रावेर प्रतिनिधी । रावेर शहरातून वाहणाऱ्या नागझिरी नदीला काल आलेल्या पहिल्याच पुरामुळे नगरपालिकेच्या नालेसफाई आणि गाळ काढण्याच्या संथ कारभाराचे वाभाडे निघाले आहेत. यावर्षी नदीची साफसफाई व गाळ काढण्यासाठी पालिकेने सुमारे ३० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती. मात्र, प्रत्यक्ष कामात झालेल्या कमालीच्या दिरंगाईमुळे पहिल्याच पावसात शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून, पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या पालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यामुळे या कामांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचा आरोप केला जात आहे. नागझिरी नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येत असल्याने नदीचे खोलीकरण व गाळ काढण्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु, यंदा शहरातील संभाजी चौक, पंचशील चौक आणि सावदा रोड…
Author: Editorial Desk
यावल प्रतिनिधी । नाशिक वन्यजीव वनविभागांतर्गत समृद्ध आणि सुंदर वनसंपदा लाभलेल्या यावल वन्यजीव अभयारण्यात वनविभागाने तस्करीविरुद्ध एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. अभयारण्यातील जामन्या वन्यजीव वनक्षेत्रातून तस्करांनी चोरून आणलेला आणि तस्करीच्या तयारीत असलेला सागवान इमारती लाकडाचा मोठा साठा वनविभागाच्या पथकाने जप्त केला आहे. जामन्या वनपरीक्षेत्रातंर्गत परिसरातून अवैधरित्या सागवानाची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, वनक्षेत्रपाल (RFO) रूपेश दूसाने यांनी तातडीने पावले उचलत कर्मचाऱ्यांना संपूर्ण वनपरिक्षेत्रात कडक गस्त घालण्याचे व बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, बुधवारी दुपारी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना अतिसंवेदनशील वनक्षेत्रात सागवान लाकडाचा मोठा साठा लपवून ठेवलेला आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार,…
चोपडा प्रतिनिधी । व्याजाच्या पैशांच्या वसुलीसाठी वारंवार फोन करून शिवीगाळ, धमक्या आणि तीव्र मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत लोणी पंचक सजाचे तलाठी अरविंद लिलाधर जाधव यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या फिर्यादीवरून दोन पत्रकारांसह नऊ संशयित आरोपींविरुद्ध सावकारी स्वरूपाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून तलाठ्याने स्वतःला इजा करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद लिलाधर जाधव (वय ३२, रा. शिवकॉलनी, चोपडा) हे चोपडा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत आहेत. वैयक्तिक व कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी काही व्यक्तींकडून रोख तसेच ऑनलाइन माध्यमातून पैसे घेतले होते. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी मूळ…
जामनेर प्रतिनिधी । यावर्षी शेतीच्या मशागतीची सर्व कामे आटोपून शेतकरी बांधव मोठ्या आतुरतेने पावसाची प्रतीक्षा करत होते. यंदाही पावसाचे आगमन विलंबाने झाले असले, तरी काही दिवसांपूर्वी झालेल्या समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुखावला होता. मात्र, जामनेर तालुक्यातील वाकी बुद्रुक येथील एका शेतकऱ्यासाठी हा पाऊस नुकसानीचा ठरला आहे. येथील शेतकरी संजय निमचंद तेली यांच्या शेततळ्याची एक बाजू काल झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेली. शेततळे फुटल्यामुळे पाण्याचा आणि मातीचा प्रचंड भराव थेट शेजारीच असलेल्या विहिरीत गेल्याने विहीर पूर्णपणे खचली व बुजली आहे. यामुळे शेतकरी संजय तेली यांच्यासमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या आरोपानुसार, “शेततळे तयार करताना कामाच्या गुणवत्तेकडे पूर्णपणे दुर्लक्ष…
मुक्ताईनगर प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यात आज झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अंतुर्ली, कर्कीसह तालुक्याच्या अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पहिल्याच दमदार पावसाने तालुक्याची दाणादाण उडवली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मुसळधार पावसामुळे कर्की येथे एक थरारक घटना घडली. येथे एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आलेली खाजगी बस नाल्याला अचानक आलेल्या पुरात अडकली. नाल्यावरून पाण्याचा मोठा प्रवाह वाहत असताना चालकाने प्रसंगावधान राखले आणि योग्य वेळी बस थांबवली. चालकाच्या या तत्परतेमुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आणि एक मोठा अनर्थ टळला. या सुरक्षित सुटकेनंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, या पावसामुळे अनेक सखल भागांतील घरांमध्ये…
