Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा चुना लावणारे नार्वेकर दांपत्य गजाआड; जळगाव आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई !

क्राईम

गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा चुना लावणारे नार्वेकर दांपत्य गजाआड; जळगाव आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई !

Editorial DeskBy Editorial DeskMay 27, 2026Updated:May 27, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये जास्तीत जास्त मासिक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल २३ कोटी ८१ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘TWJ असोसिएट्स प्रा. लि.’ कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर (वय ३५) आणि सौ. नेहा समीर नार्वेकर (वय ३६, रा. गुहागर, रत्नागिरी) यांना आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना २९ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

​या प्रकरणी पाळधी येथील गुंतवणूकदार भरत रतीलाल पवार यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपींनी डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या काळात नियमबाह्य स्कीम्स राबवून आणि सेबीच्या नियमांचे उल्लंघन करून २७९ गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये उकळले व नंतर परतावा न देता विश्वासघात केला.

यापूर्वी जळगाव शाखेचा फ्रेंचायसी चालक व मूळ तक्रारदार मिलिंद शालिकराव पाटील यालाही या गुन्ह्यातील सहभागामुळे अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. 
​मुख्य संचालक नार्वेकर दांपत्य ठाणे येथील श्रीनगर पोलीस ठाण्यातील अशाच एका फसवणुकीच्या गुन्ह्यात ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंद होते.

जळगाव पोलिसांनी न्यायालयाच्या परवानगीने २५ मे रोजी त्यांचा ताबा घेतला आणि २६ मे रोजी रात्री त्यांना रीतसर अटक केली. या आरोपींवर यवतमाळ, चिपळूण, खारघर, पुणे, नागपूर, रायगड आणि छत्रपती संभाजीनगर येथेही गुन्हे दाखल आहेत. 

​सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे. ‘TWJ’ कंपनीच्या जळगाव शाखेत ज्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली असेल, त्यांनी आपली माहिती व कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे जमा करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add