Author: Editorial Desk

रावेर प्रतिनिधी । रावेर येथील पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत दोन अट्टल दुचाकी चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण २५,००० रुपये किमतीच्या दोन मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या असून, आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुसुंबा ता. रावेर येथील रहिवासी अतुल अर्जुन महाजन (वय ४२) हे २३ जून रोजी दुपारी रावेर शहरातील मराठा मंगल कार्यालय येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. लग्न आटोपून बाहेर आले असता, त्यांची १५,००० रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा युनिकॉन मोटारसायकल (क्र. MH-19-DT-7111) चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. सर्वत्र शोध घेऊनही गाडी न मिळाल्याने त्यांनी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरात घरगुती विहिरीतील इलेक्ट्रिक मोटार काढण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात आजोबा, नातू आणि शेजारील तरुण विहिरीत पडल्याची घटना बुधवारी (२४ जून) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत आजोबा आणि नातू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शेजारील तरुण किरकोळ जखमी झाला आहे. रामलाल हिरामण भावसार (वय ९१), त्यांचा नातू सिद्धेश महेंद्र भावसार (वय २२) आणि शेजारी राहणारा देवेंद्र राजेंद्र खाचणे (वय २२) हे घरातील सुमारे ५० फूट खोल विहिरीत बसविण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटार बाहेर काढत होते. यावेळी विहिरीवरील सिमेंटची धाप अचानक वजन सहन न झाल्याने तुटली आणि…

Read More

मुक्ताईनगर प्रतिनिधी  | संत श्रीमुक्ताई महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या भव्य आणि आकर्षक रथाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रस्थान दिनी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी प्रस्थान सोहळ्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या चर्चेत दिलेले आश्वासन त्यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरवल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान आज २४ जून रोजी मुक्ताई पालखीचे प्रस्थान होणार असल्या कारणामुळे आज या पालखीचे मान्यवरांच्या हस्ते लोकांपर्यंत करण्यात येणार आहे. गतवर्षी संत श्रीमुक्ताई यांच्या प्रस्थान सोहळ्यास उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आल्यानंतर व्यस्त दौरा असूनही एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथे उपस्थित राहून संत मुक्ताईंचे दर्शन घेतले आणि भाविकांशी संवाद साधला होता. याच वेळी संत मुक्ताबाईंच्या पालखीचा…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने २२ जून रोजी एक विशेष मोहीम राबवली. या धडक कारवाईत पोलिसांनी नियम तोडणाऱ्या शेकडो लोकांवर गुन्हे दाखल करत तब्बल ५ लाख १६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत ढिवरे यांनी दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांची धरपकड : सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या तळीरामांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. या कारवाई दरम्यान मोकळ्या मैदानावर दारू पिणाऱ्या ४१ जणांवर, वाईन शॉपसमोर दारू पिणाऱ्या ५ जणांवर, तर खाद्य स्टॉलसमोर दारू पिणाऱ्या २ जणांवर थेट कारवाई करण्यात आली.…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील गुरांच्या बाजाराजवळील सेक्टर एन-५ परिसरात असलेल्या अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीज कंपनीमध्ये मंगळवारी (दि. २३) सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. याबाबत श्री. जितेंद्र अग्रवाल यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या परिसरात लागलेल्या आगीत तेल, पुठ्ठा, बॉयलर, पंखे तसेच रूममधील इतर साहित्य जळून नुकसान झाले. आग वेगाने पसरत असताना अग्निशमन दलाने तत्परतेने पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे विझवली. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठी…

Read More

चोपडा प्रतिनिधी | विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेविषयीची भीती दूर करून शिक्षणाबद्दल आत्मीयता आणि आकर्षण निर्माण करण्याच्या उद्देशाने धनाजी नाना प्राथमिक तसेच डी.आर.बी. माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, सत्रासेन येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करत प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रवेशोत्सवानिमित्त इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांची पारंपरिक बैलगाडीतून गावातून स्वागत मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या घोषणा देत नागरिकांना शालेय शिक्षणाबाबत जनजागृती केली. प्रत्येक विद्यार्थी नियमित शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेईल, हा संदेश या मिरवणुकीतून देण्यात आला. कार्यक्रमाला आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे…

Read More

जळगाव प्रतिनिधी | ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर जळगावात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला. सोमवारी सायंकाळी शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात सहा खासदारांच्या प्रतिमांवर दुग्धाभिषेक करून कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून संबंधित खासदारांवर विविध स्तरांतून टीका करण्यात येत होती. तसेच त्यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्याला उत्तर म्हणून दुग्धाभिषेकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत खासदारांप्रती आपला पाठिंबा व्यक्त केला. “हे खासदार आमचा अभिमान आहेत. त्यांच्यावर झालेल्या टीकेला आम्ही सकारात्मक…

Read More

धरणगाव प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील पाळधीनजीक सावदा-रिंगणगाव मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (२२ जून) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातात किरण बाबूलाल राक्षे-मराठे (वय ३८, रा. पथराड, ता. धरणगाव), चेतन भिकन पाटील (वय ३५, रा. वाडेगुडे, ता. भडगाव) आणि प्रदीप उखा निकम (वय ४०, रा. गोंदेगाव-निंभोरा, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाबूलाल राक्षे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, किरण राक्षे हे पद्मालय येथे लग्न समारंभासाठी गेले होते.…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगा शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा अचानक ‘ॲक्शन मोड’मध्ये आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी दिलेल्या कडक आदेशानुसार, आज सायंकाळपासून संपूर्ण शहर आणि परिसरात एकाच वेळी धडक मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. या मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आणि नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या मोहिमेत प्रामुख्याने वाईन शॉपसमोरील परिसर, मोकळी मैदाने आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर (स्टॉल्स) उघड्यावर दारू पिणाऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल केले जात आहेत. तसेच, महामार्गावरील (हायवे) परवाना नसलेली हॉटेल्स आणि धाब्यांवर बेकायदेशीरपणे दारू पिणाऱ्यांवर आणि पाजणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शाळा, कॉलेज…

Read More

जामनेर-प्रतिनिधी : आगामी काळातील राजकीय घडामोडी आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीने जळगाव जिल्ह्यात आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून जामनेर शहर व तालुका संघटन बांधणी आणि आढावा बैठक २० जून रोजी उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत तालुक्यात पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट करण्याचा आणि युवकांना मोठ्या प्रमाणात संघटित करण्याचा निर्धार करण्यात आला. या महत्त्वपूर्ण बैठकीला वंचित बहुजन युवक आघाडीचे जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल इंगळे, जिल्हा संघटक बबन कांबळे आणि ॲड. राजू मोगरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संघटन कौशल्याचे महत्त्व पटवून दिले आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील…

Read More