Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मोठी कारवाई; सहकार अधिकाऱ्यासह दोन खाजगी ऑडिटर ३० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात!

क्राईम

मोठी कारवाई; सहकार अधिकाऱ्यासह दोन खाजगी ऑडिटर ३० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात!

Editorial DeskBy Editorial DeskJune 16, 2026Updated:June 16, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयातील सहकार अधिकारी विजय विनायकराव गरूड यांच्यासह सुरेश जनार्दन विपुते (वय ६२) आणि हेमंत प्रकाश काळे (वय ४०, दोन्ही प्रमाणित लेखापरीक्षक – खाजगी इसम) या तिघांविरुद्ध जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ३० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. १५ जून  रोजी भुसावळ शहरातील नाहटा चौफुली परिसरात ही यशस्वी सापळा कारवाई करण्यात आली.

​सविस्तर वृत्त असे की:
यातील तक्रारदार हे भुसावळ येथील रहिवासी असून त्यांना सावकारी व्यवसाय करण्यासाठी सावकारी परवाना हवा होता. यासाठी त्यांनी ३० मार्च २०२६ रोजी भुसावळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात लेखी अर्ज केला होता. हा परवाना काढून देण्याच्या मोबदल्यात सहकार अधिकारी विजय गरूड यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला २० हजार रुपयांची लाचेची मागणी केली व खाजगी ऑडिटर सुरेश विपुते यांना भेटण्यास सांगितले. तक्रारदाराने २३ एप्रिल २०२६ रोजी जळगाव एसीबीकडे या संदर्भात तक्रार नोंदवली होती.

​एसीबीने केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान, आरोपी सुरेश विपुते यांनी लोकसेवक गरूड यांच्यासाठी, स्वतःसाठी आणि दुसरे खाजगी ऑडिटर हेमंत काळे यांच्यासाठी मिळून एकूण ३० हजार रुपयांची लाच मागितली. १५ जून रोजी भुसावळच्या नाहटा चौफुली परिसरात विपुते यांनी हेमंत काळे यांच्याशी फोनवर बोलून लाचेची रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळवले. त्यानंतर विपुते यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष ३० हजार रुपयांची लाच स्वीकारली. धक्कादायक बाब म्हणजे, या लाच रक्कमेतील ५ हजार रुपये विपुते यांनी सहकार अधिकारी विजय गरूड यांच्या सांगण्यावरून तात्काळ ‘फोन-पे’ द्वारे ऑनलाईन ट्रान्सफर केले.

​एसीबीचे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व त्यांच्या पथकाने हा यशस्वी सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add