली. सुरक्षिततेच्या…

Read More

जळगाव प्रतिनिधी | विठ्ठल नामाचा जयघोष, पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि सुदृढ आरोग्याचा संकल्प घेऊन जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या सायकल वारीने गुरुवारी, ९ जुलै रोजी पहाटे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. आकाशवाणी चौकातून सकाळी साडेपाच वाजता उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या या वारीत जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी सलग दुसऱ्या वर्षी सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे, त्या स्वतः सायकल चालवत तीन दिवसांत तब्बल ४८५ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत. जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे दरवर्षी पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सायकल वारीचे आयोजन केले जाते. यंदाची वारी ९ ते ११ जुलैदरम्यान होणार असून, सायकलस्वारांचा समूह शनिवारी संध्याकाळपर्यंत पंढरपूर येथे पोहोचणार आहे. वारीला निरोप देण्यासाठी आकाशवाणी चौकात…

Read More