Author: Editorial Desk

जळगाव प्रतिनिधी । जागतिक योगदिनाचे औचित्य साधून जळगाव येथील सिद्धार्थ लॉनवर भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ योगशिक्षक श्री. सुनील गुरव यांनी उपस्थित सर्व योगसाधकांना आंतरराष्ट्रीय योग प्रोटोकॉलनुसार योगासने, प्राणायाम, ध्यान आणि हास्य प्रयोगांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले. या विशेष प्रसंगी योगसाधकांनी केवळ एकट्याने न येता, आपल्या संपूर्ण कुटुंबासह (फॅमिलीसह) हजेरी लावली होती. यामध्ये सुमारे १०० हून अधिक योगप्रेमी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सिद्धार्थ लॉन येथे गेल्या १५ वर्षांपासून योगशिक्षक सुनील गुरव यांच्या माध्यमातून नियमित योगासने आणि प्राणायामचे वर्ग मोफत चालवले जातात. जळगाव शहरातील नागरिकांना निरोगी, सुदृढ आणि आनंदी जीवन जगता यावे, यासाठी ते सातत्याने योगाचे…

Read More

जामनेर प्रतिनिधी । जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (गॅंगरेप) झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला असून, पोलिसांनी तत्परता दाखवत १५ पैकी १४ मुख्य व सह-आरोपींना जेरबंद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही काळिमा फासणारी घटना २ जून रोजी घडली. पीडित ४० वर्षीय महिला तिच्या परिचयातील मित्रासोबत जात असताना, देऊळगाव-कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळील निर्जन जंगल परिसरात दोन नराधमांनी तिला गाठले. त्या नराधमांनी मित्रासमोरच पीडित महिलेवर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला. संतापजनक बाब म्हणजे, हा अत्याचार सुरू असताना तिथे उपस्थित असलेल्या इतर सह-आरोपींनी या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण (व्हिडिओ) केले. व्हिडिओ…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहराचे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिर संस्थानच्या संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्स येथे भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूरकडे पायी निघालेल्या या ऐतिहासिक पालखी सोहळ्याचे जैन हिल्सच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वारकरी परंपरेला साजेशा वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणाने परिसर दुमदुमून गेला. अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी संत मुक्ताबाईंच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेत पालखीला अभिवादन केले. जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी विजय मुथा यांनी पालखीचे विधिवत पूजन करून वारकरी बांधवांचे स्वागत केले. याप्रसंगी एस. बी. ठाकरे, चंद्रकांत चौधरी, भीमराव दांडगे, किशोर पाटील आदींसह श्रीराम मंदिर संस्थान (आप्पा महाराज समाधी मंदिर) चे विद्यमान…

Read More

चोपडा प्रतिनिधी | चोपडा येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या विरोधात विविध तक्रारींची निष्पक्ष विभागीय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करत सोमवारी चोपड्यात सर्वपक्षीय जनआंदोलन करण्यात आले. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पत्रकार, शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शांततापूर्ण मोर्चाला सुरुवात झाली. घोषणाबाजी करत आंदोलनकर्ते तहसील कार्यालयावर पोहोचले. प्रांत अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांच्या वतीने नायब तहसीलदार जोशी यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. निवेदनातील मागण्या शासनाकडे तातडीने पाठविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. आंदोलनानंतर झालेल्या सभेत वक्त्यांनी तहसीलदारांच्या कार्यपद्धतीवर टीका करत कथित अवैध गौण खनिज उत्खननाकडे दुर्लक्ष, प्रशासकीय कारभारातील…

Read More

जळगाव प्रतिनिधी | शहरातील कासमवाडी परिसरात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासामुळे आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साडेतीन वर्षांच्या एका चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात मोहम्मद मिर्झा हा बालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकला परिसरात खेळत असताना अचानक एका मोकाट कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली. आरडाओरडा ऐकून स्थानिक नागरिकांनी धाव घेत कुत्र्याला हुसकावून लावले आणि बालकाची सुटका केली. या संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून ते सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. जखमी बालकाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात रेबीज…

Read More

भुसावळ प्रतिनिधी | शहरालगत असलेल्या झेडटीआरआय बोगद्याजवळील मंदिरातील मुख्य पुजाऱ्याची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी २९ जून सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे भुसावळ शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. संतोष रघुवीर मंचल (वय ५५, रा. झेडटीआरआय परिसर, भुसावळ) असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे. ते आरपीडी मार्गालगत लष्करी डेपोपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील तीन मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून नियमित पूजा-अर्चा करत होते.सोमवारी सकाळी त्यांच्या कुटुंबीयांनी मंदिरात भेट दिली असता संतोष मंचल यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून…

Read More

जळगाव प्रतिनिधी | शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान नगरातील रामेश्वर कॉलनी येथे राहणारे रामेश्वर चव्हाण हे पत्नी व दीड वर्षीय मुलगा हर्षीत यांच्यासह वास्तव्यास आहेत. ते शहरातील एका खासगी रुग्णालयात नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शनिवारी (दि. २७ जून) दुपारच्या सुमारास घरासमोर पाणी सांडल्यामुळे तिसऱ्या मजल्यावरील जागा ओली झाली होती. याचवेळी घरासमोर खेळत असलेल्या दीड वर्षीय हर्षीत रामेश्वर चव्हाण याचा ओल्या फरशीवर पाय घसरला आणि तो थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला.…

Read More

जळगाव प्रतिनिधी | शहरातील हरी विठ्ठल नगर परिसरातील तडवीवाडा येथे राहणाऱ्या एका ४० वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवारी २९ जून सकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनील हिरामण बोरसे (वय ४०, रा. तडवीवाडा, हरी विठ्ठल नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुनील बोरसे हे पत्नी मायाबाई आणि दोन मुलांसह वास्तव्यास होते. पती-पत्नी दोघेही जैन कंपनीत कामाला जात होते. सोमवारी सकाळी मायाबाई बोरसे या नेहमीप्रमाणे…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली असून पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. २९, ३० जून तसेच २ जुलै रोजी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, १, ३, ४ आणि ५ जुलै रोजीही जिल्ह्यात पावसाची उपस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २३ जूनपासून जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाल्याने अनेक भागांत पावसाची…

Read More

रावेर प्रतिनिधी | तालुक्यातील रायपूर येथील जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून शाळेकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात चिखल आणि खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठी गैरसोय होत होती. या समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब गावाचे माजी सरपंच रुपेश पाटील यांच्या निदर्शनास पालकांनी आणून दिली. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी तातडीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. याची गंभीर दखल घेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोणताही विलंब न करता स्वखर्चातून मुरूम टाकून शाळेकडे जाणारा रस्ता तयार करून दिला. रस्ता तयार झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आता सुरक्षित आणि सुलभ…

Read More