चाळीसगाव प्रतिनिधी । राज्याचे जलसंपदा मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आलेले कथित बनावट व मॉर्फ फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी केली जात असल्याचा आरोप करत संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या चाळीसगाव तालुक्यातील पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी केली आहे.याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक संदीप घुले यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, गेल्या दोन दिवसांपासून व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया माध्यमांवर एआयच्या साहाय्याने तयार करण्यात आलेले दिशाभूल करणारे फोटो प्रसारित केले जात असून, त्यामागे संबंधितांची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणाची सखोल…
Author: Editorial Desk
जळगाव-प्रतिनिधी । मद्याच्या नशेत स्वतःवरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला तोंडावर पडून एका २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये उघडकीस आली आहे. ज्ञानेश्वर बारकू नारोळे (रा. खंडेरावनगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुरुवातीला तरुणाच्या चेहऱ्यावरील गंभीर जखमा पाहून घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता, मात्र पोलिसांनी केलेल्या कसून तपासात अतिमद्यसेवनामुळे तोल जाऊन पडल्यानेच हा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घटना सोमवार, २२ जून रोजी सकाळी आशाबाबा नगरकडे येणाऱ्या रस्त्यावर समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर नारोळे हा गेल्या काही वर्षांपासून बाहेरगावी आपल्या नातेवाइकांकडे राहत होता. दोन दिवसांपूर्वीच तो जळगावात राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी आला होता. रविवारी (२१…
जामनेर-प्रतिनिधी । शासकीय योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिरीचे पुढील अनुदान मिळवून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जामनेर पंचायत समितीच्या कंत्राटी तांत्रिक सहाय्यकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) असे लाच मागणी करणाऱ्या लोकसेवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळ तक्रारदार यांची जामनेर शिवारात शेती असून, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (सन २०२१-२२ व २०२२-२३) त्यांची सिंचन विहीर मंजूर झाली होती. या विहिरीची स्थळपाहणी करण्यापूर्वीच सागर नावकर याने रोजगार सेवकामार्फत तक्रारदाराकडून ३० हजार ३०० रुपये स्वीकारले होते व स्थळपाहणी करून फोटो काढले होते. त्यानंतर तक्रारदाराला वेळोवेळी एकूण ६०…
रावेर प्रतिनिधी । राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झाले असून, रावेर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या नजरा आता नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर महाजन यांच्याकडे लागल्या आहेत. निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला या अधिवेशनाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आपल्या व्यथा आणि वेदना आमदार महाजन यांच्या माध्यमातून थेट विधिमंडळात मांडल्या जातील आणि सरकारकडून ठोस मदत मिळेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. रावेर तालुका हा प्रामुख्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांचा गड म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांचे जगणे असह्य केले आहे. यंदाही पावसाच्या अनियमिततेमुळे विहिरींची पाण्याची पातळी कमालीची खालावली असून पिकांसमोर पाण्याचे मोठे संकट उभे ठाकले…
नशिराबाद प्रतिनिधी | येथील खंडेराव मंदिर परिसरात कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, मंदाबाई जाधव यांच्यावर त्यांचे पती विकास जाधव यांनी कौटुंबिक कारणावरून संतापाच्या भरात कोयत्याने मानेवर वार केले. या हल्ल्यात मंदाबाई गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला. हत्येनंतर आरोपी विकास जाधव घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवत त्याला अल्पावधीतच…
अमळनेर प्रतिनिधी | शहरातील जिनगर गल्ली परिसरात घरमालक साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल ८ लाख ६६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकता नगरातील रहिवासी छगन चुडामन बिऱ्हाडे हे नातेवाईकांच्या साखरपुड्यानिमित्त २० जून रोजी रात्री सुरत येथे गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या नातेवाईकांनी घराचे कुलूप तुटल्याची माहिती फोनवर दिली. त्यानंतर ते तातडीने अमळनेरला परतले. घराची पाहणी केली असता दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील कपाटांचे कुलूप तोडून त्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. चोरी झालेल्या ऐवजात सोन्याची पोत, पेंडल, चपला हार,…
अमळनेर प्रतिनिधी | जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून त्यांची बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप करत संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी खासदार स्मिता वाघ यांचीही उपस्थिती होती. भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन यांचे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेले मॉर्फ फोटो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही व्यक्तींमार्फत प्रसारित केले जात आहेत. या माध्यमातून एका लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असून, यामागील संबंधितांचा शोध घेऊन…
जळगाव प्रतिनिधी | महानगरपालिका शाळांमधील शालेय पोषण आहार योजनेत घडलेला प्रकार अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करणारा ठरला आहे. शासनाच्या स्पष्ट निर्देशानुसार बचत गट किंवा समाजातील गरीब-गरजू महिलांच्या माध्यमातून शिजवलेला पोषण आहार विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक असताना, जळगाव शहरातील अनेक मनपा शाळांमध्ये सलग तीन दिवस हा नियम धाब्यावर बसवण्यात आला. बचत गटांना डावलून एका खाजगी ठेकेदारामार्फत विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ वितरित करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे हा निर्णय नेमका कुणाच्या आदेशावर झाला, याचे उत्तर अद्याप अस्पष्ट आहे. शैक्षणिक वर्तुळात एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तोंडी सूचनेवर हा प्रकार राबवण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या कथित सूचनेमागे नेमका कोणता अधिकारी होता, याबाबत…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांचा ५७७ मतांनी पराभव केला. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर नंदकिशोर महाजन यांच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील एकूण ६३० मतदारांपैकी ६१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतमोजणीदरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी काही वैध मते अवैध ठरवण्यात आल्याचा आरोप करत मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. त्यांनी…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यात थेट लढत झाल्याने या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणीची प्रक्रिया तीन टेबलवर राबविण्यात येत असून बॅलेट पेपरवरील मतांची टप्प्याटप्प्याने मोजणी केली जात आहे. मतमोजणी केंद्र परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या निगराणीखाली पार पडत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे करण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष निकालातून…