जळगाव प्रतिनिधी | आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त महाराष्ट्र योग शिक्षक संघ, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला योग महाउत्सव रविवारी २१ जून उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. योगप्रेमी, विद्यार्थी, पालक आणि विविध वयोगटातील स्पर्धकांच्या मोठ्या सहभागामुळे हा महाउत्सव यशस्वी ठरला. महाउत्सवानिमित्त योग नृत्य, योग चित्रकला, योगासन, योगसूत्रपठण आणि योग गीत अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपल्या उत्कृष्ट कलागुणांसह योगकौशल्याचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण योग सप्ताहात जळगावसह जिल्ह्यातील विविध भागांतून सुमारे ३०० ते ३५० स्पर्धक आणि योगसाधकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्हे तसेच सुमारे ४५ हजार रुपयांची रोख…
भडगाव प्रतिनिधी । निसर्गाची किमया खरोखरच न्यारी असते याचा प्रत्यय भडगाव तालुक्यातील वाडे येथे आला आहे. येथे एका केळीच्या झाडाला एक नव्हे तर तब्बल २०० हून अधिक कंबळ लागल्याचा अद्भूत चमत्कार घडला आहे. या अनोख्या निसर्गाच्या चमत्काराची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील वाडे येथील प्रगतीशील शेतकरी शांताराम भगवान गोठवाळ यांनी आपल्या शेतात १ एकर क्षेत्रात केळी पिकाची लागवड केली आहे. अत्यंत मेहनत आणि कष्टाने त्यांनी ही केळीची बाग फुलविली आहे. सध्या ही बाग घडांनी चांगलीच बहरली आहे. मात्र, या बागेतील एका केळीच्या झाडाला चक्क एक नव्हे तर २१४ केळीचे कंबळ लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.…
चाळीसगाव प्रतिनिधी । शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चाळीसगाव शहर पोलिसांनी २४ जून २०२६ रोजी मध्यरात्री २.०० ते पहाटे ४.०० वाजेच्या दरम्यान एक अत्यंत महत्त्वाची आणि धडक ‘कोंबिंग ऑपरेशन’ मोहीम राबवली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल ८० रेकॉर्डवरील आरोपींची कसून तपासणी केली. त्यापैकी ४४ आरोपी हे त्यांच्या घरी मिळून आल्याने त्यांना तात्काळ पोलीस ठाण्यात आणून कडक समज देण्यात आली आहे. या मोहिमेत पोलिसांना सर्वात मोठे यश नवनाथ नगर (धुळे रोड) भागात आले. येथील एका भाड्याच्या घरातून आरती किरण देढे आणि महेंद्र रंगनाथ हतांगळे हे दोघे विक्रीच्या उद्देशाने १८ तलवारी आणि १० कोयत्यांसारखी धारदार शस्त्रे बाळगताना रंगेहात पकडले गेले. त्यांच्याविरोधात…
रावेर प्रतिनिधी । पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रावेर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पहिल्याच दमदार पावसाने रावेर नगरपालिकेच्या पावसाळापूर्व तयारीच्या दाव्यांची पोलखोल केली असून, ३० लाख रुपये मंजूर करून सुरू असलेल्या नाले व पावसाळी व्यवस्थापनाच्या कामांचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. तालुक्यातील भोकर, नागोई, नागझिरी आणि मात्रण नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. नागझिरी नदीला आलेल्या पुरामुळे रस्त्यावर पाणी साचून काही काळ वाहतूक बंद ठेवावी लागली. त्यातच अंकलेश्वर–बुऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गालगत एक भलेमोठे झाड कोसळल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. दुपारपासून शहराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. शहरातील रस्ते, गल्लीबोळ आणि सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ…
जळगाव प्रतिनिधी । प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समाजात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील सुरवाडा येथील रहिवासी डॉ. प्रीतीश गणेश चौधरी यांना यंदाच्या प्रतिष्ठेच्या ‘नियतीचे चक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर नुकताच हा दिमाखदार सोहळा पार पडला. अमृता फडणवीस यांच्या ‘दिव्याज फाउंडेशन’ आणि ‘भारतीय जैन संघटना’ यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी या विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत संघर्ष करून यश मिळवणाऱ्या निवडक व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिव्याज फाउंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस आणि भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलालजी मुथा आदी…

