Author: Editorial Desk

जळगाव प्रतिनिधी | शासनाकडून जळगाव महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी देण्यात येणारा 2025-26 या आर्थिक वर्षाचा निधी अद्यापही अनेकांना मिळालेला नसल्याने दिव्यांग बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रखडलेला निधी तातडीने वितरित करावा, या मागणीसाठी दिव्यांग सेनेच्या नेतृत्वाखाली सुमारे 100 दिव्यांग बांधवांनी मंगळवारी 16 जून रोजी जळगाव महानगरपालिकेच्या पाचव्या मजल्यावर ठिय्या आंदोलन केले. दिव्यांग सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी या प्रश्नासंदर्भात महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी 15 जूनपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, मुदत उलटूनही अनेक दिव्यांगांना निधी मिळालेला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनादरम्यान दिव्यांग बांधवांनी प्रशासना विरोधात घोषणाबाजी करत…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी आज पहाटे विशेष कोंबिंग ऑपरेशन राबवत मोठी कारवाई केली. पहाटे ३ ते सकाळी ६ या वेळेत झालेल्या या मोहिमेत विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या १२५ हून अधिक सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात चोरी, मारहाण, दरोडा, खंडणी तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण करण्यासाठी आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने जळगाव पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कोंबिंग ऑपरेशन हाती घेतले. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या विविध पथकांनी शहरातील संवेदनशील भागांमध्ये एकाच वेळी…

Read More

जळगाव प्रतिनिधी | मुंबई-नागपूर महामार्गावर धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ट्रकचा टायर फुटल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.संबंधित ट्रक गुजरात येथून रिफाइंड तेल, ऑइल पावडर आणि अन्य साहित्य घेऊन हैदराबादच्या दिशेने निघाला होता. प्रवासादरम्यान अचानक टायर फुटल्यानंतर ट्रकमधून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. ट्रकमध्ये चालक आणि क्लीनर उपस्थित होते. मात्र, प्रसंगावधान राखत दोघांनीही वेळीच ट्रकमधून उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीमुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणात…

Read More

जळगाव प्रतिनिधी | आजच्या बदलत्या राजकीय पटलावर सत्तेसाठी वारंवार भूमिका आणि पक्ष बदलणारे नेते जळगाव जिल्ह्याने पाहिले आहेत. अशा अस्थिर राजकीय वातावरणात सामान्य माणसाचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होत असताना, आपल्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून एकच पक्ष आणि एकच झेंडा सोबत ठेवणारे प्रामाणिक नेतृत्व म्हणून नंदूभाऊ महाजन यांच्याकडे पाहिले जाते. विधानपरिषदेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी बहाल केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, यंदाची लढाई महायुतीच्या भक्कम साथीने सोपी झाली असल्याचे चित्र आहे. तांदलवाडी गावाला दुसऱ्यांदा ‘आमदार’ पदाचा बहुमान नंदूभाऊ महाजन यांच्या रूपाने मिळणार असल्याच्या चर्चेवर आता जळगाव जिल्ह्यात शिक्कामोर्तब होत आहे. स्पष्टवक्तेपणा आणि माणुसकीची जपणूकआजच्या राजकारणात शब्द आणि कृती यात मोठी दरी…

