Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»कर्तव्यनिष्ठेला सलाम! जळगाव मनपाचे अधिकारी निळकंठ पाटील यांचा दिमाखदार सेवानिवृत्ती सोहळा

क्राईम

कर्तव्यनिष्ठेला सलाम! जळगाव मनपाचे अधिकारी निळकंठ पाटील यांचा दिमाखदार सेवानिवृत्ती सोहळा

Editorial DeskBy Editorial DeskMay 30, 2026Updated:May 30, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव, प्रतिनिधी :

जळगाव शहर महानगरपालिकेतील अत्यंत कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी निळकंठ दगा पाटील यांच्या २९ वर्षांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेनंतर, त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आणि मनपा कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव केला.

​या निरोप समारंभाप्रसंगी माजी नगरसेवक कैलास अप्पा सोनवणे, नगरसेवक निलेश तायडे तसेच नगरसेवक कल्पेश सोनवणे यांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या भाषणात मान्यवरांनी श्री. पाटील यांनी महानगरपालिकेत कार्यरत असताना केलेल्या प्रामाणिक, निस्वार्थ आणि लोकाभिमुख सेवांचा विशेष उल्लेख केला. “नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पाटील यांनी सदैव तत्परता दाखविली. त्यांच्या याच कार्यशैलीमुळे आणि मृदू स्वभावामुळे त्यांनी जनतेच्या आणि सहकाऱ्यांच्या मनात आदराचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे,” अशा शब्दांत वक्त्यांनी त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे कौतुक केले. याप्रसंगी मान्यवरांमध्ये वीरेंद्र पाटील, भूषण शिंपी, राजेंद्र सोनार आणि पवन सैदाणे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते निळकंठ पाटील यांच्या दोन्ही सुपुत्रांचे मनोगत. पोलीस विभागात कार्यरत असलेले त्यांचे मोठे भाऊ कपिल पाटील यांनी आपल्या वडिलांच्या शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक करत आपल्या भावना मांडल्या. तर मुंबई महानगरपालिकेत (BMC) कार्यरत असलेले लहान चिरंजीव सचिन पाटील यांनी आपल्या मनोगतातून वडिलांच्या कष्टाचा आणि प्रवासाचा पट उलगडला. या दोन्ही मुलांच्या अत्यंत भावूक आणि कृतज्ञतापूर्वक मनोगताने संपूर्ण सभागृह हेलावून गेले आणि उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

त्यानंतर आपल्या सत्काराला उत्तर देताना निळकंठ पाटील अत्यंत भावुक झाले होते. त्यांनी सर्व सहकारी, वरिष्ठ अधिकारी आणि नागरिकांचे मनापासून आभार मानले. “सरकारी सेवा आज संपत असली, तरी या २९ वर्षांच्या प्रवासात मी कमावलेले प्रेम, विश्वास आणि सन्मान माझ्या आयुष्याची खरी पुंजी आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. अत्यंत आपुलकीच्या आणि सन्मानपूर्वक वातावरणात हा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न झाला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add