Author: Editorial Desk

जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून देवस्थान इनाम जमिनी आणि हिंदू मंदिरांच्या अन्य जमिनी कुळांना किंवा वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासाठी नवीन कायदा प्रस्तावित केला जात आहे. शासनाचा हा धोरणात्मक निर्णय हिंदू देवस्थानांचे अस्तित्व संपवण्याचा आणि भूमाफियांचे खिसे भरण्याचा डाव तर नाही ना? अशी रास्त शंका निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने हा बेकायदेशीर आणि अन्यायकारक मसुदा तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर मंदिरांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक शसुनील घनवट यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेत दिला. या प्रसंगी स्वामी नारायण मंदिराचे नयन स्वामी महाराज, इस्कॉनचे पार्थ सारथी महाराज, ह.भ.प. मंगेश महाराज यांच्यासह अनेक मंदिरांचे विश्वस्त…

Read More

जळगाव प्रतिनिधी | आगामी पावसाळा तोंडावर आलेला असताना जळगाव शहरात ठिकठिकाणी नालेसफाईच्या कामांना वेग आला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील अत्यंत अडचणीच्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘बाबा खोली’ परिसरातील नाल्याची रविवारी (२४ मे) मनपा आरोग्य विभागातर्फे विशेष मोहीम राबवून स्वच्छता करण्यात आली. या धडक मोहिमेत सुमारे तीन ट्रॅक्टर इतका प्रचंड गाळ काढण्यात आला असून, परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. ​या नाल्याच्या दोन्ही बाजूंना दाट लोकवस्ती आणि घरे आहेत. अत्यंत दाटीवाटीचा परिसर असल्याने या नाल्याची साफसफाई करण्यासाठी यंत्रसामग्री नेण्यास अजिबात जागा शिल्लक नव्हती. पावसाळ्यात हा नाला तुंबून घरात पाणी शिरण्याची भीती असल्याने स्थानिक नागरिकांनी महापौर दीपमाला काळे यांच्याकडे याबाबत…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | रुग्णसेवेत दिवस-रात्र कार्यरत असणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी), जळगाव येथे एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स’ (MARD) आणि ‘जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने निवासी डॉक्टर आणि इंटर्न्ससाठी १८ मे ते २२ मे दरम्यान मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला डॉक्टरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, १०० हून अधिक निवासी डॉक्टर आणि इंटर्न यांनी या लसीकरणाचा लाभ घेतला. ​वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना डॉक्टरांचा रुग्ण, त्यांचे रक्त आणि इतर शारीरिक द्रव्यांशी सतत संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांना ‘हेपेटायटिस-बी’ सारख्या घातक संसर्गाचा धोका…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | आजच्या वाढत्या खर्चिक व बडेजावाच्या विवाह पद्धतीला फाटा देत समाजाला नवी दिशा देणारा आणि साधेपणा, सामाजिक एकता तसेच धार्मिक मूल्यांचा सुंदर संदेश देणारा चौथा सामूहिक विवाह सोहळा रविवारी (२४ मे २०२६) रोजी येथील मन्यार हॉलमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण व पवित्र वातावरणात संपन्न झाला. ‘शिसगर मुस्लिम समाज फाउंडेशन’ (सुप्रिम कॉलनी, जळगाव) यांच्या वतीने या आदर्श उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ​या सामूहिक विवाह सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विवाहबंधनात अडकलेल्या चार जोडप्यांमध्ये दोन मनीयार बिरादरी, एक शिकलगर बिरादरी आणि एक पटेल बिरादरीच्या वधू-वरांचा समावेश होता. विशेष म्हणजे, एका जोडप्यामध्ये वधू आणि वर दोघे वेगवेगळ्या बिरादरीतील असूनही इस्लामी शरियतच्या पवित्र मार्गदर्शनानुसार…

Read More

​चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव-नागद रस्त्यावरील वाघडू गावाच्या पुढे एका हॉटेलजवळ दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात २३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. निकीता साईनाथ झालटे (वय २३, रा. ठाणे) असे मृत तरुणीचे नाव आहे. या अपघातात अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ​मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी दुचाकी चालक प्रेम चंद्रभान झालटे (रा. हातले, ता. चाळीसगाव) हा त्याच्या ताब्यातील हिरो कंपनीची मोटरसायकल ( एमएच ५२ ए ५२१२) चाळीसगावकडून नागदच्या दिशेने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवत होता. वाघडू गावानजीक रस्त्यावरील एका डंपरला उजव्या बाजूने चुकीच्या पद्धतीने (रॉंग साईड) ओव्हरटेक करण्याच्या नादात, समोरून येणाऱ्या बजाज…

