Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»रेमंड चौफुलीसमोर रिक्षाला मागून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक; रिक्षाचालक जखमी

क्राईम

रेमंड चौफुलीसमोर रिक्षाला मागून येणाऱ्या ट्रकची जोरदार धडक; रिक्षाचालक जखमी

Editorial DeskBy Editorial DeskMay 30, 2026Updated:May 30, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | शहरातील रेमंड चौफुलीसमोर एका भरधाव व बेदरकारपणे धावणाऱ्या ट्रकने रिक्षाला मागून जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात रिक्षा रस्त्याच्या उजव्या बाजूला उलटून एका उभ्या असलेल्या मोटरसायकलवर जाऊन आदळली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाले असून वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

​मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद (ता. जि. जळगाव) येथील रहिवासी असलेले सुकदेव सेनु सावकारे (वय ५६ वर्षे) हे आपल्या ताब्यातील रिक्षा (क्र. MH-१९, CW-११३८) चालवून उदरनिर्वाह करतात. २८ मे २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ते जळगाव ते संभाजीनगर रोडने जात असताना, रेमंड चौफुली समोरील हॉटेल स्कॉच अँड सोडा जवळ त्यांनी उजव्या बाजूला वळण घेतले. याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात ट्रकने (क्र. MH-२१, BH-७१११) रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, अतिवेगाने व निष्काळजीपणाने रिक्षाला मागून जोरदार धडक दिली.

​धडक एवढी भीषण होती की, रिक्षा थेट रस्त्याच्या बाजूला उलटली आणि तेथे पार्क केलेल्या एका दुचाकीवर जाऊन आदळली. या अपघातात रिक्षा चालक सुकदेव सावकारे यांच्यासह अन्य काही जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र, तत्पूर्वीच आरोपी ट्रकचालक अपघातस्थळी न थांबता पळून गेला. या प्रकरणी जखमी रिक्षाचालकाच्या फिर्यादीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

शासकीय ITI समोरील कचरा संकलन केंद्र हटवा; विद्यार्थ्यांसह अभाविपचे ठिय्या आंदोलन

September 17, 2026

कांचन नगरात तरुणावर शस्त्राने हल्ला; तिघांना अटक करून पोलिसांनी काढली धिंड

September 17, 2026

माऊलीनगरात कौटुंबिक वादातून प्राणघातक हल्ला; चार जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

September 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add