Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मोठी कारवाई; भुसावळातून बांगलादेशी घुसखोर महिलेला अटक!

क्राईम

मोठी कारवाई; भुसावळातून बांगलादेशी घुसखोर महिलेला अटक!

Editorial DeskBy Editorial DeskMay 20, 2026Updated:May 20, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

भुसावळ प्रतिनिधी | बेकायदेशीररीत्या भारतात वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध जळगाव पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करत पोलिसांनी आणखी एका बांगलादेशी घुसखोर महिलेला शोधून काढले आहे. या प्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे मूळ नाव फरीदा बेगम मोहम्मद खान (वय ४२, रा. पीरोजपुर, बांगलादेश) असे आहे. ती भारतात आल्यानंतर ‘जस्मिन बी मोहम्मद खान’ या बनावट नावाने भुसावळ येथील दीनदयाल नगर भागात राहत होती. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी महिलेने २००९ मध्ये एका दलालाला ५ हजार रुपये देऊन बोटीच्या सहाय्याने नदीमार्गे पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर प्रवेश केला होता आणि तिथून ती रेल्वेने भुसावळात आली.

​तपासादरम्यान पोलिसांनी तिच्याकडून एक सॅमसंग मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणातून धक्कादायक पुरावे हाती आले आहेत. ही महिला IMO आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून बांगलादेशी कंट्री कोड असलेल्या (+880) क्रमांकांवर सतत संपर्कात होती. तिच्या मोबाईलमध्ये बांगलादेशच्या जन्मदाखल्याची प्रतही आढळून आली आहे.

​सर्वात गंभीर बाब म्हणजे, या महिलेने तिच्या मृत बहिणीच्या नावावरील लाईट बिल व इतर कागदपत्रांचा वापर करून स्वतःचे बनावट रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड आणि बँक पासबुक बनवून घेतले होते. एवढेच नव्हे तर, या बनावट कागदपत्रांच्या आधारे तिने भारतीय पासपोर्ट देखील मिळवला. याच पासपोर्टवर ती मे २०२३ मध्ये बांगलादेशात जाऊन पुन्हा भारतात परतली होती.

​या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करून देणारे एजंट आणि दलालांचा शोध पोलीस घेत आहेत. जळगाव पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात संशयास्पद व्यक्ती किंवा बनावट कागदपत्रांवर राहणाऱ्यांची माहिती पोलिसांना तातडीने द्यावी.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add