Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा; पंचनामे 10 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश: मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

क्राईम

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा; पंचनामे 10 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश: मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 26, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव-जामनेर | राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. ज्या भागात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे किंवा २५ ते ३० दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे, अशा भागांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. दहा दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या नियम आणि निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतजमिनी खरडून वाहून गेल्या होत्या. यंदा मात्र पावसाअभावी पिके धोक्यात आली आहेत. कापूस, सोयाबीन, मका यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही भागात मका पूर्णपणे जळून गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

गेल्यावेळी एनडीआरएफच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्यात आली होती. यावेळीही शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार मदत केली जाईल, असे महाजन यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही, त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. या भागात प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे. पंचनाम्यांना तातडीने सुरुवात करण्यात आली असून, नुकसान निश्चित झाल्यानंतर मदतीची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याने शासन याबाबत संवेदनशील आहे. पंचनामे जलदगतीने पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026

भुसावळ तालुक्यात विवाहितेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी

October 27, 2026

म्हसावद रेल्वेगेट १४ तास बंद; जळगावच्या महामार्गावर वाहतूक कोंडीचा धोका!

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add