चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव शहरातील दोन वेगवेगळ्या मंदिरांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांचा चाळीसगाव शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून चोरीला गेलेला एकूण ५६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना २६ ते २७ मे दरम्यान जयशंकर नगर परिसरात घडली होती, जिथे मंदिरातील दानपेटीतून सुमारे १५ हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती. यानंतर अवघ्या काही दिवसांत, म्हणजेच ४ जून रोजी दत्तवाडी परिसरातील दत्त मंदिरात चोरी झाली. चोरट्याने मंदिरातून चांदीचा मुकुट आणि चांदीचा त्रिशूळ असा अंदाजे ४४ हजार ४०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला…
Author: Editorial Desk
जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील शासकीय विभागांमधील कथित भ्रष्टाचार, अनियमितता आणि प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कैलास नरसिंग पारधी यांनी जळगाव येथील प्रसिद्ध जी.एस. मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. सध्या जळगावात तब्बल ४५ अंश सेल्सिअस इतके प्रचंड तापमान असतानाही, कुठल्याही मंडपाशिवाय उघड्यावर हे उपोषण सुरू असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या कडक उन्हात उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त केली जात आहे. उपोषणकर्ते यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एकूण १६ प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील बंगाली वैद्यांची तात्काळ चौकशी करून गुन्हे दाखल करणे, भुसावळ, यावल, अमळनेर आणि बोदवड येथील आरोग्य विभागातील दोषींवर निलंबनाची कारवाई…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील शामनगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. केवळ एका तात्कालिक आणि क्षुल्लक वादातून ६४ वर्षीय वृद्धाची दगडाने डोके ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ८ जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवत एका संशयित आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे, तर त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जीवन शालीक पाथकर ऊर्फ जीवन मिस्तरी (वय ६४, मूळ रहिवासी – रोटवद, ता. जामनेर) असे या दुर्दैवी मृत वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन मिस्तरी हे गेल्या १५ वर्षांपासून जळगावात राहत होते. आईच्या निधनानंतर…
जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात आज एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण अपघाताची घटना घडली आहे. तालुक्यातील मंगरूळ गावाजवळ कार, मोटरसायकल आणि एसटी बस यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत झालेले नागरिक हे गुजरात राज्यातील रहिवासी होते. एका कौटुंबिक साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी ते आनंदाने महाराष्ट्रात येत असताना, नियतीने त्यांच्यावर वाटेतच काळाचा घाला घातला. मंगरूळ परिसराजवळ तिन्ही वाहनांची एकमेकांना इतकी भीषण धडक बसली की, वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज ऐकताच मंगरूळ गावातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे काही जखमींना गाडीतून…
पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा शहरात ८ जुन रोजी रात्रीच्या सुमारास प्राॅप्रटीच्या वादावरुन शाब्दिक चकमक होवुन या वादाचा परिणाम थेट खुनात होवुन सख्ख्या भावाच्या शालकाचा खुन झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मारेकरी स्वतः हुन पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. याप्रकरणी प्राप्त माहितीनुसार पाचोरा शहरातील संतोष हरलाल कानडे (वय – ५५) रा. हिंद आॅईन मिल जवळ सख्ख्या भावाच्या शालकास त्याचे भावाचा शालक यांचेशी घराच्या आर्थिक व्यवहारावरुन वारंवार वाद सुरू होते. या घटनेचा थेट परिणाम खुनात होवुन ८ जुन रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शहरातील जामनेर रोडवरील कन्या शाळेजवळ संतोष कानडे याने दिपक प्रकाश कानडे (वय – ४०) कोंडवाडा गल्ली, ता. पाचोरा…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील बहुचर्चित आणि संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या एमडी ड्रग्स (MD Drugs) प्रकरणातील आरोपींवर आता प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या गुन्ह्यातील अटकेत असलेला संशयित आरोपी रईस देशमुख याच्या सुप्रीम कॉलनीतील घरासमोरील अतिक्रमित दोन दुकानांवर आज महानगरपालिका आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बुलडोझर चालवला. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे जळगाव शहरातील गुन्हेगारी जगतात आणि ड्रग्स माफियांचे धाबे दणाणले असून प्रचंड खळबळ उडाली आहे. या बहुचर्चित एमडी ड्रग्स प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी आतापर्यंत एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी रईस देशमुखसह चार मुख्य आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत, तर दोन आरोपी अद्यापही फरार असून…
रावेर प्रतिनिधी | रावेर येथील पुरवठा विभागात सध्या दलाल आणि खाजगी ऑपरेटरचे जाळे मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्याची खळबळजनक चर्चा परिसरात सुरू आहे. शासकीय नियमांना सरळसरळ हरताळ फासून, पैशांच्या जोरावर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता रेशन कार्डसंबंधी कामे केली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. राज्य शासन सध्या घुसखोरी रोखण्यासाठी आणि शासकीय नोंदी अत्यंत अचूक व सुरक्षित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलत असताना, रावेरमधील या प्रकारांमुळे पुरवठा विभागाच्या एकूणच कार्यपद्धतीवर आणि पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेशन कार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करणे, जुने नाव कमी करणे किंवा नवीन रेशन कार्ड काढणे यासारख्या कामांसाठी शासनाने एक निश्चित…
जळगाव प्रतिनिधी | येथील एमआयडीसी परिसरातील ‘एल सेक्टर’मध्ये असलेल्या एका कुलर निर्मिती कारखान्याला आज दुपारी अचानक भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत कुलरचे सुटे भाग, मोटार, प्लास्टिक आणि इतर कच्चे साहित्य जळून खाक झाले असून, यात कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याचे दिवस असल्याने या कंपनीत कुलर निर्मितीचे काम वेगात सुरू होते. दुपारी अचानक कारखान्यातून धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. कुलर बनवण्यासाठी वापरण्यात येणारे सुके गवत (पॅड) आणि प्लास्टिकचे साहित्य यामुळे आगीचा भडका अत्यंत वेगाने उडाला. आकाशात धुराचे प्रचंड लोट पाहून…
भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ येथील सुदर्शन पेपर प्रॉडक्ट्स कंपनीच्या आवारात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. कंपनीच्या आवारात झोपलेल्या एका ३८ वर्षीय कामगाराच्या अंगावर वाळूने भरलेला डंपर रिव्हर्स घेत निष्काळजीपणे चढवून त्याचा मृत्यू घडवून आणल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, राजा भैय्या नथ्थू (वय ३८, मूळ रा. धरदुवा, जि. बांधा, उत्तर प्रदेश, ह.मु. सुदर्शन पेपर मिल, भुसावळ) असे मृत पावलेल्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे. ४ जून रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास राजा भैय्या हे सुदर्शन पेपर मिलच्या मोकळ्या आवारात झोपलेले…
पाचोरा प्रतिनिधी | श्रद्धेय तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त निर्मल फाउंडेशनच्या वतीने शिवतीर्थ मैदानावर ज्येष्ठ पत्रकार व आंतरराष्ट्रीय व्याख्याते श्री. पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी “राष्ट्र ही सीमा नव्हे, तर संस्कृतीची अखंड चेतना” या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले. या व्याख्यानाला पाचोरा नगरीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली आणि दीपप्रज्वलनाने झाली. व्यासपीठावर परमपूज्य विष्णुदास महाराज आणि हभप जळकेकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी निर्मल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांनी तात्यासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. “तात्यासाहेबांनी ३५ वर्षांपूर्वीच रासायनिक खतांचा धोका…

