जळगाव प्रतिनिधी | भावाला जिवंत मारण्याची धमकी देऊन एका १८ वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तांबापुरा मच्छी मार्केट भागातील रहिवासी असलेल्या शाकीब अस्लम पटेल (वय २०) याने पीडित तरुणीला तिच्या भावाला मारून टाकण्याची धमकी दिली होती. या भितीचा गैरफायदा घेऊन आरोपीने १ नोव्हेंबर २०२५ ते २० मे २०२६ या कालावधीत पीडितेला तिच्या राहत्या घरी वेळोवेळी बोलावून घेतले. तिच्या संमतीविना आणि विरोधाला न जुमानता आरोपीने तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. या अत्याचारादरम्यान पीडित तरुणी गर्भवती राहिली. ही बाब समोर आल्यानंतर आरोपी शाकीब याने तिला गर्भपाताच्या…
Author: Editorial Desk
जळगाव प्रतिनिधी | शहरातील निमखेडी रोड परिसरातील एका नामांकित रहिवासी अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर पोलिसांनी गुरुवारी २१ मे रोजी सायंकाळी मोठी कारवाई केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (AHTU) पथकाने टाकलेल्या या छाप्यात दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, कुंटणखाना चालवणाऱ्या एका महिलेसह पुरुषाला रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरात आणि विशेषतः निमखेडी भागात प्रचंड खळबळ उडाली आहे. ‘पंटर’ पाठवून रचला सापळा :निमखेडी शिवारातील ‘ब्रह्मांड नायक’ अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे देहव्यापार चालवला जात असल्याची गोपनीय माहिती परिक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांच्या पथकाने अत्यंत गुप्ततेने सापळा रचला. त्यानुसार, पोलिसांनी एका…
जळगाव प्रतिनिधी | राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी नुकतीच निवडणूक जाहीर झाली असून, या घोषणेमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. जागांची घोषणा होताच जिल्ह्यातील अनेक राजकीय लोकप्रतिनिधी आणि इच्छुकांनी आतापासूनच ‘गुडघ्याला बाशिंग’ बांधून जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीमधील दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी अंतर्गत पातळीवर मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपमधून कैलास आप्पा सोनवणे यांचे नाव आघाडीवर : या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून एक धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण नाव समोर आल्याने राजकीय गोटात कमालीची खळबळ उडाली आहे. जिल्ह्याचे संकटमोचक आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत खंदे समर्थक, तसेच त्यांच्या पहिल्या आमदारकीपासून सावलीसारखे सोबत असलेले…
जळगाव विशेष प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाळधी ते तरसोद बायपास हायवेवरील मुमराबाद बोगद्याच्या शेजारी एका गरीब शेतकऱ्याच्या शेतासमोर, मुख्य रस्त्याच्या कडेला अचानकपणे एक मोठे शेड उभारण्यात आले आहे. या शेडमध्ये सद्या अत्यंत खुलेआमपणे बेकायदेशीर आणि अवैध धंदे सुरू असल्याची माहिती समोर आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री, मटका, सट्टा-पत्ता यासह अनेक अनैतिक व गैरकायदेशीर प्रकार दिवसाढवळ्या सुरू आहेत. यामुळे परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा सर्व प्रकार राष्ट्रीय महामार्गाला लागूनच सुरू असल्याने, या ठिकाणी नेहमी संशयास्पद वाहनांची आणि लोकांची मोठी…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील रेणुका नगर येथे एक धक्कादायक आणि अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. आई-वडील घराबाहेर गेले असताना, घरात एकट्याच असलेल्या पियुष प्रकाश वाणी (वय २०) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पियुष हा आपल्या माता-पित्याचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या या टोकाच्या पावलामुळे वाणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पियुष वाणी हा आपल्या कुटुंबासह रेणुका नगरात राहत होता. बुधवारी सकाळच्या सुमारास त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो दवाखान्यात गेला होता. उपचार घेऊन आल्यानंतर तो घरातच आराम करत होता. दुपारच्या सुमारास पियुषच्या वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी…