Read More

जळगाव प्रतिनिधी । आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. जळगाव विधान परिषदेच्या जागेवर भाजपने दावा ठोकलेला असतानाच, आता शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या जागेवर शिवसेनेचा हक्क सांगत थेट आपल्या चिरंजीवांसाठी उमेदवारी मागितली आहे. “माझे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासाठी मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून, वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन ही जागा शिवसेनेला सुटेल,” असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगावच्या जागेसाठी सुरुवातीला महायुती म्हणून एकत्र लढण्यावर आम्ही ठाम आहोत. मात्र, जर वरिष्ठ पातळीवर जागांमध्ये फेरबदल झाले, तर जळगावची विधान परिषदेची जागा शिवसेनेसाठी…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत केलेल्या एका मोठ्या कारवाईत जळगाव पोलिसांना महत्त्वपूर्ण यश आले आहे. पोलिसांनी दाखवलेल्या ‘प्रॉक्टिव्ह अप्रोच’ (सक्रिय दृष्टिकोन) मुळे कुंटणखान्यातून ताब्यात घेण्यात आलेली एक महिला चक्क बांगलादेशी नागरिक असल्याचे तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुका पोलीस पोलिसांनी २१ मे रोजी पोलिसांनी निमखेडी रोडवरील ‘ब्रम्हांडनायक अपार्टमेंट’ येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर अचानक छापा टाकला. या प्रकरणात मुख्य आरोपी सागर सोनवणे (रा. धरणगाव) आणि सीमा ऊर्फ कविता मोरे (रा. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.​या धडक कारवाई दरम्यान…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | नशिराबाद नगरपरिषद स्थापन होऊन जवळपास ६ वर्षे पूर्ण झाली असली, तरी गॅस वितरण प्रणालीत या भागाला अजूनही ग्रामीण निकष लावले जात असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, नशिराबादचे उपनगराध्यक्ष पंकज शामकांत महाजन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधले आणि नशिराबादला तातडीने शहरी निकष लागू करण्याची मागणी केली. ​जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारच्या गॅस वितरण प्रणालीनुसार ग्रामीण भागासाठी गॅस रिफिल बुकिंगचा कालावधी ४५ दिवसांचा निश्चित करण्यात आला आहे. याउलट, शहरी भागातील नागरिकांना अवघ्या २५ दिवसांत गॅस रिफिल बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. नशिराबादचे रूपांतर आता ग्रामीण…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि व्यापक मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील हिस्ट्रीशीटर्स, सराईत गुन्हेगार (हॅबिच्युअल ऑफेंडर्स), शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे, टवाळखोर तसेच प्रतिबंधात्मक कारवाईतील आरोपींना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे ‘M.O.B (Modus Operandi Bureau) / Interrogation Forms’ भरून घेण्याची मोहीम आज, २३ मे रोजीपासून अत्यंत वेगाने सुरू करण्यात आली आहे. ​काय आहे ‘क्रिमिनल डोजियर M.O.B डेटाबेस’? :या मोहिमेत अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्वक तयार केलेला काही पानांचा एक विशेष फॉर्म गुन्हेगारांकडून भरून घेतला जात आहे. यामध्ये गुन्हेगाराची केवळ जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच नाही, तर…

Read More

​सावदा प्रतिनिधी : घरासमोरील सामाईक रस्त्यावर केलेल्या बांधकामाच्या आणि अतिक्रमणाच्या वादातून एका तरुणाला लोखंडी फायटरने बेदम मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील रायपूर येथे घडली आहे. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र मुरलीधर सपकाळे (वय ४३, रा. रायपूर कोळीवाडा, ता. रावेर) आणि संशयित आरोपी गणेश तायडे, राहुल तायडे हे एकाच वाड्यात राहतात. फिर्यादी यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागूनच आरोपींचे घर आहे. आरोपींनी या सामाईक रस्त्यावरील अतिक्रमित जागेत घराचा ओटा बांधला होता. महेंद्र यांनी या अनधिकृत बांधकामाला विरोध केला होता, याच गोष्टीचा राग आरोपींच्या मनात होता. ​२० मे रोजी सायंकाळी ५…

Read More