Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला; तालुका पोलीसांची कारवाई

क्राईम

अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला; तालुका पोलीसांची कारवाई

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMay 18, 2026Updated:May 18, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गौण खजिनाची (वाळू) विनापरवाना चोरी आणि वाहतूक करणाऱ्या एका वाळू तस्करावर पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ४ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला रंगेहात अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कानळदा ते आमोदा रस्त्यावरील ‘शेतकरी हॉटेल’जवळ १६ मे रोजी मध्यरात्री १०:३० वाजेच्या सुमारास सार्वजनिक रस्त्यावर वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत प्रकाश ठाकूर (वय ३८) हे आपल्या पथकासह गस्तीवर असताना, त्यांना एका संशयास्पद वाहनाची हालचाल दिसून आली. पोलिसांनी तात्काळ टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची कॅबिन व पिवळ्या रंगाची ट्राली असलेली मालवाहू टेम्पो क्रमांक (एमएच ४६ बीबी २८५१) थांबवून तिची तपासणी केली. त्यावेळी या वाहनात अवैधरित्या वाळू वाहतूक करत असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी वाहन जप्त केले असून याबाबत चालक राजेंद्र सपकाळे वय २८ रा. कानळदा ता.जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोकॉ गुलाब माळी करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026

पुण्यात लपून बसलेला जळगावचा फरार आरोपी जेरबंद; जळगाव एलसीबीची मोठी कारवाई

May 19, 2026

जळगाव मनपामध्ये दर बुधवारी ‘नो-व्हेईकल डे’ पाळणार ! : महापौर

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add