Read More

​भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील सहकार अधिकारी विजय विनायकराव गरूड यांच्यासह सुरेश जनार्दन विपुते (वय ६२) आणि हेमंत प्रकाश काळे (वय ४०, दोन्ही प्रमाणित लेखापरीक्षक – खाजगी इसम) या तिघांविरुद्ध जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. १५ जून रोजी भुसावळ शहरातील नाहटा चौफुली परिसरात ही यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली. ​सविस्तर वृत्त असे की:यातील तक्रारदार हे भुसावळ येथील रहिवासी असून त्यांना सावकारी व्यवसाय करण्यासाठी सावकारी परवाना हवा होता. यासाठी त्यांनी ३० मार्च २०२६ रोजी भुसावळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात लेखी अर्ज केला होता. हा…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | सध्याच्या डिजिटल युगात वाढदिवसानिमित्त गल्लोगल्ली लागणारे महागडे फ्लेक्स-बॅनर्स, डीजेची कानठळ्या बसवणारी गाणी आणि पार्ट्यांवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. मात्र, या सर्व अनावश्यक दिखाव्याला आणि खर्चाला फाटा देत जळगावातील दोन तरुण उद्योजकांनी सामाजिक बांधिलकीचा एक अनोखा आणि आदर्श पायंडा समाजात घालून दिला आहे. ​अयांश ऑटोचे संचालक यश सुनील मंत्री आणि युवा उद्योजक अमोल कासट यांनी आपल्या वाढदिवसाचा बडेजाव टाळत, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘जीपीएस मित्र परिवार’ या संस्थेला मोठी आर्थिक मदत केली आहे. यश मंत्री यांनी ७१ हजार रुपये आणि अमोल कासट यांनी १ लाख रुपये, अशी एकूण १ लाख ७१ हजार रुपयांची…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या आर्थिक आणि इतर न्याय्य मागण्यांकडे प्रशासन व राज्य शासनाकडून सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या उदासीन धोरणाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज ‘सेवा शक्ती संघर्ष संघटने’च्या नेतृत्वाखाली राज्यभरात व्यापक आंदोलन छेडण्यात आले. याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रमुख आगारांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती लावून कर्तव्यावर हजेरी लावली आणि प्रशासनाचा जाहीर निषेध केला. ​जळगाव आगारासह जिल्ह्यातील विविध आगारांमधील चालक, वाहक, यांत्रिक विभागातील कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रवाशांची गैरसोय न करता, केवळ काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी शांततापूर्ण मार्गाने आपला रोष व्यक्त केला. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी प्रशासन…

Read More

जळगाव प्रतिनिधी | जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी आखण्यात येणारी रणनीती, मतदान प्रक्रिया तसेच निवडणुकीतील विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला आमदार राजुमामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, महापौर दीपमाला काळे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, गटनेते प्रकाश बालाणी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, सभागृह नेते नितीन लढ्ढा, विशाल त्रिपाठी यांच्यासह पक्षाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी उपस्थित नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीची वाढती ताकद, राज्य सरकारने राबविलेली…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून जिल्हा परिषदेच्या शाळा पुन्हा सुरू झाल्या असून, जिल्हाभरात उत्साहात ‘शाळा प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सावखेडा सिम व डांभुर्णी येथील जिल्हा परिषद शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ​शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने व उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या निरागस स्वागताने मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर काही क्षणांसाठी भारावून गेल्या होत्या. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी आणि हा दिवस संस्मरणीय व्हावा, यासाठी दोन्ही शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गावातून सजविलेल्या बैलगाडीवरून विद्यार्थ्यांची उत्साहात मिरवणूक…

Read More

जळगाव प्रतिनिधी | अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक योगासन स्पर्धेत सतीश मोहगावकर यांनी मुख्य ज्युरी म्हणून अत्यंत यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. स्पर्धा कालावधीत त्यांनी तांत्रिक बाबींचे प्रभावी नियोजन व व्यवस्थापन करून स्पर्धेची गुणवत्ता आणि पारदर्शकता कायम राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. योगासन स्पर्धेमध्ये विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत गुणांकन प्रक्रिया, नियमांचे पालन, परीक्षकांचे समन्वयन तसेच तांत्रिक अडचणींचे निराकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या मोहगावकर यांनी अत्यंत कुशलतेने सांभाळल्या. सतीश मोहगावकर हे महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स संघटनेचे मागिल ३० वर्षांपासून टेक्निकल डायरेक्टर म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. या सोबतच योगासन भारत ह्या राष्ट्रीय खेळ संघटनेच्या टेक्निकल कमेटि चे कन्व्हेनर…

Read More