Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जळगावात योग गीत स्पर्धेला योगप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सुरेल सुरांनी जिंकली उपस्थितांची मने!

जळगाव

जळगावात योग गीत स्पर्धेला योगप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सुरेल सुरांनी जिंकली उपस्थितांची मने!

Editorial DeskBy Editorial DeskJune 19, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव महालाईव्ह न्यूज प्रतिनिधी । “आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६” चे औचित्य साधून महाराष्ट्र योग शिक्षक संघ, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘योग गीत स्पर्धेला’ जळगावकरांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गुरुवार, १८ जून रोजी श्रीधर नगर येथील योग शिक्षक श्री. सुनील गुरव यांच्या योग हॉलमध्ये हा स्पर्धात्मक कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि भारावून टाकणाऱ्या वातावरणात संपन्न झाला.

या स्पर्धेत विविध वयोगटातील स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. स्पर्धकांनी योग, आरोग्य, सुसंस्कार आणि समृद्ध भारतीय संस्कृती या विषयांवर आधारित एकापेक्षा एक सरस योगगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या संगीतमय सादरीकरणाला उपस्थित साधक, पालक आणि योगप्रेमींकडून टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळाली. स्पर्धेचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी परीक्षक म्हणून संगीत विशारद वरुण नेवे आणि मृदुला कुलकर्णी उपस्थित होते. त्यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करताना शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग व संगीत यांचा सुंदर संगम जपण्याचे आवाहन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्पर्धा समिती प्रमुख योग शिक्षक सुनील गुरव, तसेच सदस्य अनंत महाजन, निलेश वाघ आणि कविता चोपडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन योग शिक्षिका अर्चना गुरव यांनी केले.

याप्रसंगी महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. कृणाल महाजन, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख सुनील गुरव, जळगाव जिल्हाध्यक्षा सौ. चित्रा महाजन, उपाध्यक्षा सौ. अर्चना गुरव, कोषाध्यक्षा नूतन जोशी, लीगल सेल अधिकारी ॲड. स्वाती निकम, डॉ. भावना चौधरी, मीडिया प्रभारी योग शिक्षक रोहन चौधरी यांच्यासह संघाचे अनेक मान्यवर सदस्य उपस्थित होते.

महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे शहरात योगविषयक जनजागृतीस मोठी चालना मिळाली असून, सहभागींचा उत्साह द्विगुणित झाला आहे. दरम्यान, या स्पर्धेचा अंतिम निकाल आणि बक्षीस वितरण सोहळा २१ जून रोजी रोटरी हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add