Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणीचा मृत्यू !

क्राईम

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणीचा मृत्यू !

Editorial DeskBy Editorial DeskMay 24, 2026Updated:May 24, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

​चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव-नागद रस्त्यावरील वाघडू गावाच्या पुढे एका हॉटेलजवळ दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात २३ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. निकीता साईनाथ झालटे (वय २३, रा. ठाणे) असे मृत तरुणीचे नाव आहे. या अपघातात अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी दुचाकी चालक प्रेम चंद्रभान झालटे (रा. हातले, ता. चाळीसगाव) हा त्याच्या ताब्यातील हिरो कंपनीची मोटरसायकल ( एमएच ५२ ए ५२१२) चाळीसगावकडून नागदच्या दिशेने भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवत होता.

वाघडू गावानजीक रस्त्यावरील एका डंपरला उजव्या बाजूने चुकीच्या पद्धतीने (रॉंग साईड) ओव्हरटेक करण्याच्या नादात, समोरून येणाऱ्या बजाज डिस्कव्हर मोटरसायकलला (क्र. MH 12 JZ 3258) त्याने जोराची धडक दिली.
​या भीषण अपघातात आरोपीच्या पाठीमागे बसलेली निकीता झालटे ही गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. तर दुसरीकडील दुचाकी चालक शिवनाथ संतोष गांगुर्डे (रा. वाघळी, ता. चाळीसगाव) आणि इतर दोन जण जखमी झाले आहेत. अपघातात दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

​याप्रकरणी सलोनो साईनाथ झालटे (वय २१) हिच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add