Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जळगाव विधान परिषदेवर शिवसेनेचा दावा; गुलाबराव पाटलांकडून मुलगा प्रतापरावांसाठी उमेदवारीची मागणी!

जळगाव

जळगाव विधान परिषदेवर शिवसेनेचा दावा; गुलाबराव पाटलांकडून मुलगा प्रतापरावांसाठी उमेदवारीची मागणी!

Editorial DeskBy Editorial DeskMay 24, 2026Updated:May 24, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. जळगाव विधान परिषदेच्या जागेवर भाजपने दावा ठोकलेला असतानाच, आता शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या जागेवर शिवसेनेचा हक्क सांगत थेट आपल्या चिरंजीवांसाठी उमेदवारी मागितली आहे. “माझे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासाठी मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून, वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन ही जागा शिवसेनेला सुटेल,” असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, जळगावच्या जागेसाठी सुरुवातीला महायुती म्हणून एकत्र लढण्यावर आम्ही ठाम आहोत. मात्र, जर वरिष्ठ पातळीवर जागांमध्ये फेरबदल झाले, तर जळगावची विधान परिषदेची जागा शिवसेनेसाठी सोडण्यात यावी. आम्ही आतापर्यंत भाजपला खांद्याला खांदा लावून प्रामाणिकपणे काम केले आहे. यापूर्वी शिवसेनेने ही जागा दोन वेळा लढवून जिंकली देखील आहे, त्यामुळे या जागेवर आमचा नैसर्गिक दावा बनतो. शेवटी वरिष्ठ नेते मंडळी मग ती भाजपची असो की शिवसेनेची, जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल, असे सांगत त्यांनी आपण पक्षाचे बंधन पाळणारे कार्यकर्ते असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी ‘ऑपरेशन टायगर’ आणि पक्षाच्या रणनीतीवर बोलताना ते म्हणाले, “शेवटी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या मनात काय चालले आहे याबद्दल कोणीच काही सांगू शकत नाही.”

दुसरीकडे, आमदार किशोर पाटील यांच्याकडूनही त्यांच्या मुलासाठी विधान परिषदेच्या उमेदवारीची चर्चा सुरू असल्याचा प्रश्न विचारला असता, गुलाबराव पाटलांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, “त्यांचा मुलगा काय आणि माझा मुलगा काय… मात्र विधान परिषदेसाठी किमान ३० वर्षे वय पूर्ण असावे लागते. त्यांच्या मुलाचे वय सध्या २८ वर्षे आहे. किशोर पाटील स्वतः आमदार असल्यामुळे त्यांना या कायदेशीर गोष्टी माहिती असायला हव्यात.” दरम्यान, शेवटी तो नात्याने माझा नातूच लागतो, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे जळगाव विधान परिषदेची जागा महायुतीत कोणाच्या पदरात पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add