जळगाव प्रतिनिधी | शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातून अचानक निघून गेलेल्या एका ६८ वर्षीय वृद्धेचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सिंधूबाई भिला चौधरी (वय ६८, रा. जुने जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवार २० मे रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिंधूबाई चौधरी या जुने जळगाव परिसरातील पांझरापोळ टाकीजवळ आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होत्या. बुधवारी सकाळच्या सुमारास त्या कोणालाही काहीही न सांगता अचानक घरातून निघून गेल्या होत्या. त्या बऱ्याच वेळानंतरही घरी…
जळगाव प्रतिनिधी । अवैध सावकारीच्या चौकशीत अनुकूल अहवाल पाठवण्यासाठी आणि तक्रारदारावर गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सहकार विभागाच्या वर्ग-१ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. जगदीश बाबुराव बारी (वय ५६, उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून, त्याच्या सांगण्यावरून दीड लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारणारा खाजगी इसम देविदास धनसिंग पाटील (वय ४४, मानद कार्यकारी अधिकारी, जळगाव जिल्हा बँक असोसिएशन) यालाही एसीबीने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांच्यावर अवैध सावकारीच्या अनुषंगाने उपनिबंधक कार्यालयात सुनावणी सुरू होती. या प्रकरणात आपल्या व पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ…
भुसावळ प्रतिनिधी । ई-फार्मसीचे बेकायदेशीर संचालन, कॉर्पोरेट कंपन्यांची मक्तेदारी आणि ऑनलाईन औषध विक्रीमुळे धोक्यात आलेले सार्वजनिक आरोग्य यांविरोधात अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाला भुसावळ शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज तालुक्यातील सर्व औषध दुकाने कडकडीत बंद राहिल्याने संपूर्ण औषध बाजारपेठ ठप्प झाली होती. गेल्या काही वर्षांत देशात ऑनलाईन औषध विक्रीचे प्रमाण अनियंत्रितपणे वाढले आहे. या ई-फार्मसी मंचांवरून कोणतीही ठोस शहानिशा न करता, बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे किंवा थेट प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांची सर्रास विक्री होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक केमिस्ट संघटनेने केला आहे. यामुळे औषधांचा, विशेषतः ‘अँटीबायोटिक्स’चा प्रचंड गैरवापर वाढला असून, रुग्णांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे.…
जळगाव प्रतिनिधी । देशात सातत्याने वाढणारी महागाई, बेरोजगारी आणि वीज ग्राहकांच्या माथी मारले जाणारे स्मार्ट मीटर या जनविरोधी धोरणांविरोधात ‘बहुजन मुक्ती पार्टी’ने थेट रस्त्यावर उतरून देशव्यापी रणशिंग फुंकले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून, जळगाव जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुनील काशिनाथ देवरे यांच्या नेतृत्वाखाली जी.एस. मैदानात थेट ‘चूल पेटवा’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर हल्लाबोल करताना बहुजन मुक्ती पार्टीने निवेदनात म्हटले आहे की, “स्मार्ट मीटरच्या नावाखाली खाजगी कंपन्यांकडून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनप्रमाणेच (EVM) बेकायदेशीरपणे ग्राहकांची लूट सुरू आहे. यामुळे सर्वसामान्यांचे वीज बिल भरमसाट वाढले असून जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले…
जळगाव प्रतिनिधी । वाढती इंधन टंचाई आणि पर्यावरणाचा ढासळता समतोल राखण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. पालिकेने दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आज पहिल्याच दिवशी त्याची यशस्वी अंमलबजावणी झाली. या मोहिमेचे नेतृत्व स्वतः महापौर दीपमाला मनोज काळे यांनी केले. त्यांनी घरातून थेट मनपा कार्यालयापर्यंत सायकल चालवत प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर एक अनोखा आदर्श ठेवला. जागतिक पातळीवरील इंधन संकट आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता, महापौरांनी आयुक्तांना यासंदर्भात लेखी आदेश दिले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आज संपूर्ण पालिका प्रशासन पर्यावरणपूरक रंगात रंगलेले दिसले. उपमहापौर आणि उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी ई-बाईकचा वापर केला. तर उपायुक्त…

