Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»ब्रेकींग न्यूज : महिलेवर सामूहिक बलात्कार करून व्हिडिओ केला व्हायरल; १४ आरोपी अटक

जळगाव

ब्रेकींग न्यूज : महिलेवर सामूहिक बलात्कार करून व्हिडिओ केला व्हायरल; १४ आरोपी अटक

Editorial DeskBy Editorial DeskJune 29, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जामनेर प्रतिनिधी । जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार (गॅंगरेप) झाल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला असून, पोलिसांनी तत्परता दाखवत १५ पैकी १४ मुख्य व सह-आरोपींना जेरबंद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही काळिमा फासणारी घटना २ जून रोजी घडली. पीडित ४० वर्षीय महिला तिच्या परिचयातील मित्रासोबत जात असताना, देऊळगाव-कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळील निर्जन जंगल परिसरात दोन नराधमांनी तिला गाठले. त्या नराधमांनी मित्रासमोरच पीडित महिलेवर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला. संतापजनक बाब म्हणजे, हा अत्याचार सुरू असताना तिथे उपस्थित असलेल्या इतर सह-आरोपींनी या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण (व्हिडिओ) केले.

व्हिडिओ व्हायरल झाल्याने उडाली खळबळ :
घटना घडल्यानंतर काही दिवस हे प्रकरण दाबले गेले होते. मात्र, या प्रकरणातील एका संशयित आरोपीने अत्याचाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ समोर येताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली आणि संतापाची लाट उसळली. घटनेची गांभीर्याने दखल घेत फत्तेपूर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

पोलिसांची धडक कारवाई :
पोलिसांनी नवीन कायद्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७०(१), ७७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ आणि ६७ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणात एकूण १५ आरोपी निष्पन्न केले असून, त्यापैकी १४ जणांना अटक केली आहे. या घटनेतील एक आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्याचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. अशी माहिती विभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add