Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

क्राईम

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

Editorial DeskBy Editorial DeskOctober 28, 2026Updated:October 28, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील शास्त्रीनगर परिसरात महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या माधवराव उर्फ नंदूमामा माणिकराव देशमुख यांनी राहत्या घरी आपली जीवन यात्रा संपविली. खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्जाच्या हप्त्यांसाठी सतत मानसिक त्रास दिला जात असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

माधवराव देशमुख यांच्यावर खासगी फायनान्स कंपन्या, होमलोन तसेच काही खासगी व्यक्तींचे मिळून सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीसाठी फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी घरी येऊन त्रास देत असल्याचा आरोप त्यांचे पुत्र ओम देशमुख यांनी केला आहे.

एका कंपनीचे चार ते पाच प्रतिनिधी घरी येऊन धमकावत होते. तसेच फोनवरून मॅनेजरशी बोलण्यास भाग पाडून शिवीगाळ केली जात असल्याचा दावाही ओम देशमुख यांनी केला आहे. या सततच्या मानसिक छळामुळेच वडिलांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

या घटनेनंतर देशमुख कुटुंबीयांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दोषींविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026

ब्रेकिंग : कुंटणखान्यावर पोलिसांची धाड; एकाला अटक: गुन्हा दाखल

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add