जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी विद्यालयात लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा उत्साहपूर्ण आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या शुभहस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे, महापौर दीपमाला काळे, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते धनंजय चौधरी तसेच कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी सामाजिक, शैक्षणिक…
Author: Editorial Desk
जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. जळगाव शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. अमळनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आणि धरणगाव परिसरातही पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीची कामे प्रभावित झाली असून अनेक ठिकाणी दैनंदिन व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पाचोरा तालुक्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने खरीप पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पिकांचे…
चाळीसगाव प्रतिनिधी | येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यथार्थ पांडुरंग निनावे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कुलदिप विरूचंद गमे यांना ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्या मित्राने मौजे दहिवद येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण आणि गावहाळचे काम केले होते. या कामाचे एकूण १० लाख ४७ हजार ८४३ रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी व मोजमाप पुस्तिकेत नोंद करण्यासाठी उपविभागीय अभियंता यथार्थ निनावे यांच्याकडे फाईल पाठवण्यात आली होती. तक्रारदाराने ३ जुलै रोजी निनावे यांची भेट घेतली असता, त्यांनी एकूण बिलाच्या १…
अमळनेर प्रतिनिधी| अमळनेर शहरात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या पाण्याने भरलेल्या खदाणीत बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला. मानव बंटी रतनानी, वय १४, कार्तिक विकी उधवानी, वय १४ आणि दिनेश विजय पंजवानी, वय १७ अशी मृत मुलांची नावे आहेत. तिघेही अमळनेरमधील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी होते. प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही मुले मंगळवारी सायंकाळच्या सुमारास खदाण परिसरात गेली होती. पाण्यातून चालत ते एका उंचवट्यावर पोहोचले. यावेळी सेल्फी काढताना एकाचा पाय घसरल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्याने हात दिला, तर दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिसराही खोल पाण्यात ओढला गेला. काही क्षणांत तिघेही सुमारे ३० फूट खोल…
चोपडा प्रतिनिधी | सोशल मीडियावर भारतीय जनता पक्षाची कथित बदनामी करणारी पोस्ट प्रसारित केल्याच्या आरोपावरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे नगरसेवक तथा शहराध्यक्ष नरेंद्र साहेबराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नईमोद्दिन ऐनोद्दिन शेख आणि सचिन जैस्वाल यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी सकाळी सुमारे साडेआठ वाजेच्या सुमारास नरेंद्र पाटील यांना व्हॉट्सॲपवर प्रसारित झालेल्या एका पोस्टबाबत माहिती मिळाली. या पोस्टमध्ये भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन होईल, अशा स्वरूपाचा मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच पोस्टमध्ये असंबंधित छायाचित्र आणि भाजपचे अधिकृत निवडणूक चिन्ह ‘कमळ’…
जामनेर प्रतिनिधी | भुसावळ नगर पालिका प्रशासन शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. त्याचाच निषेध म्हणून आज भुसावळ नगर पालिका कार्यालयावर वंचित बहुजन आघाडी कडून हंडा मोर्चा काढण्यात आला. भुसावळ नगर पालिका ही जिल्ह्यातील एक मोठी नगर पालिका आहे.असे असतांना येथे पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध करून मिळण्यासाठी शहरातील नागरिकांना मोर्चा निदर्शने करावी लागत असल्याची तीव्र भावना मोर्चा आंदोलनातील पदाधिकारी यांनी व्यक्त करून दाखवली.दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांना पुरवठा होत असलेल्या गढूळ पाणी पिण्यास भाग पाडले. मोर्चाचे नेतृत वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शमीभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार,पल्लवी गुरचळ यांनी केले. वंचितचे जिल्हा…
चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील वरखेडे शिवारात तब्बल 9 फूट लांबीचा अजगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रुपसिंग पवार यांच्या शेतात 6 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास हा भलामोठा अजगर दिसून आला. अजगर पाहताच शेतातील नागरिक आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती पंचशील नगर, चाळीसगाव येथील सर्पमित्र मयूर कदम यांना देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या आकाराच्या अजगराला कोणतीही इजा होणार नाही, याची काळजी घेत मयूर कदम यांनी कौशल्याने आणि सुरक्षितरीत्या त्याला पकडले. त्यानंतर सायंकाळी अजगराला पाटणा परिसरातील जंगलात सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले. सर्पमित्र मयूर कदम यांनी आतापर्यंत हजारो विषारी आणि बिनविषारी…
पाचोरा प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या मानवी आरोग्यास घातक असलेल्या सुगंधित पानमसाला, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या एका तरुणाविरोधात पाचोरा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 6 हजार 600 रुपये किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाचोरा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी 5 जुलै रोजी रात्री शहरात गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. सुमारे 11 वाजेच्या सुमारास रेल्वे भुयारी मार्गाजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला थांबविले. त्याच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित विमल पानमसाला आणि तंबाखूची पाकिटे आढळून आली. पोलिसांनी संशयिताची चौकशी केली असता त्याने…
नशिराबाद प्रतिनिधी | नशिराबाद येथील भवानीनगर परिसरात रविवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. घराच्या आवारात खेळत असताना पाण्याच्या हौदात पडल्याने अवघ्या तीन वर्षांच्या आकांक्षा प्रवीण इंगळे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच तिचा तिसरा वाढदिवस कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात साजरा केला होता. वाढदिवसाच्या आनंददायी आठवणी ताज्या असतानाच या घटनेने इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी घरातील सर्व सदस्य जेवणासाठी बसले होते. यावेळी आकांक्षा नेहमीप्रमाणे घराच्या आवारात खेळत होती. खेळण्याच्या नादात ती अचानक पाण्याच्या हौदात पडली. काही वेळानंतर आकांक्षा दिसत नसल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. शोध घेत असताना ती पाण्याच्या हौदात आढळून आली.कुटुंबीयांनी तिला तातडीने…
भुसावळ प्रतिनिधी | शहरात अवघ्या चार दिवसांच्या अंतराने दुसरी खुनाची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आरपीडी रोड परिसरातील कालिका मंदिराच्या सेवेकऱ्याच्या हत्येची घटना ताजी असतानाच कवाडे नगर परिसरातील रेल्वे फिल्टर हाऊसमध्ये कार्यरत असलेल्या 58 वर्षीय कर्मचाऱ्याची लोखंडी पट्टीने डोक्यात प्रहार करून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री उशिरा उघडकीस आली. प्रसाद यशवंत कुलकर्णी (वय 58, रा. स्टार लॉन परिसर, भारंबे नगर, भुसावळ) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी आकाश भानुदास गोरखा (रा. कवाडे नगर, भुसावळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद कुलकर्णी हे शनिवारी सायंकाळी…

