Author: Editorial Desk

​भुसावळ प्रतिनिधी | शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत, रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक समाधान रामचंद्र जाधव यांना २०२५-२६ चा अत्यंत मानाचा ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. समाधान जाधव हे भुसावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काहुरखेडे येथे कार्यरत असून, संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून या पुरस्कारासाठी निवड झालेले ते एकमेव प्राथमिक शिक्षक ठरले आहेत. ​संस्थेच्या कडक नियमावली आणि अत्यंत पारदर्शक निवड प्रक्रियेनुसार हा निवड सोहळा पार पडला. राज्यभरातील शेकडो शिक्षकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि प्रामुख्याने विद्यार्थीकेंद्रित कार्याचा सखोल आढावा घेऊन या पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली होती. यामध्ये समाधान…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या ६ महिन्यांचे मानधन रखडल्याने, महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने १ जूनपासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले आहे. ​ग्रामीण भागातील स्वच्छ भारत अभियान, पाणी पुरवठा योजना आणि जल जीवन मिशन यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी करणाऱ्या गट व समूह समन्वयकांना डिसेंबर २०२५ ते एप्रिल २०२६ या पाच महिन्यांचे मानधन अद्याप मिळालेले नाही. जून महिना उजाडला तरीही वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढावले असून,…

Read More

रावेर प्रतिनिधी | रावेर व यावल तालुक्यात सोमवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळ व वादळी वाऱ्यांमुळे शेतीपिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक गावांतील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी वर्गासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त असून काढणीच्या टप्प्यावर आलेली पिके वादळाच्या तडाख्यात सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडून गेल्याने मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेत रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी महसूल, कृषी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्त भागांची त्वरित…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क (इम्पोर्ट ड्युटी) रद्द केल्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “केंद्र सरकार झोपेत निर्णय घेत आहे का?” असा संतप्त सवाल करत, सरकारच्या या धोरणामुळे देशातील कापूस उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी एक ‘एक्स’ (ट्विटर) पोस्ट शेअर करत सरकारला धारेवर धरले. ​रोहिणी खडसे म्हणाल्या की, केंद्र सरकारने अचानक कापसावरील आयात शुल्क रद्द केल्यामुळे खुल्या बाजारात कापसाच्या दरात प्रति क्विंटल तब्बल १००० ते १५०० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या सर्व १६ उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैध ठरले आहेत, अशी अधिकृत माहिती जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे. त्यामुळे आता जळगावच्या राजकीय रिंगणात चुरस कमालीची वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ​निवडणूक निर्णय प्रक्रिया अंतर्गत आज उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीदरम्यान काही उमेदवारांच्या अर्जांमध्ये किरकोळ त्रुटी आढळून आल्या होत्या. प्रशासनाच्या वतीने संबंधित उमेदवारांना या त्रुटींबाबत तातडीने लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. उमेदवारांनी या त्रुटींची पूर्तता केल्याने अखेर छाननी अंती सर्वच्या सर्व १६ उमेदवारांचे अर्ज वैध घोषित करण्यात…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार, १ जून रोजी रात्री जळगाव शहरात एक विशेष मोहीम राबविण्यात आली. या धडक मोहिमेदरम्यान अवैध दारू विक्रेते, जुगार अड्डे, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे आणि टवाळखोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ​या रात्रीच्या मोहिमेत पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून मोठी कारवाई केली. यामध्ये मुंबई प्रोहिबिशन ॲक्ट (दारू बंदी कायदा) अंतर्गत एकूण १२ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी एकूण ६ लाख ५२ हजार ८७८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत आज मोठी घडामोड पाहायला मिळाली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज एकूण १६ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात राजकीय पक्षांचे अधिकृत उमेदवार आणि अपक्षांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती. ​या प्राप्त झालेल्या अधिकृत यादीनुसार, अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये खालील नावांचा समावेश आहे: ​१. प्रविण गंगाराम पाटील२. चौधरी निलेश सुरेश३. आसिफ मोहम्मद दारा मोहम्मद४. जंगले सुनिल नेमिदास५. शेख दानिश शेख निसार६. जावेद इकबाल अब्दुल रशीद७. नंदकिशोर भागवत महाजन८. तायडे शरद शामराव९. चौधरी सचिन संतोषराव१०. चौधरी अनिल छबिलदास११. रेश्मा…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला. अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मात्र, याच वेळी महायुतीला मोठा धक्का बसला असून, शिवसेना (शिंदे गट) आणि त्यांच्या मित्रपक्षातील दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी थेट बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या नाट्यमय घडामोडींमुळे जळगावच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. ​निवडणुकीच्या अधिकृत उमेदवारांबद्दल बोलायचे झाले तर, महायुतीच्या वतीने भाजपचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल केला. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे शरद तायडे यांनीही जोरदार…

Read More

जळगाव प्रतिनिधी | खाजगी सावकाराचा मानसिक त्रास आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना कंटाळून एका २५ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी, ३१ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जळगाव जवळील खेडी शिवारात समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली असून सावकारी पाशाचा आणखी एक बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे. ​अक्षय रवींद्र पाटील (वय २५, रा. खेडी शिवार, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. अक्षय एका बँकेत फायनान्स विभागात कार्यरत होता. त्याने काही व्यक्तींकडून खाजगी कर्ज घेतले होते. मात्र, हे कर्ज फेडण्यासाठी संबंधित सावकाराने त्याच्याकडे पैशांचा प्रचंड तगादा लावला होता. “पैसे दिले नाही…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | शिरसोली परिसरातील शशी वाणी यांच्या गोदामासमोरील सार्वजनिक जागेत जुन्या भांडणाच्या कारणावरून एका २५ वर्षीय तरुणावर कुऱ्हाड आणि चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात वसीम फारुख खाटीक हा तरुण गंभीर जखमी झाला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचानगुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शिरसोली येथील रहिवासी फारुख हुसेन खाटीक (वय ५०) यांचा मुलगा वसीम हा गोदामाजवळ असताना हा प्रकार घडला. पूर्ववैमनस्याचा राग मनात धरून आरोपी फैजल रज्जाक शेख (रा. शिरसोली) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अज्ञात इसमाने वसीमला गाठले. यावेळी दोघांमध्ये वाद झाला…

Read More