Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जागतिक योगासन स्पर्धेत सतीश मोहगावकर यांची छाप; तांत्रिक नियोजनात बजावली महत्त्वाची भूमिका

जळगाव

जागतिक योगासन स्पर्धेत सतीश मोहगावकर यांची छाप; तांत्रिक नियोजनात बजावली महत्त्वाची भूमिका

Editorial DeskBy Editorial DeskJune 14, 2026Updated:June 14, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक योगासन स्पर्धेत सतीश मोहगावकर यांनी मुख्य ज्युरी म्हणून अत्यंत यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. स्पर्धा कालावधीत त्यांनी तांत्रिक बाबींचे प्रभावी नियोजन व व्यवस्थापन करून स्पर्धेची गुणवत्ता आणि पारदर्शकता कायम राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

योगासन स्पर्धेमध्ये विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत गुणांकन प्रक्रिया, नियमांचे पालन, परीक्षकांचे समन्वयन तसेच तांत्रिक अडचणींचे निराकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या मोहगावकर यांनी अत्यंत कुशलतेने सांभाळल्या.

सतीश मोहगावकर हे महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स संघटनेचे मागिल ३० वर्षांपासून टेक्निकल डायरेक्टर म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. या सोबतच योगासन भारत ह्या राष्ट्रीय खेळ संघटनेच्या टेक्निकल कमेटि चे कन्व्हेनर आहेत. आज पर्यंत राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय योगासन स्पर्धा, खेलो इंडिया युथ गेम्स, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, आणि नॅशनल गेम्स तसेच मागिल वर्षी झालेल्या एशियन योगासन स्पर्धा ह्या सर्व स्पर्धेत ज्युरी म्हणून कार्य केले आहे. योगासन क्षेत्रातील त्यांचे दिर्घकाळाचे योगदान, तांत्रिक ज्ञान आणि संघटन कौशल्य यामुळे त्यांची मुख्य ज्युरी म्हणून निवड करण्यात आली होती. जागतिक स्तरावरील या स्पर्धेत त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे महाराष्ट्रासह देशाचे नाव गौरवले गेले आहे.

शसतीश मोहगावकर  हे जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन चे अध्यक्ष आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासाठी त्यांचे हे कर्तृत्व विशेष अभिमानास्पद आहे. 

या यशाचे श्रेय ते योगासन भारत अध्यक्ष उदित जी सेठ, महासचिव डॉ जयदिप जी आर्य आणि महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ संजय मालपाणी यांना देतात.

त्यांच्या या यशासाठी जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. देवानंद सोनार, कोषाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, सचिव प्रा. पंकज खाजबागे, आंतरराष्ट्रीय योगपटू डॉ. शरयू विसपुते,  डॉ. श्रद्धा व्यास  आदींसह संघटनेचे पदाधिकारी योग पटू आणि योग प्रेमींनी मोहगावकर यांचे अभिनंदन केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add