Author: Editorial Desk

​जळगाव प्रतिनिधी | विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, अखेर भारतीय जनता पार्टीच्या गोटातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या वतीने अधिकृत उमेदवाराची घोषणा कधी होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. अनेक नावांची चर्चा सुरू असतानाही पक्षाकडून कोणताही अंतिम निर्णय जाहीर न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आणि धाकधूक वाढली होती. ​जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ किंवा पक्षीय कोट्यातून भाजप कोणाला संधी देणार, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. या उमेदवारीच्या शर्यतीत प्रामुख्याने नंदू महाजन, डॉ. केतकीताई पाटील आणि नंदू आडवाणी यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती. हे तिन्ही उमेदवार आपापल्या…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | देशात आणि राज्यात सातत्याने वाढणारी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसची दरवाढ, तसेच ‘स्मार्ट मीटर’च्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची होणारी कथित लूट याविरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जळगावात तीव्र आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत अनोखे ‘धक्का मारो’ आंदोलन केले आणि सरकारच्या जनविरोधी धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला. ​हे आंदोलन बहुजन मुक्ती पार्टीच्या देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आले होते. आंदोलकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून, त्यातच आता स्मार्ट मीटर सक्तीच्या नावाखाली वीज ग्राहकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा…

Read More

जळगाव प्रतिनिधी | पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी थेट जाणून घेण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पत्नी सानिका धिवरे तसेच मातोश्री उषा धिवरे यांनी जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस शिपाई निवासस्थानांना सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पोलीस कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि विद्यार्थ्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचा संवाद साधला. ​या अनोख्या उपक्रमाचा मुख्य उद्देश पोलीस कुटुंबीयांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि दैनंदिन गरजा समजून घेणे हा होता. सानिका धिवरे यांनी विविध निवासस्थानांना भेटी देऊन कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक अडचणी, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि वसाहतीमधील मूलभूत सुविधांची माहिती घेतली. कुटुंबीयांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत त्यांनी या बाबी तात्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे…

Read More

​धरणगाव प्रतिनिधी | धरणगाव शहरात सध्या चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील चिंतामणी मोरया परिसरात तोंडाला मास्क लावलेले चार संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, या टोळीने परिसरात चांगलीच दहशत निर्माण केली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे चार वाजेच्या सुमारास हे चार संशयित चोरटे चिंतामणी मोरया परिसरात संशयास्पद रित्या फिरत होते. याच दरम्यान परिसरातील एका सजग नागरिकाला हे चोरटे दिसताच, त्यांनी तातडीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. नागरिकांचा आवाज ऐकून घाबरलेल्या चोरट्यांच्या टोळीने घटनास्थळावरून तातडीने पळ काढला. मात्र, त्यापूर्वीच या चोरट्यांनी परिसरातील एक बंद घर आणि शेजारील छोटे दुकान लक्ष्य केले होते. चोरट्यांनी बंद…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, महाविकास आघाडीने आपला उमेदवार निश्चित केला आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सुटली असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद तायडे यांच्या उमेदवारीवर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. ​या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला चांगलीच चुरस पाहायला मिळत होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून दिलीप खोडपे, तर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाकडून शरद तायडे या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले होते. त्यामुळे ही जागा नेमकी कोणाकडे जाणार, याबाबत उत्सुकता ताणली गेली होती. मात्र, पक्षांतर्गत वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर अखेर शरद तायडे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | शहरातील रेमंड चौफुलीसमोर एका भरधाव व बेदरकारपणे धावणाऱ्या ट्रकने रिक्षाला मागून जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात रिक्षा रस्त्याच्या उजव्या बाजूला उलटून एका उभ्या असलेल्या मोटरसायकलवर जाऊन आदळली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाले असून वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ​मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील रहिवासी असलेले सुकदेव सेनु सावकारे (वय ५६ वर्षे) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. MH-१९, CW-११३८) चालवून उदरनिर्वाह करतात. २८ मे २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते जळगाव ते संभाजीनगर रोडने जात असताना, रेमंड चौफुली समोरील हॉटेल…

Read More

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिकेतील अत्यंत कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी निळकंठ दगा पाटील यांच्या २९ वर्षांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेनंतर, त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आणि मनपा कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव केला. ​या निरोप समारंभाप्रसंगी माजी नगरसेवक कैलास अप्पा सोनवणे, नगरसेवक निलेश तायडे तसेच नगरसेवक कल्पेश सोनवणे यांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात मान्यवरांनी श्री. पाटील यांनी महानगरपालिकेत कार्यरत असताना केलेल्या प्रामाणिक, निस्वार्थ आणि लोकाभिमुख सेवांचा विशेष उल्लेख केला. “नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पाटील यांनी सदैव तत्परता दाखविली.…

Read More

​जळगाव प्रतिनिधी | जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथील रुग्णसेवा अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी व्यवस्थापनाकडून नियमित आढावा घेतला जात आहे. उपस्थिती, कामातील सातत्य, शिस्त आणि कार्यक्षमता या निकषांच्या आधारे संस्थेच्या हितासाठी आवश्यक प्रशासकीय निर्णय घेतले जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ​अलीकडे काही माध्यमांमध्ये कंपनीविरोधात प्रसिद्ध झालेल्या बातम्या वस्तुस्थितीशी विसंगत असून, त्यातील आरोप तथ्यहीन असल्याचा खुलासा व्यवस्थापनाने केला आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय करण्याचा किंवा दबाव टाकण्याचा कंपनीचा हेतू नाही. नियमित अनुपस्थिती, कामातील निष्काळजीपणा आणि कामकाजात अडथळे निर्माण करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवरच प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नाराज झालेल्या काही व्यक्तींनी वैयक्तिक आकसापोटी चुकीची माहिती पसरवल्याचे…

Read More

​चोपडा प्रतिनिधी | चोपडा शहर पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापाराविरोधात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. शहरातील तहसील कार्यालय आणि प्रताप हायस्कूलच्या मागील भागात सुरू असलेल्या एका मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी ५ पीडित महिलांची सुटका केली असून दोन महिला आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून उर्वरित ९ फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ​पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २९ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या एका ठिकाणावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी महिलांना पैशांचे आमिष दाखवून आणि आश्रय देऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे…

Read More

मुक्ताईनगर प्रतिनिधी | मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत आणि आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या एका वाहनाच्या अपघातामुळे या आंतरजिल्हा गुन्हेगारांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. या कारवाईत पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून एक देशी बनावटीचा कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील पुलावर एका स्कॉर्पिओ वाहनाचा किरकोळ अपघात झाला होता. याच दरम्यान परिसरात गस्त घालत असलेल्या मुक्ताईनगर पोलिसांच्या सेकंड मोबाईल पथकाने तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिसांचे वाहन येताना पाहताच स्कॉर्पिओ…

Read More