जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गिरणा टाकी परिसरात अवैधपणे मोठ्या प्रमाणावर सट्टा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. “ही सट्टा पेढी नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे?” असा संतप्त सवाल आता परिसरातील सुजाण नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात जळगाव जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक श्रीकांत ढेरे यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उघड्यावर दारू पिणारे, अवैध वाळू वाहतूक, गोवंश व गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारे आणि दारू पिऊन…
Author: Editorial Desk
अमळनेर प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावाजवळ तापी नदी पात्रात अवैधरित्या साठवून ठेवण्यात आलेल्या डिझेलच्या साठ्यावर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे धाड टाकली आहे. या धडक कारवाईत सुमारे १ लाख ५५ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, परिसरात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार २७ मे रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास उपविभागीय दंडाधिकारी मयूर शिंगळे, तहसीलदार सुराणा, उपविभागीय पोलीस अधिकारी (चोपडा विभाग), पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मंडळ अधिकारी कल्याणी पाटील आणि ग्राम महसूल अधिकारी पवन शिंगारे यांच्या संयुक्त पथकाने तापी नदीकाठावरील वाळू डेपो परिसराची अचानक तपासणी केली. ल या तपासणी दरम्यान पथकाला प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवून ठेवलेला…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरात प्लास्टिक बंदीचे आदेश असूनही गेल्या काही दिवसांपासून सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत जळगाव शहर महानगर पालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी २६ मे रोजी संध्याकाळी ५ वाजता जळगावच्या मध्यवर्ती बाजारपेठेत अचानक धडक तपासणी मोहीम राबवली. महापौरांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे संपूर्ण बाजारपेठेत प्रचंड खळबळ उडाली. महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः शहरातील राजकमल टॉकीज परिसर, तिजोरी गल्ली, अशोक टॉकीज गल्ली, दाणा बाजार, नेताजी सुभाषचंद्र चौक आणि फुले मार्केट या गजबजलेल्या भागांमध्ये पायी गस्त घालत प्लास्टिक पिशव्यांची पाहणी केली. महापौर अचानक आल्याचे पाहताच फळ-भाजी विक्रेते, दुकानदार आणि हॉकर्सची…
जळगाव/लडाख प्रतिनिधी | भारतीय सैन्यदल आणि जळगाव येथील आर्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जम्मू-काश्मीरमधील ट्याक्शी, नुब्रा व्हॅली (लडाख) या अत्यंत दुर्गम व उंच हिमालयीन भागात १९ ते २५ मे दरम्यान भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. नाशिक आणि मालेगाव येथील १९ तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने या शिबिरात शेकडो स्थानिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली. आर्या फाउंडेशनचे प्रतिनिधी ऋषिकेश परमार यांनी या पथकाचे नेतृत्व केले, तर अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि सैन्यदलासोबतच्या पत्रव्यवहारामुळे या शिबिराला मंजुरी मिळाली. या शिबिरादरम्यान महिलांचे आरोग्य, बालआरोग्य, त्वचारोग आणि वृद्ध नागरिकांच्या (जेरियाट्रिक) समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. तपासणी दरम्यान स्थानिक…
जामनेर प्रतिनिधी | गोवंशाची अवैध वाहतूक, कत्तल आणि अनधिकृत कत्तलखान्यांना आळा घालण्यासाठी जामनेर पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासनाने संयुक्तपणे शहरात एक मोठी विशेष मोहीम राबवली. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ६७ गोवंश प्रजातीच्या जनावरांची सुटका केली असून, त्यांची रवानगी जळगाव येथील गोशाळेत सुरक्षितपणे करण्यात आली आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त पथकाने जामनेर शहरातील घोडे पीर बाबा घरकुल परिसर, मदनी नगर, इस्लामपुरा आणि पहूर गल्ली या संशयित भागात अचानक छापा टाकला. या शोधमोहिमे दरम्यान सुमारे ६ लाख १० हजार रुपये किमतीचे ६७ गोवंश जनावरे जप्त करण्यात आली. तसेच एका ठिकाणी गोवंश मांस देखील आढळून आले. याप्रकरणी…
जळगाव प्रतिनिधी | शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये जास्तीत जास्त मासिक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल २३ कोटी ८१ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘TWJ असोसिएट्स प्रा. लि.’ कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर (वय ३५) आणि सौ. नेहा समीर नार्वेकर (वय ३६, रा. गुहागर, रत्नागिरी) यांना आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २९ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पाळधी येथील गुंतवणूकदार भरत रतीलाल पवार यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपींनी डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या काळात नियमबाह्य स्कीम्स राबवून आणि सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून २७९ गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले…
चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव शहर आणि संपूर्ण तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने नागद रोडवरील एका पेट्रोल पंपावर अनोखे आंदोलन करण्यात आले. शासनाने तालुक्यातील इंधन पुरवठा तातडीने सुरळीत करावा, या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी पेट्रोल पंपावर आलेल्या नागरिकांना आणि वाहनधारकांना ‘मेलडी चॉकलेट’ वाटप करून केंद्र व राज्य सरकारचा तीव्र निषेध नोंदवला. सध्या शेती मशागत, नांगरणी आणि आगामी पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे. अशा ऐन हंगामाच्या काळातच डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंधनासाठी शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना पेट्रोल…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर आणि जिल्ह्यात मोकाट तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत चालला असून, अत्यंत धक्कादायक घटनेत रेबीजमुळे दोघा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. कुत्र्याच्या चाव्यानंतर उपचारात झालेला हलगर्जीपणा या रुग्णांच्या जीवावर बेतल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी शेख ताहेर शेख फारुख आणि मुक्ताईनगर तालुक्यातील घोडगाव येथील प्रदीप उत्तम धायडे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. पिंप्राळा हुडको परिसरात काही दिवसांपूर्वी एका पिसाळलेल्या कुत्र्याने सात ते आठ जणांवर अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ताहेर शेख यांचा…
नवी दिल्ली वृत्तसेवा | देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी २५ मे रोजी पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या १० दिवसांच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये झालेली ही चौथी दरवाढ आहे. या नव्या दरवाढीमुळे ग्राहकांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. ताज्या दरवाढीनुसार, डिझेलच्या दरात प्रति लिटर २.७१ रुपयांनी, तर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २.६१ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर ९५.२० रुपये, तर पेट्रोलचा दर १०२.१२ रुपये झाला आहे. तर महाराष्ट्राची राजधानी मुंबईत या दरवाढीनंतर पेट्रोल १११.२१ रुपये प्रतिलिटर आणि…
जळगाव प्रतिनिधी | एसटी बसस्थानकांवरील वाढत्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्यांची टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याचा धक्कादायक प्रत्यय जळगाव शहरात आला आहे. नवीन बसस्थानक परिसरात एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने अत्यंत चाणाक्षपणे आणि शिताफीने चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, रमन कौतीक पाटील (वय ७०, रा. वर्डी, ता. चोपडा) हे आपल्या पत्नी यमुनाबाई रमन पाटील यांच्यासह काही वैयक्तिक कामानिमित्त जळगाव शहरात आले होते. काम आटोपून परत जाण्यासाठी २२ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ते जळगाव शहरातील नवीन बसस्थानकावर…

