रावेर प्रतिनिधी | मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला रावेर तालुक्यातील सकल मराठा समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत तहसीलदारांना निवेदन देत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आपला ठाम पाठिंबा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी आग्रही भूमिका यावेळी मांडण्यात आली.
निवेदन देताना माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीप पाटील, मराठा समाज तालुकाध्यक्ष उमाकांत महाजन, दीपक पाटील, मराठा सेवा संघाचे प्रशांत पाटील, घनश्याम पाटील, पत्रकार शालिक महाजन, बाजार समिती संचालक गणेश महाजन, नगरसेवक राजू ठेकेदार, डॉ. सुरेश पाटील, सी. एस. पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाचे नागरिक उपस्थित होते.



