Author: Editorial Desk

​मुक्ताईनगर प्रतिनिधी | ॲल्युमिनियम स्क्रॅप देण्याच्या बहाण्याने बोलावून एका भंगार व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा शिवारात घडली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात २० ते २५ जणांच्या टोळीविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील रहिवासी आणि भंगार व्यावसायिक अन्सारी हे त्यांचे मित्र आणि मुलासह ८ जून २०२६ रोजी सकाळी मुक्ताईनगरमधील हलखेडा गावी आले होते. आरोपी शिवा नावाच्या इसमाने त्यांना भंगार देण्याचे आमिष दाखवून येथे बोलावले होते. मात्र, ते घटनास्थळी पोहोचताच आरोपी शिवा आणि त्याच्या इतर १५ ते २० साथीदारांनी फिर्यादी व त्यांच्या सोबत्यांना घेरले. शिवा आणि त्याच्या साथीदारांनी अन्सारी…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जळगाव विधान परिषद निवडणुकीतील एका जागेसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली. जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान सुरू असून संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. या निवडणुकीत एकूण ६३० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये ३१५ पुरुष आणि ३१५ महिला मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यात मुख्य लढत होत आहे. अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी उमेदवारी मागे घेतली असून बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मंत्री गिरीश…

Read More

जळगाव प्रतिनिधी | शहरातील तांबापुरा परिसरातील बिस्मिला चौकात मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर तुफान दगडफेकीत झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. महिला आणि एका तरुणामधील किरकोळ वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास झालेल्या वादानंतर दोन्ही गटांतील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमा झाले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून घरांच्या काचा, दरवाजे व अन्य साहित्याची तोडफोड झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संतप्त…

Read More

जळगाव प्रतिनिधी | विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिक रंगतदार आणि चुरशीचे होत चालले आहे. महायुतीतील घटक पक्ष वरवर एकजूट असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. या राजकीय घडामोडींमुळे निवडणुकीचे संपूर्ण गणित बदलण्याची शक्यता व्यक्त होत असून, महायुतीतील या कलहाचा सर्वाधिक फायदा अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांना होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ​निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी, नंदकिशोर महाजन हे मंत्री गिरीश महाजन यांचे उमेदवार असल्याचे विधान केले होते. या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच, गिरीश…

Read More

नशिराबाद प्रतिनिधी | विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी नशिराबाद येथे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील आणि उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक उपस्थित होते. भेटीदरम्यान नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी नंदकिशोर महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले. विकासाभिमुख नेतृत्वाला संधी द्या : नगराध्यक्ष योगेश पाटीलनंदकिशोर महाजन यांच्या नेतृत्वाबद्दल बोलताना नगराध्यक्ष योगेश पाटील म्हणाले, “नंदकिशोर महाजन हे विकासाभिमुख नेतृत्व करणारे…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव शहरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली असून, एका संशयित इसमासह चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत सुमारे ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी राहुल सुभाष भिसे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने चोरीची मोटारसायकल विकल्याची कबुली दिल्यानंतर प्रशांत दीपक राजपूत यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली. तसेच या गुन्ह्याशी संबंधित आणखी एका संशयित इसमाकडून दुसरी…

Read More

​पाचोरा प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या कारवाईमुळे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम लुटण्याचा मोठा डाव फसला आहे. पोलिसांना वेळीच सुगावा लागल्याने चोरट्यांना रिकाम्या हाताने पळून जावे लागले असून, एटीएममधील ८ लाख ८९ हजार ७०० रुपयांची रोकड पूर्णपणे सुरक्षित आहे. याबाबत अद्याप पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. ​मध्यरात्री गॅस कटरने एटीएम फोडले :मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे पावणेचार वाजेच्या (३:४५) सुमारास पाचोरा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जारगाव येथील सारोळा रस्त्यावरील एसबीआयच्या एटीएमवर चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. तीन अज्ञात तरुण गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीनचे कॅबिनेट तोडत होते. त्यांनी पैशांनी भरलेले मुख्य कॅबिनेट तोडून ते…

Read More

​रावेर प्रतिनिधी | रावेर शहर आणि परिसरातील सामाजिक सलोखा व एकोपा अबाधित राखण्यासोबतच गुंडगिरी करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करणे आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करणे, याला आपले प्रथम प्राधान्य राहील, अशी ग्वाही नवनियुक्त पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेतून बदली झाल्यानंतर त्यांनी नुकताच रावेर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. ​पदभार स्वीकारताच संदीप पाटील यांनी आपल्या आक्रमक भूमिकेचे स्पष्ट संकेत दिले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. मूळचे धुळे जिल्ह्यातील असलेले संदीप पाटील यांना पोलीस दलातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी…

Read More

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा शहरातील लक्ष्मीआंगन कॉलनी परिसरात ऑनलाइन पार्सल देण्याचा बहाणा करून घरात घुसत महिलेसह तिच्या मुलांना नकली पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना पाचोरा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले ७ हजार ७०० रुपये आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेले नकली पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास चेतन उर्फ जितू प्रभाकर भुतेकर व त्याच्या दोन साथीदारांनी कुसुम एकनाथ मोकळे (रा. लक्ष्मीआंगन कॉलनी, पाचोरा) यांच्या घरी अमेझॉनचे पार्सल आल्याचे सांगत प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर एका आरोपीने कुसुम मोकळे व त्यांच्या दोन मुली आणि मुलाला एका ठिकाणी बसवून…

Read More

जळगाव प्रतिनिधी | विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला असून, मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर त्यांनी आपला मुख्य भर दिला आहे. महायुतीमधील सर्वच घटक पक्षांनी एकजुटीने त्यांच्या पाठीशी शक्ती उभी केल्याने महाजन यांचे पारडे जड झाल्याचे चित्र दिसत आहे. संख्याबळाचे गणित महायुतीच्या बाजूनेया निवडणुकीत महायुतीकडे स्पष्ट आणि भक्कम बहुमत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. मतदारसंघात पक्षीय बलाबल भारतीय जनता पक्षाचे २५२, शिवसेना शिंदे गटाचे १८६ तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे ३५ नगरसेवक जिल्ह्यात आहेत. या सर्व ४७३ हून अधिक नगरसेवकांनी महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या पाठीशी भक्कमपणे…

Read More