जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथे एका विवाहितेचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लक्ष्मण आत्माराम सावळे याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, वांजोळा येथील लक्ष्मण आत्माराम सावळे याने विवाहितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच, घडलेल्या प्रकाराबाबत घरी कोणाला सांगितल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही त्याने महिलेला दिली.
ही घटना २४ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास वांजोळा गावातील अंगणवाडीजवळील शौचालयाच्या बाजूला घडली. या प्रकारानंतर पीडित महिलेने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या तरतुदींनुसार गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ तालुका पोलीस करीत आहेत.



