पारोळा प्रतिनिधी | धुळे-पारोळा मार्गावरील सबगव्हाण टोलनाका परिसरात केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने पुढे उभ्या असलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. या अपघातानंतर टँकरचे टायर फुटून आग लागली. या दुर्घटनेत टँकरमधील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीजे-१८ बीव्ही-८३१५ क्रमांकाचा केमिकल टँकर धुळ्याकडून पारोळ्याच्या दिशेने जात होता. सबगव्हाण टोलनाक्याजवळ पोहोचल्यानंतर टँकरने समोर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर टँकरच्या टायरने पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पारोळा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील…
Author: Editorial Desk
जळगाव प्रतिनिधी | शहरातील जोशीपेठ परिसरातील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करत असताना विजेचा जोरदार धक्का लागल्याने १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मुस्तकीम आसिफ भैय्या पटेल (वय १९, रा. मासूमवाडी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जोशीपेठ परिसरातील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम अंतिम टप्प्यात सुरू होते. मुस्तकीम हा आपल्या सहकाऱ्यांसोबत काम करत होता. इलेक्ट्रिक वायर जोडण्याचे काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने मुस्तकीमला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. घटना घडताच त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी तातडीने त्याला उचलून जिल्हा शासकीय…
अमळनेर प्रतिनिधी | अमळनेर येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानात लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटनेनंतर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी ३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकारी व प्रशासनाशी चर्चा करत तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संत सखाराम महाराज वाडी हे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याचे सांगत, या घटनेची गंभीर दखल घेतली. नुकसानग्रस्त परिसरातील पंचनामे तात्काळ पूर्ण करून आवश्यक ती आर्थिक मदत, पुनर्वसन आणि पुनर्बांधणीची प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला दिले.…
जळगाव प्रतिनिधी | शहरातील मेहरूण परिसरातील सर्व्हे क्रमांक ३४३ येथे सुमारे २५० कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेल्या विभागीय क्रीडा संकुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे जळगाव शहराच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. विभागीय क्रीडा संकुलाकडे जाणारा सध्याचा रस्ता कच्चा असून तो प्रामुख्याने वहिवाटीसाठी वापरला जातो. भविष्यात या भव्य क्रीडा संकुलात खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होणार असल्याने संकुलाला जोडणारा प्रशस्त आणि सुसज्ज रस्ता असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी संबंधित जागेची संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीवेळी नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, महापौर दिपमाला…
ठाणे वृत्तसंस्था । राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आणि पक्षाचे ‘ऑपरेशन टायगर’ यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रचंड धावपळ सुरू होती. या सततच्या दगदगीमुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा गंगुबाई शिंदे सभागृहात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्षप्रवेश झाला. या सोहळ्यासाठी शिंदे गटातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्यरात्री सव्वा एक वाजेपर्यंत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आणि राजकीय खलबते सुरू होती. वास्तविक पाहता, विधिमंडळाचे कामकाज…
पाचोरा प्रतिनिधी । ग्रामीण भागातील अवैध धंदे, दादागिरी आणि दारू विक्रीविरोधात महिलांनी उठवलेल्या आवाजाची पाचोरा पोलिसांनी तातडीने दखल घेतली आहे. कुरंगी (ता. पाचोरा) गावात एका घराच्या आडोशाला बेकायदेशीररीत्या बनावट देशी व विदेशी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. विष्णू उर्फ विक्की राजू पाटील (मराठे, रा. कुरंगी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कुरंगी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीमुळे महिला व ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते. या त्रासाला कंटाळून महिलांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली होती. ३ जुलै रोजी सायंकाळी ५वाजेच्या सुमारास पाचोरा पोलीस ठाण्याचे पथक परिसरात…
जामनेर प्रतिनिधी । जामनेर पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध धडक मोहीम राबवत चोरी आणि घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या मोठ्या गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा केला आहे. पोलिसांनी या दोन्ही कारवायांमध्ये एकूण चार संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पहिल्या घटनेत एका घरातून ७० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणाचा वेगाने तपास करत पोलिसांनी आरिफखान लालखान कंजर आणि मुबारिक अली खान या दोन चोरट्यांना अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी चोरी गेलेली ७० हजारांची संपूर्ण रोख रक्कम हस्तगत केली असून, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली विना नंबर प्लेटची स्प्लेंडर मोटारसायकलही जप्त…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मनपाच्या बहुचर्चित सन २००६ मधील घरकुल गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या आणि नवीन तयार करण्यात आलेल्या मूळ फाईली रेकॉर्ड रूममधून चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव महानगरपालिकेचे नगर रचनाकार तथा प्रभारी सहाय्यक संचालक अमोल वसंतराव पाटील (वय ३२) यांनी या संदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे. महानगरपालिकेच्या नगर रचनाकार विभागातील सर्व महत्त्वाचे अभिलेख आणि कागदपत्रे रेकॉर्ड रूममध्ये सुरक्षित ठेवली जातात. यामध्ये २००६ च्या घरकुल गैरव्यवहार प्रकरणातील गट क्र. ३३७/३ अ/१ आणि गट क्र.…
अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्याच कायदेशीर पत्नीला जबरदस्तीने दारू आणि गांजाचे व्यसन लावून, तिला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नराधम पतीसह तीन जणांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून खळबळ उडाली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीने तिला जबरदस्तीने दारू आणि गांजा पाजला. एवढेच नव्हे तर, धमकी देवून तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करत बेदम मारहाण व शिवीगाळ केली. पीडितेने या कृत्याला कडाडून विरोध केला असता, “जर वेश्या व्यवसाय केला नाही, तर तुला जिवंत मारून टाकेन,” अशी…
अमळनेर प्रतिनिधी | येथील संत सखाराम महाराज वाडी संस्थानात लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटनेनंतर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी ३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. आगीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकारी व प्रशासनाशी चर्चा करत तातडीने मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संत सखाराम महाराज वाडी हे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असल्याचे सांगत, या घटनेची गंभीर दखल घेतली. नुकसानग्रस्त परिसरातील पंचनामे तात्काळ पूर्ण करून आवश्यक ती आर्थिक मदत, पुनर्वसन आणि पुनर्बांधणीची प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला दिले. तसेच…

