Author: Editorial Desk

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी नगरसेवक आणि नगराध्यक्षांना संबोधित करत, जळगाव जिल्हा हा महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रथमच प्रचार मेळाव्यात उपस्थिती लावली. मेळाव्यापूर्वी प्रमुख नेत्यांची कोर कमिटीची बैठकही पार पडली. ​मेळाव्यात बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “या निवडणुकीत पक्षाचे काम आता सोपे झाले आहे. येथील ५४ अपक्ष उमेदवार हे कोणत्याही इतर पक्षाचे नसून ते आपल्याच महायुतीचे आहेत. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवून महायुतीचा उमेदवार विजयी होईल, यात शंका नाही.”…

Read More

​रावेर प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील थेरोळे गावात अवैध दारू विक्री आणि हातभट्ट्यांच्या वाढत्या सुलतानी प्रकारांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. गावातील वाढत्या व्यसनाधीनतेबाबत ग्रामस्थांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाने ही धडक मोहीम राबवून बेकायदेशीर दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले. ​या धडक कारवाईदरम्यान पथकाने हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारा मोठ्या प्रमाणावर असलेला कच्चा माल, साहित्य आणि तयार दारूचा साठा जागीच जप्त करून तो पूर्णपणे नष्ट केला. गावातील तरुण पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवणे, अनेक कुटुंबांमधील सुख-शांती आणि स्वास्थ्य अबाधित राखणे, तसेच संपूर्ण गावाला व्यसनमुक्त करून एक निरोगी वातावरण उपलब्ध करून…

Read More

​भडगाव प्रतिनिधी | शहरातील यशवंतनगर भागात जुन्या वादातून एका महिलेवर हमालीसाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी हुकने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दि. १२ जून २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ​यशवंतनगर येथील रहिवासी कविता सुरेश पाटील आणि त्यांच्या घरासमोरच राहणारे अस्लम बिस्मिल्ला शेख व त्यांची पत्नी शमीन अस्लम शेख यांच्यात पूर्ववैमनस्य आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास या जुन्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. संशयितांनी कविता पाटील यांना आपल्या घरात बोलावून घेतले आणि लोखंडी हुकसदृश वस्तूने त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात…

Read More

​भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ येथील पंचशील नगर परिसरातील बंद घरात झालेल्या घरफोडीचा भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण २ लाख ४९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.​पंचशील नगरचे रहिवासी शुभम विनायक जामनकर (वय ३२) हे १८ मे ते ७ जून या कालावधीत बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून १ लाख ४६ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.…

Read More

पाचोरा, प्रतिनिधी | प्रशासकीय कामाच्या गडबडीत महत्त्वाच्या वस्तू गहाळ होण्याच्या घटना अनेकदा घडतात, मात्र समाजातील प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचे एका घटनेने दाखवून दिले आहे. पाचोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित ‘जनसमाधान अभियाना’दरम्यान एका नागरिकाचा हरवलेला महागडा मोबाईल एका पत्रकाराच्या प्रामाणिकपणामुळे सुखरूप परत मिळाला आहे. पत्रकार जाविद शेख यांच्या या संवेदनशील आणि प्रामाणिक कृत्याचे पाचोरा तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. ​पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील रहिवासी योगेश पाटील हे ११ जून रोजी आपल्या काही समस्या घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयात आले होते. तिथे सुरू असलेल्या जनसमाधान अभियानात अर्ज भरण्याच्या गडबडीत त्यांचा मोबाईल अनावधानाने एका ठिकाणी विसरला. अर्ज जमा करून निघाल्यानंतर त्यांना मोबाईल जवळ नसल्याचे…

Read More

भुसावळ प्रतिनिधी | जळगाव विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. एकीकडे शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेशमा काळे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत एक नवा आणि अनपेक्षित ‘ट्विस्ट’ निर्माण झाला असतानाच, दुसरीकडे भुसावळचे माजी नगराध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. निवडणुकीच्या या रणधुमाळीत आपलाच विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास अनिल चौधरी यांनी व्यक्त केला आहे. ​निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका लावत अनिल चौधरी यांनी आज वरणगाव नगर परिषदेला भेट दिली. यावेळी त्यांनी वरणगाव येथील सर्व नगरसेवकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले. नगरसेवकांशी संवाद साधताना चौधरी यांनी त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रदीर्घ अनुभवाचा दाखला…

Read More

जळगाव प्रतिनिधी | चाकूचा धाक दाखवून एका व्यक्तीस लुटणाऱ्या चार अट्टल गुन्हेगारांना जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या दोन तासांच्या आत अटक करत गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या तत्परतेची चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी पहाटे चेतन प्रकाश पाटील हे आपल्या मित्रांसमवेत जळगाव ते पाळधी मार्गाने जात असताना नॅशनल हाय गार्डन व हॉटेल राधिका परिसरात चार जणांनी त्यांना अडवले. चौघांनी चाकूचा धाक दाखवत शिवीगाळ केली तसेच जबरदस्तीने रोख रक्कम हिसकावून घेतली. घटनेनंतर चेतन पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी डीबी पथकाला तातडीने…

Read More

जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन आणि बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ‘महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६’ चे अत्यंत उत्साही वातावरणात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. पाळधी येथील सुगोकी लॉन्स आणि रिसॉर्ट येथे आयोजित करण्यात आले होते. ​या भव्य क्रीडा सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकचे राष्ट्रीय अध्यक्ष रणजित सावरकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून महासचिव डॉ. राकेश तिवारी, कोषाध्यक्ष मिलन वैद्य, अनिल त्रिवेदी आणि बॉक्सिंग असोसिएशन ऑफ जळगावचे जिल्हाध्यक्ष निलेश बाविस्कर उपस्थित होते. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पाळधी येथील गोपाल कासट…

Read More

​जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहराच्या नजीक असलेल्या मानराज पार्क भागात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. जळगावकडून बांभोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या या धडकेत रिक्षाचालकासह एक महिला प्रवासी गंभीररीत्या जखमी झाली आहे. कारचालकाने रस्त्यात अचानक ब्रेक दाबल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून बांभोरीच्या दिशेने (एमएच १२ टीवाय १७६२) क्रमांकाची कार जात होती. मानराज पार्कजवळ अचानक कारचालकाने गाडीचे ब्रेक दाबले. कार अचानक रस्त्यामध्ये थांबल्यामुळे, अगदी तिच्या पाठीमागून येणारी (एमएच १९ सीडब्ल्यू ६८७७) क्रमांकाची भरधाव रिक्षा थेट कारवर जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.​या…

Read More

जळगाव प्रतिनिधी | शहरातील अवैध सट्टा व दारू व्यवसायावर लगाम घालण्यासाठी पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी विशेष मोहीम राबवत विविध ठिकाणी धडक कारवाई केली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच प्रशिक्षणार्थी विभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. गुरुवारी ११ जून पहाटे सुमारे ६ वाजेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने शहरातील विविध भागांमध्ये अचानक छापेमारी केली. यामध्ये मकरा टॉवर परिसर, गुजरात पेट्रोल पंप परिसर तसेच हरी विठ्ठल नगर रोड येथील संशयित ठिकाणांची तपासणी करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे संबंधित भागांमध्ये काही काळ खळबळ उडाली होती. अवैध सट्टा व दारू व्यवसायाशी संबंधित हालचालींवर लक्ष…

Read More