जळगाव प्रतिनिधी । ऑनलाईन औषध विक्रीच्या वाढत्या प्रभावामुळे आणि मोठ्या ई-फार्मसी कंपन्यांच्या स्पर्धात्मक धोरणांमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसाय अडचणीत सापडल्याचा आरोप करत जळगावातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी तीव्र आंदोलन छेडले. देशभर पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय बंदला प्रतिसाद देत जळगाव जिल्ह्यातील मेडिकल दुकानदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली शहरात निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले. खान्देश सेंट्रल मॉल परिसरातून सुरू झालेल्या या रॅलीत औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन कंपन्यांच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून रॅली काढत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यानंतर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करून ऑनलाईन औषध विक्रीवर कठोर नियम लागू करण्याची मागणी केली. ई-फार्मसीमुळे स्थानिक…
Author: Editorial Desk
भुसावळ प्रतिनिधी | बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध जळगाव पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करत पोलिसांनी आणखी एका बांगलादेशी घुसखोर महिलेला शोधून काढले आहे. या प्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे मूळ नाव फरीदा बेगम मोहम्मद खान (वय ४२, रा. पीरोजपुर, बांगलादेश) असे आहे. ती भारतात आल्यानंतर ‘जस्मिन बी मोहम्मद खान’ या बनावट नावाने भुसावळ येथील दीनदयाल नगर भागात राहत होती. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी महिलेने २००९ मध्ये एका दलालाला ५ हजार रुपये देऊन बोटीच्या सहाय्याने नदीमार्गे पश्चिम…
जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरासह जिल्ह्यात इंधन टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मंगळवारी सकाळपासून जळगाव शहरातील विविध पेट्रोल पंपांवर डिझेल भरण्यासाठी वाहनचालकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी ट्रक, खासगी वाहने, दुचाकी तसेच मालवाहतूक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पेट्रोलचाही तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही पेट्रोल पंपांवर मर्यादित प्रमाणात इंधन उपलब्ध असल्याने वाहनधारकांची झुंबड उडाली. तर अनेक पंपांवर “डिझेल उपलब्ध नाही” तसेच “पेट्रोल व डिझेल उपलब्ध नाही” असे फलक लावण्यात आल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव आणि इराण-इराक-अमेरिका…
जळगाव प्रतिनिधी । लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीवर गेल्या दोन वर्षांपासून विविध हॉटेल्स आणि लॉजवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगावात उघडकीस आली आहे. लग्नाची मागणी केली असता तरुणीला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २३ वर्षीय तरुणी मूळची जळगावची असून, सध्या ती नोकरीनिमित्त पुण्याच्या वारजे भागात वास्तव्यास आहे. या दरम्यान तिची ओळख संशयित आरोपी रोशन मुकेश निकम (वय ३३, रा. निमखेडी, जळगाव) याच्याशी झाली. रोशनने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. मार्च २०२४ ते मे २०२६ या कालावधीत त्याने…
जळगाव प्रतिनिधी | शहरातील रायसोनी नगर भागात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. केसीई इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बी.टेकच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या हेमंत प्रदीप जाधव (वय २०) या विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, १८ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. आत्महत्येपूर्वी हेमंतने लिहिलेली एक भावुक सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली असून, त्यात त्याने स्वतःच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार न धरता, आपले अवयव गरजूंना दान करण्याची अंतिम इच्छा व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हेमंतचे वडील एका खासगी कंपनीत कार्यरत असून आई एस.टी. महामंडळात वाहक (कंडक्टर) आहे. सोमवारी आई-वडील दोघेही नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीवर गेले होते. दुपारी घरी कोणीही…
जळगाव प्रतिनिधी | महावितरण कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेलेल्या तरुणाची जुन्या वादातून निर्घृण हत्या करून नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य संशयित आरोपीला जळगाव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आमीन हैदर तडवी (वय २१, रा. हरिविठ्ठलनगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात यापूर्वीच पोलिसांनी पाच आरोपींना गजाआड केले आहे, मात्र आमीन हा गुन्हा घडल्यापासून पोलिसांना चकवा देऊन फरार होता. जुना वाद आणि थरारक हत्याकांड :मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनीतील रहिवासी विशाल मोची (वय २६, उर्फ विक्की रमेश मोची) हा तरुण १७ ऑगस्ट २०२५ रोजी त्याच्या मित्रांसह खंडित वीजपुरवठ्याची तक्रार देण्यासाठी दीक्षितवाडीतील महावितरण कार्यालयात गेला होता.…
जळगाव प्रतिनिधी | सध्या जागतिक पातळीवर अमेरिका-इराण युद्धामुळे देशात मोठ्या प्रमाणावर इंधन टंचाई भासत आहे. या पार्श्वभूमीवर, इंधनाचा काटकसरीने वापर करण्यासाठी आणि शहरातील पर्यावरण रक्षणासाठी जळगाव शहर महानगरपालिकेत आता प्रत्येक महिन्याच्या दर बुधवारी ‘नो-व्हेहीकल डे’ पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात जळगाव शहराच्या महापौर दिपमाला मनोज काळे यांनी महानगरपालिका आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे तातडीने आदेश दिले आहेत. पंतप्रधानांनी इंधनाअभावी शासकीय वाहनांचा वापर काटकसरीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत, ज्यानुसार अनेक मान्यवरांनी आपल्या सुरक्षा ताफ्यातील वाहने कमी करून इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर सुरू केला आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मनपा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. *असे असेल ‘नो-व्हेईकल…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहर आणि परिसर भागात सार्वजनिक ठिकाणी, वाहनांमध्ये तसेच वाईन शॉपच्या बाहेर उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी धडक मोहीम राबवली आहे. या धडक कारवाईत तब्बल ६२ तळीरामांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रस्त्यावर उतरून ही धडक मोहीम राबविल्याने जळगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेचा वचक निर्माण झाला आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, जळगाव महानगर जिल्ह्याच्या वतीने पोलिसांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर आणि गर्दीच्या भागात गटागटाने बसून मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. विशेषतः गिरणा टाकीसारख्या गजबजलेल्या भागात भाजीपाला व इतर खरेदीसाठी…
जळगाव प्रतिनिधी | धावत्या ट्रेनमध्ये एक ३० वर्षीय अज्ञात पुरुष इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यानंतर, त्याला उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची घटना जळगाव रेल्वे स्थानकावर घडली आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, रेल्वे पोलिसांनी नागरिकांना ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे. रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार १८ मे रोजी ट्रेन नंबर ११०३१ अमृत भारत एक्सप्रेसच्या पाठीमागून सहाव्या जनरल डब्यात एक तरुण बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती जळगाव रेल्वे स्टेशनचे ऑन ड्युटी स्टेशन मास्टर मोरे यांनी संध्याकाळी ६ वाजता रेल्वे पोलिसांना दिली. ती ट्रेन रात्री ७ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर आली असता, रेल्वे पोलिसांनी तात्काळ त्या बेशुद्ध इसमाला प्लॅटफॉर्मवर…
अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयाला माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी अचानक भेट देत विविध विभागांची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, रखडलेले बांधकाम व अस्वच्छतेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले. उपजिल्हा रुग्णालयासाठी सुरू असलेल्या बांधकामाची गती अत्यंत संथ असल्याचे पाहून आमदार पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. बांधकामामुळे गेल्या वर्षभरापासून बंद असलेले स्वच्छतागृह तातडीने सुरू करण्यासह तुटलेले दरवाजे आणि इतर दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रुग्णालयातील काही बेडशीट अस्वच्छ आढळून आल्याने…

