Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»​नशिराबाद नगरपरिषद असूनही गॅस वितरणात ‘ग्रामीण’ निकष; २५ दिवसांची बुकिंग मर्यादा देण्याची मागणी

जळगाव

​नशिराबाद नगरपरिषद असूनही गॅस वितरणात ‘ग्रामीण’ निकष; २५ दिवसांची बुकिंग मर्यादा देण्याची मागणी

Editorial DeskBy Editorial DeskMay 23, 2026Updated:May 23, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | नशिराबाद नगरपरिषद स्थापन होऊन जवळपास ६ वर्षे पूर्ण झाली असली, तरी गॅस वितरण प्रणालीत या भागाला अजूनही ग्रामीण निकष लावले जात असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, नशिराबादचे उपनगराध्यक्ष पंकज शामकांत महाजन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधले आणि नशिराबादला तातडीने शहरी निकष लागू करण्याची मागणी केली.

​जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारच्या गॅस वितरण प्रणालीनुसार ग्रामीण भागासाठी गॅस रिफिल बुकिंगचा कालावधी ४५ दिवसांचा निश्चित करण्यात आला आहे. याउलट, शहरी भागातील नागरिकांना अवघ्या २५ दिवसांत गॅस रिफिल बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. नशिराबादचे रूपांतर आता ग्रामीण भागातून शहरी भागात झाले असून, येथील लोकसंख्या आणि गरजा वाढल्या आहेत. मात्र, अद्यापही येथील गॅस ग्राहकांना सरसकट ४५ दिवसानंतरच सिलेंडर बुकिंग करण्याची सक्ती केली जात आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या किंवा टंचाईच्या काळात नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

​उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांनी मागणी केली आहे की, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसारख्या सर्व प्रमुख गॅस वितरण कंपन्यांना नशिराबाद शहराची ‘शहरी क्षेत्र’ म्हणून नोंद घेण्याचे आदेश द्यावेत. नशिराबादमधील नागरिकांना शहरवासीयांप्रमाणेच २५ दिवसांच्या मर्यादेत गॅस रिफिलिंगचा लाभ मिळावा, जेणेकरून गॅस टंचाईच्या समस्येपासून त्यांची मुक्तता होईल.
​या निवेदनावर उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांच्यासह भूषण भानुदास, संदीप विष्णू पाटील, रवींद्र संतोष चौधरी, निवृत्ती वासुदेव, राहुल चौधरी आणि वैभव संजय गोसावी आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नशिराबादवासीयांकडून केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add