रावेर प्रतिनिधी : रावेर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघच्या चेअरमन पदी नितीन प्रकाश पाटील तर व्हाईस चेअरमन पुरुषोत्तम तुकाराम पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली त्यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. याबाबत अधिक असे की, माजी चेअरमन व्हाईस चेअरमन दोघांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. झालेल्या रिक्त जागेवर आज खरेदी विक्री संघाची आज विशेषसभा आयोजन केली होती. यामध्ये चेअरमन पदासाठी नितीन पाटील तर व्हाईस चेअरमन पदासाठी पुरुषोत्तम पाटील दोघांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. सभेत माजी आमदार अरुण पाटील यांनी मनोगत व्यक्त केल यावेळी बाजार समिती सभापती प्रल्हाद पाटील, उप सभापती पंकज पाटील,बाजार…
Author: Editorial Desk
किनगाव प्रतिनिधी | पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होऊन दोन वर्षे उलटली, तरीही किनगाव येथील ग्रामीण रुग्णालय अद्याप सुरू न झाल्याने आज ग्रामस्थांचा रोष रस्त्यावर पाहायला मिळाला. ‘श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समिती’च्या वतीने आज श्रीराम मंदिर चौक ते ग्रामीण रुग्णालय दरम्यान एक भव्य शांतता मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात गावातील अबालवृद्ध, महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सन २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, दोन वर्षे झाली तरी येथे ना वैद्यकीय यंत्रसामग्री आहे, ना पुरेसा कर्मचारी वर्ग, ना रुग्णवाहिका! रुग्णालयाच्या या दुरवस्थेमुळे स्थानिक रुग्णांना बैलगाडी किंवा…
जळगाव प्रतिनिधी | वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी वाईट संगतीमुळे मद्य, गांजा आणि इतर नशायुक्त पदार्थांच्या आहारी गेलेल्या एका बालकाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांच्या उपचार आणि समुपदेशनामुळे नवजीवन मिळाले आहे. या यशस्वी उपचारांमुळे बालकाची प्रकृती सुधारत असून त्याचे लक्ष पुन्हा शिक्षण आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळू लागले आहे. जळगाव शहरातील दादावाडी परिसरात राहणारा हा विद्यार्थी शालेय शिक्षण घेत असताना काही मित्रांच्या संगतीत आला. या संगतीचा परिणाम म्हणून त्याने मद्यसेवन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गांजा आणि इतर नशायुक्त पदार्थांचे सेवन करण्याची सवय लागली. व्यसनामुळे त्याच्या स्वभावात चिडचिडेपणा वाढला, भूक कमी झाली आणि आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ लागले. मुलाच्या बदललेल्या वर्तनामुळे…
जळगाव प्रतिनिधी | विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील ६ जून रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान महाविकास आघाडीचे विधानपरिषदेचे अधिकृत उमेदवार शरद तायडे यांनी जयंत पाटील यांची भेट घेतली. या भेटीत आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या रणनीती संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. यावेळी उमेदवाराला आश्वस्त करताना जयंत पाटील म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष हा महाविकास आघाडीचा एक प्रमुख आणि महत्त्वाचा घटक पक्ष आहे. आघाडीचा धर्म पाळत पक्ष पूर्ण ताकदीने विधान परिषदेचे उमेदवार शरद तायडे यांच्या पाठीशी…
जामनेर, प्रतिनिधी | शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठान, जामनेर यांच्या वतीने संत गजानन महाराज मंदिर, शास्त्रीनगर, जामनेर येथे साक्षात वानर हनुमान वाचनालय उद्घाटन, रुग्णवाहिका लोकार्पण व दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प.पू. शामचैतन्य बापू, अध्यक्षस्थानी ह.भ.