Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»​रास्त्याच्या वादातून तरुणावर फायटरने हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

क्राईम

​रास्त्याच्या वादातून तरुणावर फायटरने हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

Editorial DeskBy Editorial DeskMay 23, 2026Updated:May 23, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​सावदा प्रतिनिधी : घरासमोरील सामाईक रस्त्यावर केलेल्या बांधकामाच्या आणि अतिक्रमणाच्या वादातून एका तरुणाला लोखंडी फायटरने बेदम मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील रायपूर येथे घडली आहे. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र मुरलीधर सपकाळे (वय ४३, रा. रायपूर कोळीवाडा, ता. रावेर) आणि  संशयित आरोपी गणेश तायडे, राहुल तायडे हे एकाच वाड्यात राहतात. फिर्यादी यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागूनच आरोपींचे घर आहे. आरोपींनी या सामाईक रस्त्यावरील अतिक्रमित जागेत घराचा ओटा बांधला होता. महेंद्र यांनी या अनधिकृत बांधकामाला विरोध केला होता, याच गोष्टीचा राग आरोपींच्या मनात होता.

​२० मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रायपूर गावातील आरोपींच्या घराशेजारील मोकळ्या जागेत हा वाद पुन्हा उफाळून आला. पूर्ववैमनस्यातून आरोपींनी संगनमत करून महेंद्र सपकाळे यांना गाठले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपी क्र. २ राहुल शिवदास तायडे याने फिर्यादी महेंद्र यांना घट्ट पकडून ठेवले, तर आरोपी क्र. १ गणेश शिवदास तायडे याने आपल्या खिशातील ‘लोखंडी फायटर’ काढून महेंद्र यांच्या डाव्या कानाजवळ आणि डाव्या नाकावर जोरदार प्रहार केले. या हल्ल्यात महेंद्र सपकाळे गंभीर जखमी झाले आहेत

​या घटनेनंतर महेंद्र यांनी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी २२ मे २०२६ रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी गणेश शिवदास तायडे आणि राहुल शिवदास तायडे (दोन्ही रा. रायपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add