Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

जळगाव

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

Editorial DeskBy Editorial DeskJune 17, 2026Updated:June 17, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

नशिराबाद प्रतिनिधी | विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी नशिराबाद येथे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, नशिराबादचे नगराध्यक्ष योगेश पाटील आणि उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक उपस्थित होते. भेटीदरम्यान नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी नंदकिशोर महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत केले.

विकासाभिमुख नेतृत्वाला संधी द्या : नगराध्यक्ष योगेश पाटील
नंदकिशोर महाजन यांच्या नेतृत्वाबद्दल बोलताना नगराध्यक्ष योगेश पाटील म्हणाले, “नंदकिशोर महाजन हे विकासाभिमुख नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आहे. असे सक्षम नेतृत्व विधान परिषदेत गेल्यास शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांना नक्कीच न्याय मिळेल.”

*आमदार व जिल्हाध्यक्षांचे आवाहन*
या वेळी आमदार मंगेश चव्हाण यांनीही उपस्थित नगरसेवकांना नंदकिशोर महाजन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन केले. तसेच, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी उपस्थितांना मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. या भेटीमुळे नशिराबादमध्ये महायुतीच्या प्रचाराला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add