Author: Editorial Desk

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव शहरातील मातोश्री नगर भागात एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरनी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकर कृष्णा महाजन (वय ६६, रा. मातोश्री नगर, धरणगाव) हे आपल्या कुटुंबासह येथे राहतात. महाजन हे शिक्षण क्षेत्रातून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. दि. १७ जून ते १८ जून दरम्यान महाजन यांचे कुटुंब काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घर बंद असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. ​चोरट्यांनी घरातील…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी | शहरातील नारायण वाडी परिसरात एका तरुणाची दगडाने डोके ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव अक्षय पाटील असे असून, ही घटना मध्यरात्री १ ते १.३० वाजेच्या दरम्यान घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. प्राथमिक तपासानुसार, बसस्थानक परिसरात वाहन उभे करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाद विकोपाला गेल्यानंतर अज्ञात संशयितांनी अक्षय पाटील यांच्यावर दगडाने जीवघेणा हल्ला केला. डोक्यावर गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलीस…

Read More

जळगाव प्रतिनिधी | आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त महाराष्ट्र योग शिक्षक संघ, जळगाव यांच्या वतीने आयोजित योगासन स्पर्धेला योगप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विश्व मंगल योग व निसर्गोपचार केंद्र येथे बुधवारी (दि. 17 जून) सकाळी झालेल्या या स्पर्धेत जळगाव, शिरपूर आणि पुणे येथील योगसाधकांनी सहभाग घेत विविध योगासनांचे प्रभावी सादरीकरण केले. कार्यक्रमाची सुरुवात ओंकार प्रतिमापूजन, पतंजली पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी राज्य कार्यकारी अध्यक्ष कृणाल महाजन, विभाग प्रमुख सुनील गुरव, जिल्हाध्यक्ष चित्रा महाजन तसेच कोषाध्यक्ष नूतन जोशी उपस्थित होते. स्पर्धेत विविध वयोगटातील स्पर्धकांनी संतुलन, लवचिकता, एकाग्रता आणि शारीरिक क्षमता यांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत उपस्थितांची दाद मिळवली. योगशिक्षिका हेमांगीनी सोनवणे, सुनील गुरव,…

Read More

जळगाव महालाईव्ह न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका हॉटेल चालकावर आणि त्यांच्या मित्रावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कानळदा रोडवरील राधा रमण अपार्टमेंटच्या गेटजवळ घडली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश गोपाळ साळी (वय ३८, रा. हरिओम नगर, कानळदा रोड) हे हॉटेल व्यावसायिक असून, ते १८ जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास राधा रमण अपार्टमेंटच्या गेटजवळ फिरत होते. दरम्यान, तेथून जाणाऱ्या एका मालवाहू गाडीतून (क्र. MH-04-HD-7529) प्रचंड घाण वास येत होता. त्यामुळे योगेश साळी यांनी “गाडीमध्ये काय आहे, इतका घाण वास का येतोय?” अशी…

Read More

जळगाव महालाईव्ह न्यूज प्रतिनिधी । “आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६” चे औचित्य साधून महाराष्ट्र योग शिक्षक संघ, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘योग गीत स्पर्धेला’ जळगावकरांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गुरुवार, १८ जून रोजी श्रीधर नगर येथील योग शिक्षक श्री. सुनील गुरव यांच्या योग हॉलमध्ये हा स्पर्धात्मक कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि भारावून टाकणाऱ्या वातावरणात संपन्न झाला. या स्पर्धेत विविध वयोगटातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. स्पर्धकांनी योग, आरोग्य, सुसंस्कार आणि समृद्ध भारतीय संस्कृती या विषयांवर आधारित एकापेक्षा एक सरस योगगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या संगीतमय सादरीकरणाला उपस्थित साधक, पालक आणि योगप्रेमींकडून टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळाली. स्पर्धेचे अचूक…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील मेहरूण तलाव परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू वस्तीत घरकाम करणाऱ्या महिलेनेच आपल्या साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत संशयित महिला आणि तिच्या मध्य प्रदेशातील साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ४ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मेहरूण तलाव जवळील ‘लेकसाईड रेसिडेन्सी’ मध्ये राहणाऱ्या गृहिणी सौ. सुधा प्रभुनाथ कावरा (वय ५१) यांच्या घरातून तसेच त्यांच्या समोर राहणाऱ्या तेजल संचेती यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. सौ. कावरा यांनी त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या…

Read More

जळगाव प्रतिनिधी । राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेले अथवा मॉर्फ केलेले बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून त्यासोबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू झाली आहे. जळगाव सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 17/2026 नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 356 आणि 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 66(C) आणि 67 अंतर्गत संबंधितांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फेसबुक खात्यावरून मंत्री गिरीश महाजन यांचे AI-निर्मित अथवा संगणकीय पद्धतीने मॉर्फ…

Read More

जळगाव प्रतिनिधी | शहरालगत असलेल्या सुप्रीम कॉलनीच्या मागील बाजूस डुब्बन नगरी परिसरात शुक्रवारी प्लास्टिकच्या कच्च्या मालाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत प्लास्टिकचे दाणे तसेच खुर्च्या, चपला आणि इतर प्लास्टिक वस्तू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील कच्चा माल जळून खाक झाला. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठिकाणी मोकळ्या मैदानात शेकडो टन प्लास्टिक कच्चा माल साठवून ठेवण्यात आला होता. या परिसरातील वीज वितरणाच्या डीपीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ठिणग्या उडाल्या आणि त्यातून प्लास्टिकच्या साठ्याने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्लास्टिक ज्वलनशील असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे…

Read More

मुक्ताईनगर प्रतिनिधी | जळगाव जिल्हा पोलिसांनी मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा, मधपुरी आणि लालमाटोटा या गावांमध्ये पहाटेच्या सुमारास राबविलेल्या ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ या विशेष मोहिमेद्वारे मोठी कारवाई करत अनेक संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दुर्मिळ वस्तू, जुनी नाणी, सोन्या-चांदीच्या वस्तू तसेच मौल्यवान खजिना मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर ही कारवाई करण्यात आली. मुक्ताईनगर पोलिसांच्या हद्दीतील या गावांमधून मागील काही वर्षांत फसवणूक, जबरी चोरी, दरोडे आणि इतर गंभीर गुन्ह्यांच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध धाडसत्र राबविले.…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जळगाव ग्रामीण मतदारसंघातील सावखेडा शिवार, कोल्हे हिल्स परिसर, वाघ नगर, माऊली नगर आणि परिसरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागात तब्बल पंधरा दिवसांनी केवळ अर्धा तास पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करत संतप्त महिलांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. वंचित बहुजन युवा आघाडीच्या नेतृत्वाखाली काव्यरत्नावली चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा विविध घोषणांनी दणाणून गेला. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी रिकामे हंडे हातात घेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला.…

Read More