Author: Editorial Desk

फैजपूर प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी हा वृद्ध महिलेच्या घरी आला. पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने त्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर महिलेवर जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनेनंतर पीडित महिलेने फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा…

Read More

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा शहरातील स्वस्त धान्य दुकानाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात काँग्रेसने मंगळवारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले. आगाऊ फिंगरप्रिंट घेऊनही लाभार्थ्यांना धान्य न देता त्यांचा हक्काचा साठा लाटल्याचा आरोप करत संबंधित रेशन दुकानदाराचा परवाना तातडीने रद्द करून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. देशमुखवाडी परिसरातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ११६ येथे जून महिन्याचे धान्य एफपीएस मशीनवर उपलब्ध असल्याचे दिसत असतानाही अनेक लाभार्थ्यांना धान्य मिळाले नसल्याची तक्रार नागरिकांनी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याकडे केली होती. या प्रकरणाची दखल घेत काँग्रेसने वंचित लाभार्थ्यांसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तहसीलदारांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करून संबंधित दुकानदाराविरोधात कठोर कारवाईची मागणी…

Read More

चोपडा प्रतिनिधी | तालुक्यातील अडावद ग्रामपंचायतीतील विकासकामांमध्ये कथित अनियमितता, नातलगांना कंत्राटे देणे आणि शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ग्रामपंचायत सदस्य जुनैदखान मुनसाफखान पठाण यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि काही सदस्य यांनी संगनमताने शासकीय नियमांचे उल्लंघन करत विकासकामांची कंत्राटे स्वतःच्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सदस्य बनोबी रशीद मन्यार यांनी आपल्या नातू शेख नदीम शेख कासिम यांच्या नावावर ग्रामपंचायतीची कामे मंजूर करून घेतल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या कामाच्या मोबदल्यापोटी १६ एप्रिल…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | पोटच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सतत अश्लील चाळे करत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम बापाविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पीडित मुलीच्या आईने पतीविरोधात फिर्याद दिली आहे पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पीडित मुलीचा बाप हा कोणतेही कामधंदा करत नसून तो दिवसभर दारूच्या नशेत राहतो. २४ जून ते २८ जून दरम्यान मध्यरात्रीच्या वेळी सर्व कुटुंब झोपलेले असताना, आरोपीने दारूच्या नशेत आपल्या पोटच्या तेरा वर्षीय मुलगी हिच्याजवळ जाऊन असलेला जाळे करत तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केली असता आईला जाग आली आणि तिने पतीला जाब विचारला. यावर…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या महिलेवरील सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत अटक केलेल्या 11 आरोपींना न्यायालयात हजर केले. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण 14 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी तिघे अल्पवयीन असल्याने त्यांना बालन्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख आरोपी अशपाक तडवी हा अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथके कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जून रोजी संबंधित महिला तिच्या मित्रासोबत जंगल परिसरात थांबलेली असताना आरोपींनी त्यांना अडवून शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर दोघा आरोपींनी महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला. या अमानुष कृत्याचे चित्रीकरण अन्य…

Read More

वरणगाव प्रतिनिधी | शहरासह ग्रामीण भागात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, शेतातील ट्रान्सफॉर्मर वारंवार जळणे, कमी दाबाने वीज मिळणे, अवाजवी वीजबिले आणि स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रस्तावाविरोधात शिवसेनेच्या वतीने मंगळवारी वरणगाव वीज वितरण कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो नागरिक, शेतकरी, महिला, युवक तसेच शिवसैनिक सहभागी झाले होते. सकाळी १० वाजता बसस्टँड येथील शिवसेना संपर्क कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. भगवे झेंडे हातात घेऊन आणि घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी वीज वितरण कार्यालय गाठले. शहर व परिसरातील सुमारे ४०० ते ५०० नागरिकांनी या मोर्चात सहभाग नोंदवून वीज समस्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. वीज वितरण कार्यालयासमोर शिवसैनिकांनी…

Read More

भडगाव प्रतिनिधी | भडगाव तालुक्यातील कजगावजवळ मध्यरात्री भीषण रस्ते अपघात घडून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिलांसह १५ जण जखमी झाले. पंढरपूर वारीसाठी निघालेल्या नातेवाईकांना सोडून आपल्या गावाकडे परतत असलेल्या भाविकांच्या ट्रॅक्टरला मालवाहू आयशर वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.ही घटना मंगळवारी मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास घडली. धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्टरचे अक्षरशः दोन तुकडे झाले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहिकांद्वारे चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर…

Read More

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कठोरा बुद्रुक येथे एक अत्यंत हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. शेतात वडिलांसोबत काम करत असताना अचानक अंगावर वीज पडल्याने २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. अखिलेश किशोर तायडे (वय २१) असे या मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण कठोरा बुद्रुक गावासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कठोरा बुद्रुक शिवारातील शेतामध्ये किशोर तायडे आणि त्यांचा तरुण मुलगा अखिलेश हे दोघे नेहमीप्रमाणे शेतीची कामे करत होते. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी विजांचा कडकडाट प्रचंड प्रमाणात वाढला होता. काही…

Read More

जामनेर (प्रतिनिधी) । तालुक्यातील गारखेडा येथे घरासमोर कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाब्दिक वादाचे पर्यावसान थेट जीवघेण्या हाणामारीत झाले असून, आरोपींनी पती-पत्नीला चाकू आणि फायटर सारख्या धारदार हत्यारांनी बेदम मारहाण करून जखमी केले आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गारखेडा येथील रहिवासी आणि मजूर व्यावसायिक सूरज शांताराम चौधरी (वय ३२) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. २८ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सूरज चौधरी यांच्या घरासमोर कचरा टाकल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. यावरून निलेश हरिदास चौधरी, साई निलेश…

Read More

भुसावळ प्रतिनिधी । पत्रकारांशी संवाद साधताना ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी केलेल्या कथित अवमानकारक व आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष खंडू शेलोडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व पत्रकारांनी २९ जून रोजी भुसावळ येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधित खासदारांविरुद्ध चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. निवेदनात पत्रकारांचा सन्मान अबाधित राखणे ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे नमूद करण्यात आले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांची भूमिका महत्त्वपूर्ण असून त्यांच्याविषयी लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने व संयमित भाषा वापरणे अपेक्षित असल्याचेही संघाने अधोरेखित केले. संबंधित वक्तव्यामुळे पत्रकारांच्या भावना दुखावल्या…

Read More