प. एकनाथ महाराज चवरे, प्रमुख वक्ते म्हणून श्री. निलेश चव्हाण सर उपस्थित होते. तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. गजानन मंडवे सर, नगरसेवक श्री. बाबुराव हिवराळे, ब्रह्मकुमारी आश्रमच्या सुषमा दीदी व प्रतिष्ठानचे सदस्य श्री. विनोद भोई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साक्षात वानर हनुमान वाचनालयाचे उद्घाटन…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि प्रचंड वेगाच्या वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका कडगाव शिवारातील ‘मेघा इंजिनिअरिंग कंपनी’च्या सौर ऊर्जा प्रकल्पाला बसला असून, येथे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. वादळाचा वेग इतका तीव्र होता की, प्रकल्पातील अनेक सोलर पॅनल्स मुळासकट उखडून पडले, तर काही पॅनल्स थेट हवेत उडून गेले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या वादळात अनेक पॅनल्स एकमेकांवर आदळल्यामुळे पूर्णपणे फुटून नष्ट झाले आहेत. पॅनल्सना भक्कम आधार देणारे लोखंडी स्ट्रक्चर्स आणि इतर अत्याधुनिक तांत्रिक उपकरणेही वाकल्यामुळे येथील यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. या गंभीर दुर्घटनेमुळे…
जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या कल्पिताताई पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जयंतराव पाटील कल्पिताताईंच्या निवासस्थानी पोहोचताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये पक्षाच्या आगामी वाटचालीवर, महिला आघाडीच्या सक्षमीकरणावर आणि स्थानिक राजकीय परिस्थितीवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी महिला कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या प्रसंगी जयंतराव पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक नेते आणि…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या जोरदार वादळी वारा आणि मुसळधार पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका नशिराबाद टोल नाक्याला बसला असून, येथे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वेगवान आणि वादळी वाऱ्यामुळे टोल प्लाझावरील छताची लोखंडी पत्रे उखडून थेट दूरवर फेकली गेली. या दुर्घटनेमुळे सुरक्षेचा उपाय म्हणून टोल प्रशासनाने टोल वसुलीच्या दोन प्रमुख लेन तातडीने बंद केल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की टोल नाक्यावरील जड लोखंडी पत्रे पत्त्यांसारखी हवेत उडाली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. याशिवाय, टोल नाक्याच्या आजूबाजूला असलेली मोठी झाडेही उन्मळून पडली. या अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे…
वरणगाव प्रतिनिधी | आसाममधील गुवाहाटी येथे नुकत्याच पार पडलेल्या १९ व्या राष्ट्रीय ग्रॅपलींग चॅम्पीयनशिप २०२६ स्पर्धेत वरणगावच्या क्रीडा क्षेत्रात एक ऐतिहासिक नोंद झाली आहे. येथील प्रसिद्ध श्री हनुमान व्यायाम शाळेचा खेळाडू प्रणय संजय बावस्कर याने ६६ किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला आणि वरणगावसाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर ब्राँझ पदक मिळवून दिले. ही स्पर्धा २९ मे ते ३१ मे दरम्यान गुवाहाटी येथील दिसपूरमधील भुगेश्वरी फुकोनानी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली होती. मल्लयुद्धासारख्या असलेल्या या ‘नो-गी व गी’ प्रकारातील ग्रॅपलिंग स्पर्धेत भारतातील २४ राज्यांतील एकूण ५६७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. नाशिक विभागाचे संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक दुष्यंतराजे देशमुख यांच्या…
जळगाव प्रतिनिधी | श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्वामी समर्थांची पवित्र पालखी व पादुका परिक्रमा येत्या ७ जून रोजी जळगाव नगरीत दाखल होत आहे. यंदा या पालखी सोहळ्याचे जळगावातील विसावे वर्ष असून, स्वामी भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या वतीने दरवर्षी या भव्य परिक्रमेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा अशा तीन राज्यांमध्ये सुमारे सहा महिने हा पालखी सोहळा मार्गस्थ असतो. परगावच्या भाविकांना श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा प्रत्यक्ष लाभ मिळावा आणि अक्कलकोट येथे मंडळाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या भव्य प्रसादालय व भक्तनिवासाच्या उभारणीला हातभार लागावा, या उदात्त हेतूने ही…

