Author: Editorial Desk

​जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी जळगाव पोलिसांतर्फे ५ जून रोजी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी राबविलेल्या या मोहिमेमुळे गुन्हेगारांची चांगलीच दाणादाण उडाली. या धडक कारवाईत पोलिसांनी दारूबंदी, जुगार, अंमली पदार्थ आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर बडगा उगारला आहे. ​या मोहिमेदरम्यान पोलिसांनी दारूबंदी कायद्यांतर्गत तब्बल १९६ गुन्हे नोंदवून २१ लाख ६५ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या ५६ जणांवर आणि मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या ३७ चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | ‘जागतिक योग दिना’चे औचित्य साधून महाराष्ट्र योग शिक्षक संघटना (जळगाव जिल्हा) अंतर्गत यावर्षी २१ जून हा केवळ एकच दिवस ‘योग दिन’ म्हणून साजरा न करता, तब्बल सात दिवस ‘योग सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा अनोखा आणि स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १५ जून ते २१ जून २०२६ या कालावधीत हा योग सप्ताह जळगावात मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, यादरम्यान विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. ​महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चित्रा महाजन, विभाग प्रमुख सुनील गुरव, राज्य कार्यकारी अध्यक्ष कृणाल महाजन आणि सचिव नूतन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या सप्ताहाचे सविस्तर नियोजन…

Read More

जळगाव प्रतिनिधी | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोड समोर आली आहे. जळगाव शहरातील भाजपशी संबंधित अनेक प्रमुख पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी सामूहिकपणे शिवसेनेच्या शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. या मोठ्या राजकीय भूकंपामुळे जळगावमधील स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. ​मुंबई येथील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘नंदनवन’ बंगल्यावर हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली हा प्रवेश निश्चित झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगावमधील भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि भूषण भोळे यांच्यासह शेकडो…

Read More

जळगाव प्रतिनिधी | ​जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुला-मुलींनी शिक्षण, क्रीडा, कला यांसह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत पोलीस दलाचे नाव उज्ज्वल केले आहे. या सर्व गुणवंत पाल्यांचा आज जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष सत्कार करण्यात आला. ​या कौतुक सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, पोलीस अधीक्षकांनी केवळ सत्कार न करता प्रत्येक विद्यार्थ्यास एक प्रेरणादायी पुस्तक भेट दिले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. करिअरचे नियोजन, स्पर्धा परीक्षांची तयारी, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण आणि समाजाप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या या विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थ्यांचे विचार आणि त्यांची स्वप्ने जाणून घेतली. ​”पोलीस कर्मचारी २४ तास…

Read More

​धरणगाव प्रतिनिधी | शहरातील मातोश्री कॉम्प्लेक्ससमोरील सार्वजनिक जागेवर एका वृद्ध व्यापाऱ्याला अडवून तीन अज्ञात इसमांनी ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ​भगवान आत्माराम माळी (वय ६२, रा, धरणगाव) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. किराणा दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करत आहेत. ४ जून रोजी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास ते मातोश्री कॉम्प्लेक्ससमोरील रस्त्यावरून जात असताना, मोटारसायकलवरून आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी त्यांना गाठले. काही समजण्याच्या आतच आरोपींनी भगवान माळी यांच्या हातातील लाल रंगाची पिशवी बळजबरीने हिसकावून घेतली आणि…

Read More

​वरणगाव प्रतिनिधी | वरणगावजवळ एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा रस्ते अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका महिलेसह आणि एका वर्षाच्या चिमुरडीसह एकूण चौघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. मलकापूर येथील एकाच आदिवासी कुटुंबातील हे चारही सदस्य होते. ​मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील रहिवासी असलेले विजय शंकर काळे (वय १९), ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय ३०), विघ्नेश शंकर चव्हाण (वय १४) आणि अवघ्या एक वर्षाची चिमुरडी मोनालिसा शिवबसप्पा भोसले हे सर्वजण दुचाकीने वरणगाव येथे लस्सी पिण्यासाठी जात होते. मात्र, वरणगाव गावाच्या…

Read More

भुसावळ प्रतिनिधी | जळगाव रोड परिसरातील हिरो शोरूमच्या मागे बेकायदेशीरपणे घातक शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या दोन संशयित इसमांना भुसावळ शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपींकडून १ गावठी बनावटीचा कट्टा, २ जिवंत राऊंड आणि १ टोकदार चाकू अशी एकूण १२ हजार ३०० रुपये किमतीची घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, जळगाव रोडवरील हिरो शोरूमच्या मागे दोन संशयित इसम गावठी कट्ट्यासह फिरत आहेत. माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार गुन्हे शोध…

Read More

धरणगाव तालुक्याच्या मातीतून घडलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखला जातो. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या कार्यशैली, जनसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाच्या बळावर जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विकासकामांचा आणि जनसेवेच्या प्रवासाचा हा विशेष आढावा. गेल्या काही वर्षांत जळगाव जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देण्याचे काम मंत्री गुलाबराव पाटील यांनी सातत्याने केले आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या मूलभूत क्षेत्रांमध्ये त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे जिल्ह्याच्या विकासाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. विकास केवळ घोषणांमध्ये न राहता तो प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न…

Read More

जळगाव प्रतिनिधी | शेतीसमोरील आव्हाने, बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील चढ-उतार अशा अनेक अडचणी आज कृषी क्षेत्रासमोर उभ्या आहेत. मात्र, या अडचणींना न घाबरता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, योग्य नियोजन आणि नावीन्यपूर्ण प्रयोग केल्यास शेती अधिक फायदेशीर व शाश्वत करता येते. अशा वेळी शेती ही कोणत्याही उद्योग किंवा नोकरीपेक्षा श्रेष्ठ ठरते, असा विश्वास प्रगतशील शेतकऱ्यांनी युवा पिढीला दिला. जैन हिल्स येथे सुरू असलेल्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (फाली) या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात शेतकरी आणि विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत उत्साहवर्धक संवाद रंगला. ​संध्याकाळच्या सत्रात स्वप्नाताई चौधरी, अभिजीत शेळके, पद्माकर पाटील, यश चौधरी आणि राजू चौधरी या प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवकथनातून विद्यार्थ्यांना…

Read More

जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या मोफत सुरक्षा संच वाटपामध्ये लाचेची मागणी करणाऱ्या एका २० वर्षीय खाजगी महिला कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. भाग्यश्री विजय पाटील (रा. सामनेर, ता. पाचोरा) असे लाच घेणाऱ्या खाजगी तरुणीचे नाव असून, तिच्याविरुद्ध जळगाव येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान घटनास्थळावरून एकूण २६ हजार ७७० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ​याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव येथील एका मूळ तक्रारदाराने ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ’ यांच्या योजनेंतर्गत अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. हा संच घेण्यासाठी…

Read More