Author: Editorial Desk

जळगाव प्रतिनिधी । आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे एका विशेष समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला पोलीस प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य, महावितरण, अग्निशमन, पशुसंवर्धन आणि परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. आगामी सण शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेत आवश्यक सूचना यावेळी देण्यात आल्या. सणाच्या काळात जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. शहर व जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, यामध्ये एसआरपीएफ जवान आणि होमगार्ड…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गौण खजिनाची (वाळू) विनापरवाना चोरी आणि वाहतूक करणाऱ्या एका वाळू तस्करावर पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला रंगेहात अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कानळदा ते आमोदा रस्त्यावरील ‘शेतकरी हॉटेल’जवळ १६ मे रोजी मध्यरात्री १०:३० वाजेच्या सुमारास सार्वजनिक रस्त्यावर वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत प्रकाश ठाकूर (वय ३८) हे आपल्या पथकासह गस्तीवर असताना, त्यांना एका संशयास्पद वाहनाची हालचाल दिसून आली. पोलिसांनी तात्काळ टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक ते नंदिनीबाई बेंडाळे शाळा या प्रमुख मार्गावरील दुभाजक सुशोभीकरण आणि देखभाल कामात ‘भंगाळे गोल्ड’ व्यवस्थापनाकडून महानगरपालिकेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी मनपा प्रशासनाकडे लेखी तक्रार केली असून, संबंधित करार तातडीने रद्द करण्याची आणि दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांच्या सुशोभीकरणासाठी सामाजिक संस्था व व्यावसायिकांना परवानगी दिली जाते. मनपाच्या नियमानुसार, या दुभाजकांवर लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांवर ४० टक्के जागा महानगरपालिकेच्या नावासाठी आणि ६० टक्के जागा स्वतःच्या जाहिरातीसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. तसेच दोन…

Read More

जळगाव प्रतिनिधी । महावितरणच्या अत्यंत बेजबाबदार आणि भोंगळ कारभारामुळे जळगाव येथील उमाळा एमआयडीसीमधील (MIDC) सुमारे २५ ते ३० कंपन्या आज बंद होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या ठाकल्या आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही वीज समस्या सोडवली जात नसल्याने संतप्त झालेल्या उद्योजकांनी आज अखेर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन आपल्या तीव्र व्यथा मांडल्या. या गंभीर समस्येची दखल घेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कडक शब्दांत कानउघाडणी करत त्यांना चांगलेच धारेवर धरले. उमाळा एमआयडीसीत गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा मोठा लपंडाव सुरू असून, यामुळे उद्योगांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने हाय व्होल्टेजचा ट्रान्सफॉर्मर बसविण्याची सूचना मंत्री महोदयांनी…

Read More

जळगाव प्रतिनिधी | ​गेल्या अनेक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा कमालीचे तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ​राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळापासून रखडल्यामुळे, २०२२ पासून या कोट्यातील विधानपरिषदेच्या जागा प्रलंबित होत्या. जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्याने, या जागेची निवडणूक होणार की नाही, याबाबत मोठा संभ्रम होता. मात्र, निवडणूक आयोगाने जळगावसह राज्यातील १६ जागांसाठी निवडणूक जाहीर करून या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ​या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मतदानाचा हक्क कोणाला असेल, याचे चित्र आता…

Read More

जळगाव प्रतिनिधी जळगाव एसटी बसस्थानक परिसरातील बंद असलेले उपहारगृह तात्काळ सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगावतर्फे आज एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात प्रवाशांना सवलतीच्या दरात चहा-नाश्ता सुविधा उपलब्ध होत नसल्याने होत असलेल्या गैरसोयींकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच राज्यातील इतर बसस्थानकांवर सुविधा सुरू असताना जळगाव बसस्थानक मात्र अद्याप वंचित का ठेवण्यात आले आहे? असा सवालही उपस्थित करण्यात आला. उपहारगृह सुरू करण्यासाठी आवश्यक जागा व सुविधा उपलब्ध असूनही प्रशासनाकडून होत असलेला विलंब संशयास्पद असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला. यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध जपले जात आहेत का? अशी शंकाही व्यक्त करण्यात आली. याबाबत तातडीने सकारात्मक…

Read More

जळगाव प्रतिनिधी । आगामी २१ जून रोजी साजरा होणाऱ्या ‘जागतिक योगदिवसा’चे औचित्य साधून यंदा जळगाव जिल्ह्यात केवळ एक दिवस नव्हे, तर पूर्ण ‘योगसप्ताह’ साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जळगाव जिल्हा कार्यकारिणीची ही ऑफलाइन बैठक रविवार १७ मे २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता जिल्हाध्यक्षा चित्रा महाजन यांच्या निवासस्थानी उत्साहात पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. कृणाल महाजन यांनी ‘योगसप्ताह’ साजरा करण्याची अभिनव संकल्पना मांडली. या सप्ताहाच्या माध्यमातून योगाचा प्रसार घराघरांत पोहचवण्यासाठी विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यानुसार या योगसप्ताहात चित्रकला स्पर्धा, योगासन स्पर्धा, योगनृत्य…

Read More

जळगाव प्रतिनिधी । स्थानिक राजकारणाचे आणि सहकार क्षेत्राचे प्रमुख केंद्र असलेल्या जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाचा पेच अखेर आज सुटला आहे. बाजार समितीच्या रिक्त असलेल्या सभापतीपदासाठी आज विशेष निवड प्रक्रिया अत्यंत उत्साहात राबविण्यात आली. या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीत लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या बाजार समितीमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आता पूर्णविराम मिळाला असून, नवनिर्वाचित सभापतींच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सोमवारी १८ मे रोजी सकाळी ठीक ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य सभागृहात या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. पीठासीन अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया…

Read More

जळगाव प्रतिनिधी । क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून एका १२ वर्षीय निष्पाप बालकाचा छातीत बॅट मारून खून करण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. गणेश नवल पाटील असे मृत बालकाचे नाव असून, ही घटना धरणगाव तालुक्यातील रेल गावात घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी पीडित वडील गेल्या दीड महिन्यापासून पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहेत, मात्र पोलिसांनी अद्याप तक्रार नोंदवून न घेतल्याने हताश झालेल्या बापाने थेट पाळधी पोलीस ठाण्यापासून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयापर्यंत न्यायासाठी पायपीट केली. दीड महिन्यापूर्वी रेल येथील रहिवासी नवल पाटील यांचा मुलगा गणेश गावातील मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. खेळताना मुलांमध्ये वाद झाला आणि…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढावे, तपासातील त्रुटी दूर व्हाव्यात आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक प्रभावी व्हावी या उद्देशाने जळगाव पोलीस दलाच्या वतीने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून जळगाव विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी ८ ते ११ या वेळेत ही तीन तासांची अभ्यासपूर्ण कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला पीडीजे आर. एन. जोशी, सेशन जज एम. एस. बडे, एस. व्ही. खोंगल, एम. जी. चव्हाण, के. के. चाफळे, डीजीपी काब्रा, चोरडिया तसेच प्रॉसिक्यूशन अॅडिशनल डायरेक्टर श्रीमती ढगे यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी, एसडीपीओ, दुय्यम अधिकारी आणि सुमारे १०० अंमलदार उपस्थित होते. कार्यशाळेत गुन्हे तपासादरम्यान पुरावे…

Read More