Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»खान्देशचा आवाज काश्मीरमध्ये घुमणार; तुषार वाघुळदे यांची राष्ट्रीय कराओके संमेलनाच्या प्रमुख निवेदकपदी निवड

जळगाव

खान्देशचा आवाज काश्मीरमध्ये घुमणार; तुषार वाघुळदे यांची राष्ट्रीय कराओके संमेलनाच्या प्रमुख निवेदकपदी निवड

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 30, 2026Updated:September 30, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीय कराओके सिंगर्स संमेलन २०२६मध्ये महाराष्ट्राचा गौरव वाढवणारी कामगिरी जळगावचे तुषार वाघुळदे यांच्या निवडीमुळे झाली आहे. २ ते ७ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या राष्ट्रीय संमेलनाच्या प्रमुख सूत्रसंचालकपदी तुषार वाघुळदे यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र चित्रपट कलाकार असोसिएशनकडून त्यांची या जबाबदारीसाठी निवड करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नामवंत अँकर आणि कलावंत म्हणून तुषार वाघुळदे यांची ओळख आहे. राष्ट्रीय स्तरावरील विविध कार्यक्रमांमध्ये आपल्या दमदार आवाजाने, प्रभावी संवादशैलीने आणि हजरजबाबीपणाने त्यांनी सूत्रसंचालन केले आहे.

देशभरातील कराओके गायक, गायिका, संगीतकार आणि संगीत क्षेत्रातील दिग्गजांना एकत्र आणण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी तुषार वाघुळदे यांची निवड झाल्याने संगीत आणि कला क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

वाघुळदे हे मराठी फिल्म्स चेंबर्स ऑफ कॉमर्स, कोल्हापूरचे माजी सचिव तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी सदस्य आहेत. ते ‘ऑर्केस्ट्रा ७ स्ट्रिंग्स’चे संचालक आणि ऑर्गनायझर म्हणूनही कार्यरत आहेत.

या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना तुषार वाघुळदे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे अभिमानाची बाब असून, संमेलन संस्मरणीय करण्यासाठी सर्वोत्तम योगदान देणार असल्याचे सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add