Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»ब्रेकिंग : उड्डाणपुलावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

क्राईम

ब्रेकिंग : उड्डाणपुलावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Editorial DeskBy Editorial DeskOctober 15, 2026Updated:October 15, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | शहरातील आकाशवाणी जवळील उड्डाणपुलावर गुरुवारी सकाळी ९:३० ते १० वाजण्याच्या दरम्यान एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भरधाव ट्रकने कट मारून मागून जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून, मृतकाच्या कुटुंबियांवर आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.

रविंद्र छबुलाल चौधरी (वय ३५, सध्या रा. चंदू अण्णानगर, जळगाव; मूळ रा. उत्राण, ता. एरंडोल) असे मृत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, रविंद्र चौधरी हे मोतीलाल ओसवाल या खाजगी वित्त कंपनीत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते पत्नीसोबत जळगावात राहत होते. सकाळी ते आपल्या हिरो एचएफ डीलक्स (MH 19 DN 1282) या दुचाकीवरून नेहमीप्रमाणे ड्युटीवर जात होते.

दरम्यान, आकाशवाणी जवळील उड्डाणपुलावर त्यांच्या शेजारून जाणाऱ्या भरधाव ट्रकने (RJ 50 GA 9234) त्यांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ते रस्त्यावर पडून थेट ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच अंत झाला.

रविंद्र चौधरी यांच्या पश्चात पत्नी आणि वृद्ध आई आहे. त्यांच्या वडिलांचे आधीच निधन झाले असल्याने, घरातील ते एकमेव कमावते तरुण होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबाचा आधारच हिरावला गेला असून, कुटुंबीयांचा आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता.

घटनेची माहिती मिळताच शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात हलवण्यात आला. तसेच, अपघातग्रस्त ट्रक आणि दुचाकी जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे.

अपघाताची बातमी समजताच मोतीलाल ओसवाल कंपनीतील त्यांचे सहकारी आणि नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, तरसोद बायपासची वाहतूक शहरातून वळवल्यामुळे या मार्गावरील जड वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली असून, यामुळे शहरातील रस्ते नागरिकांच्या बळीचा मार्ग ठरत आहेत.

प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन कठोर उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी जळगाव शहरातील संतप्त नागरिकांमधून जोर धरत आहे. वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक प्रशासनाने ठोस भूमिका घेणे गरजेचे बनले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add